मराठी कोश वाड्मय

भारतीय व्यवहार कोश

‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’ (तीन खंड) ही कोशवाङ्मयातील अतिशय अपूर्व स्वरूपाची कामे आहेत. पुण्याचे रहिवासी विश्वनाथ दिनकर नरवणे यांनी या कोशांचे संपादन केलेले आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. एका प्रांतीयाला दुस-या प्रांतीयाची भाषा मात्र येत नाही असेच आढळते. मराठी माणसे जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या भाषा आवर्जून शिकतात पण कुणी गुजराथी, कन्नड किंवा तामिळ भाषा शिकायला जात नाही. पण व्यवहारात मात्र इतर प्रांतांची भाषा येत नसल्याने अडते. ही अडचण दूर करण्याच्या कामी ‘भारतीय व्यवहार कोश’ या कोशाने बहुमोल मदत केली आहे. या कोशात फळे, धान्य, फुले, घरगुती वस्तू, अवयव अशा वेगवेगळया प्रकारच्या गोष्टींना वेगवेगळया भाषेत काय म्हणतात, यांची माहिती दिलेली आहे. त्याखेरीज घरात, बाजारात, कचेरीत, रेल्वे स्टेशनवर बोलल्या जाणा-या वाक्यांचे सर्व भारतीय भाषांत अनुवाद दिलेले आहेत. शंभर प्रकारची व्यवहारोपयोगी वाक्ये चौदा भाषांत पाठ करता आली तर कुणीही बहुभाषिक बनू शकेल. तथापि एखाद्याने स्वत:ची मातृभाषा सोडून इतर भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला सर्व भाषा जुजबी का होईना, पण येईल अशी सोय ‘भारतीय व्यवहार कोश’ या कोशामुळे झालेली नाही.

या कोशाचे प्रकाशन १९६२ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

प्रकाशक – विश्वनाथ दिनकर नरवणे, त्रिवेणी संगम,विश्वगंगा,११२/५ प्रभात पथ,पुणे ४११००४.फोन-५६६२२६३

प्रमुख संपादक – विश्वनाथ दिनकर नरवणे

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २७०

किंमत – रु.३००/-

मिळण्याचे ठिकाण – विश्वनाथ दिनकर नरवणे, त्रिवेणी संगम,विश्वगंगा,११२/५ प्रभात पथ,पुणे ४११००४.
फोन – ५६६२२६३

म्हणींचा कोश

‘भारतीय कहावत संग्रह’ हा तीन खंडातील म्हणींचा कोश तर फारच विलक्षण आहे. आपल्याला मराठी म्हणी माहित असतात, काही हिंदी ‘कहावते’ आणि संस्कृत सुभाषितेही शाळेत शिकली जातात. परंतु तीच किंवा त्याच प्रकारची म्हण इतर भारतीय भाषांत असते हे आपल्याला माहीत नसते. ही उणीव या कोशाने भरून काढली आहे. ‘गाढव्या गावात गाढवी सवाष्ण’ ही म्हण किंवा ‘निरस्तपादपे देशे एरंडोपिद्रुमायते’ ही संस्कृत उक्ती आपल्याला माहिती असेल. त्या प्रकारच्या म्हणी सर्व भारतीय भाषांत आहेत. हिदींतील ‘अंधोमे काणा राजा’ अशी म्हण उर्दू, सिंधी, इंग्रजी, गुजराती, बांग्ला, ओडिया, तेलगू, कन्नड या सर्व भाषांत सापडेल. ‘सौ कौओमे एक बगला नरेस’ ही म्हण इंग्रजीतही आहे.

या कोशातील कुठलेही पान उघडले तरी त्यात गंमती आढळतात. ‘खाणे थोडे मचमच फार’ या म्हणीचे पर्याय शोधून पाहा. ‘झूठा आडम्बर’ या विषयातील म्हणींनी त्रेपन्न पाने भरलेली आहेत. त्या प्रकारातील ‘घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण त्या प्रकारच्या त्र्याऐंशी मराठी म्हणी आहेत. आळशीपणा, कंजूषपणा, दुबळेपणा, गरिबी असे विषय शोधून पाहा. जातींविषयीच्या म्हणी तीस पाने आहेत. त्या पाहिल्यात तर वेगवेगळया समाजांबद्दल काय समजुती होत्या ते कळेल.

प्रकाशक – वि.दि. नरवणे, त्रिवेणी संगम, ‘विश्वगंगा’, ११२/५ प्रभात पथ, पुणे ४१ १००४.फोन-५६६२२६३

प्रमुख संपादक – विश्वनाथ दिनकर नरवणे

एकूण खंड – ३

पृष्ठ संख्या – ८२४,८०४ व ८०० पाने (१,२,३ खंडांची अनुक्रमे)

किंमत – रु. १५० प्रत्येकी

मिळण्याचे ठिकाण – वि.दि. नरवणे, त्रिवेणी संगम, ‘विश्वगंगा’, ११२/५ प्रभात पथ, पुणे ४११००४.
फोन-५६६२२६३

ज्योतिष महाशब्दकोश

भविष्य शास्त्रातील तांत्रिक शब्दांचा खुलासा देणारा हा शब्दकोश प्रभाकर मराठे यांनी मोठया कष्टाने तयार केला आहे. ते स्वत: भविष्य सांगणारे ज्योतिषी आहेत.

प्रकाशक – ह.अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – प्रभाकर द. मराठे

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – १९८

किंमत – रु. १००

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७