हसरा नाचरा, श्रावण आला
कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत. व्रत वैकल्याने भरगच्च असा हा पवित्र महिना प्रौढांपासून ते नववधूंसाठीही तितकाच लाडका. श्रावणा विषयी माहिती देणा-या ब-याच साईट नेटवर आहेत. परदेशी गेलेल्या लोकांसाठी व्रतवैकल्याची ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. बहुतेक लोकांना उपास असल्यामुळे खास श्रावण पाककृतीच्याही साईटस आहेत. श्रावणा विषयीची ही माहिती मराठी, इंग्रजी आणि हिंदीतही उपलब्ध आहे. जरुर वाचा –
en.wikipedia.org/wiki/Shravan,
www.divyajivan.org/articles/adhyatma/shravan.htm,
www.festivalsofindia.in/nagpanchami,
www.rudraksha-ratna.com/shravan-month.html,
www.bawarchi.com/festivals/shravana.html,
http://learnsanskrit.wordpress.coM
www.andhranews.net/India/2007/August/3-Shravan-month-draws
http://food-n-more.blogspot.com/2006/07/auspicious-month-of-shravan.html
छान किती दिसते फुलपाखरु !
श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेही आहे. त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. फुलपाखरांचे ‘लाईफ सायकल’ हे सर्वांनाच अचंबीत करते. आधी अंडी, मग अळी, नंतर स्वत: भोवती कोष करणे आणि मग रंगीबिरंगी फुलपाखरात रुपांतर ! फुलपाखरांचा हा प्रवास, माहिती, छायाचित्रे वाचायची असल्यास नेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे –
www.butterflywebsite.com/, www.butterflies.org, www.npwrc.usgs.gov/notfound/bflymoth.htm,
www.enchantedlearning.com/subjects/butterfly,
www.bsi.montana.edu/web/kidsbutterfly
नागपंचमी
हा नाग पूजनाचा दिवस. श्रावणातल्या ह्या दिवसात पावसामुळे सर्प बागेत, शेतात, अगदी घरातही
निवा-याला येतात. तीन हजार वर्षांपासून नागदेवतेची पूजा माणूस करत आला आहे. शेतातल्या उंदराचा नायनाट करणारा हा प्राणी शेतक-याला आपला मित्र वाटतो. पुराणातही नागांचा उल्लेख आढळतो जसे की कालिया, शेष, अनंत, वासूकी, तक्षक, पद्म इत्यादी. आजच्या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. नेटवर ह्या संबंधी बरीच माहिती उपलब्ध आहे –
http://www.marathiworld.com/sanskruti/sanvar/sanvar4.htm#nagpanchami,
www.bawarchi.com/festivals/nagpanchami.html, www.festivalsofindia.in/nagpanchami,
www.aryabhatt.com/fast_fair_festival/fasts/nag_panchami.htm,
en.wikipedia.org/wiki/Nag_Panchami, www.indif.com/nri/festivals/nagpanchmi.asp,
http://arulmuruga.org/nag-panchami.htm
संत नामदेव
संत नामदेवांची आज पुण्यतिथी. विठ्ठलाचे असीम भक्त आणि त्यांचे अभंग आजच्या काळातही मार्ग दाखवणारे आहेत. संत नामदेव हे फक्त मराठी नाही तर शिख भक्तांमध्येही लोकप्रिय आहेत. संत नामदेवांच्या अनेक रचना गुरु ग्रंथ साहिब मध्येही आहेत. नामदेवांचा जन्म सातारा जिल्ह्यात गुणाबाई आणि दामाशेट्टी रेळेकर दांपत्याच्या पोटी झाला. नामदेवांच्या पत्नीचे नाव रजाबाई. त्यांना एकूण चार मुलं व एक मुलगी झाली. संत नामदेवांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिवस उपास केला. अखेर विठठलाला प्रत्यक्ष येऊन नामदेवांना दर्शन द्यावे लागले. पंढरपूरात बसून नामदेवांनी ज्या पायरीवर बसून उपास केले त्या पायरीला ’नामदेव पायर’ म्हणतात. तुकारामांनी महाराष्ट्र तसेच पंजाबला घुमन गावी जाऊन विठ्ठलाच्या नावाचा प्रचार केला होता. म्हणून संत नामदेव संपूर्ण भारतात प्रसिध्द आहेत. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Namdev,
www.punjabilok.com/faith/sufi_bhakti/sant_namdev.htm, saileelas.org/articles/saintnamdeo.htm,
www.dlshq.org/saints/namdev.htm, www.sikh-history.com/sikhhist/events/namdev.html,
http://solapur4u.com/pandharpur.htm
संत सावतामाळी
स्वतःच्या माळीकामात अवघी विठ्ठाबाई शोधणा-या सावतामाळींचे नाव महाराष्ट्रातल्या संतांमध्ये आदराने घेतले जाते. माळी कुटूंबात जन्मलेल्या ह्या विठ्ठल भक्ताने अनेक अभंग रचले आणि महाराष्ट्रात लोकप्रिय केले. त्यांच्या समोर ज्ञानेश्वर, तुकाराम आणि नामदेवांचा आदर्श होता. नेटवर त्यांच्या बद्द्ल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचा उल्लेख असलेल्या साईट खालिलप्रमाणे –
http://en.wikipedia.org/wiki/Savata_Mali,
www.hindubooks.org/temples/maharastra/pandharpur/page26.htm,
www.hinduweb.org/home/dharma_and_philosophy/vshirvaikar,
Dnyaneshwari/Dnbiography.html, www.saibaba.org/newsletter7-45.html,
www.answers.com/topic/savata-mali
ज्ञानेश्वर
१३व्या शतकातले संत, कवी, तत्वज्ञ आणि योगी म्हणून ओळखले जाणारे संत ज्ञानेश्वर ह्यांचे जीवन म्हणजे अदभूत अनुभव होता. त्यांनी लिहीलेली ‘ज्ञानेश्वरी’ हा भारताचा आद्य धर्मग्रंथ मानला जातो. त्यांची भावंड संत निवृत्ती, संत सोपान आणि संत मुक्ताबाई हे तिघेही ज्ञानेश्वरां सारखेच तेजस्वी होते. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी आळंदी येथे ‘संजीवन समाधी’ घेतली होती. ज्ञानेश्वरांविष्यी नेटवर बरीचशी माहिती उपलब्ध आहे. त्यासाठी लॉग ऑन करा –
http://en.wikipedia.org/wiki/Dnyaneshwar, http://en.wikipedia.org/wiki/Alandi,
www.hinduweb.org/home/dharma_and_philosophy/vshirvaikar,
www.saileelas.org/articles/SAINTDNYANESHWAR41974.htm,
ignca.nic.in/clcnf010.htm, www.hindunet.org/srh_home/1997_2/0107.html,
forum.spiritualindia.org/april-1974/saint-dnyaneshwar-2-t14399.0.html,
www.nationmaster.com/encyclopedia/Saint-Dnyaneshwar
– सौ. भाग्यश्री केंगे