मराठी कोश वाड्मय

व्युत्पत्ति प्रदीप

हा शब्द मराठी शब्दांची व्युत्पत्ती देतो. म्हणजे अमुक एक शब्द कसा तयार झाला हे तो सांगतो. मराठी शब्दांची व्युत्पत्ती देणारा हा कोश शालेय उपयोगाचा असून तो बापट शास्त्री यांनी १९ व्या शतकात म्हणजे १८८४ साली प्रसिध्द केला. त्या काळी त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या होत्या. हा कोश सर्वसमावेशक नसून निवडक व साररूपाने आहे.

प्रकाशक – ह.अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६. फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – गो.शं. बापट

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – १२०

किंमत – रु.८०

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६. फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

अमरकोश

आधुनिक कोश वाङमय निर्माण होण्यापूर्वी भारतात काही कोश तयार केले गेले होते. त्यापैकी सर्वांना परिचित असलेला कोश म्हणजे ‘अमरकोश’. अमरसिंह याने दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी अमर कोश रचला. अमरसिंह हा विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक होता असे मानतात. नावावरून तो क्षत्रिय असावा असे वाटते. काही जणांच्या मते तो बौध्द किंवा जैन असावा.

ज्याल इंग्रजीमध्ये ‘थिसॉरस’ म्हणतात त्याप्रकारचा हा संस्कृतमधील समानार्थी शब्दांचा कोश आहे. हा कोश १५०० वर्षे जुना आहे. इंग्रजीमधील ‘थिसॉरस’ ही कोशाची कल्पना रॉजेट या डॉक्टरला अमरकोशावरून सुचली असे त्याने लिहून ठेवले आहे. एकाच शब्दाचे समानार्थी अनेक शब्द देणारा हा कोश आधुनिक पध्दतीनुसार आकारविल्हे नाही, तर विषयवार वर्गीकरण केलेला आहे. पशू, पक्षी, फुले, फळे, शरीरावयव, स्वर्ग लोक, नरक लोक, वर्ण अशा वेगवेगळया विषयांमधील समानार्थी शब्द त्यात सापडतात. सिंहाला शार्दूल, केसरी, हरी असे शब्द आहेत, तर मांजराला मार्जार, बिडाल, आखुभुक् असे शब्द आहेत असे त्यात आढळेल. पूर्वीच्या काळी संस्कृत अध्ययन करणारे अध्ययनाच्या प्रांरभीच्या काळात अमरकोश पाठ करीत असत. मोरोपंतांच्या किंवा जुन्या कवींच्या काळात एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द सापडतात ते त्यामुळेच.

अमरकोशाची जी छापील पुस्तके मिळतात त्यात सर्व शब्दांची आकारविल्हे यादी दिलेली असल्यामुळे आपल्याला माहिती असणा-या शब्दावरून इतर शब्द शोधणे सोपे जाते. कविता आणि निबंध यासाठी हा कोश उपयोगीआहेच पण नावाचे अर्थ समजण्यालाही त्याचा खूप उपयोग होतो. हल्ली बरीच नावीन्यपूर्ण आणि चित्रविचित्र नावे ठेवण्याची पध्दत पडली आहे. अशा वेळी भलभलती नावे ठेवली जाऊ नयेत किंवा तशी नावे असली तर गंमत कळावी म्हणून हा कोश उपयोगी पडेल. एका गाजलेल्या पौराणिक कादंबरीवरून एका मुलीचे नाव फार लोकप्रिय झाले आहे. त्या शब्दाचा अर्थ चांडाळीण असा होतो. पण तो माहिती नसल्याने अनेकांनी मोठया कौतुकाने मुलीचे किंवा सुनेचे ते नाव ठेवले आहे. या कोशात तुम्ही चांडाळी हा शब्द शोधून पहा म्हणजे ते अज्ञानाने ठेवलेले नाव कळेल. पर्णाद, प्रियांका अशी कानाला गोड वाटणारी नावे दिसतात. पण पर्णादचा एक अर्थ पानेखाऊ म्हणजे उंट किवा बोकड होतो किंवा प्रियांकाचा एक अर्थ मधमाशी होतो हे नाव ठेवणा-यांना माहिती नसते.

प्रकाशक – ह.अ. भावे,वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – अमरसिंह

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २५३

किंमत – रु. १५०

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

फार्शी-मराठी शब्दकोश

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन हे मराठीतील प्रख्यात कवी होते. त्याप्रमाणेच ते कोल्हापूर येथे फार्शी भाषेचे प्राध्यापकही होते. फार्शी मराठी शब्दकोश त्यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून तयार केला.

प्रकाशक – ह.अ. भावे,वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६. फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – डॉ. प्रा. मा. त्रिं. पटवर्धन

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २९५

किंमत – रु. ३००

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन – ५६५५६५४, ५६५१८७७