| बालकवयित्री | राधिका लाड |
| उन्हाळयाची सुटी अशी घालवू या... | नुपूरमाधुरी तिजारे |
| एक ना धड भाराभर चिंध्या | रौनक पत्की |
| 'बटाटयाची चाळ' | अर्निका प्रकाश परांजपे |
| बास झालं आता उतरवा मुखवटा | अर्निका प्रकाश परांजपे |
| चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी 'सृष्टी' | अर्चना जोगळे |
| ऑस्करच्या पडद्यावर 'लगान' | प्रेरणा भास्कर महाजन |
| माझा अविस्मरणीय अनुभव | प्रेरणा भास्कर महाजन |
सध्या आबालवृध्दांच्या प्रचंड चर्चेत असलेला, तमाम प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा ‘लगान’. इंद्रधनुच्या सप्तरंगी कार्यक्रमात लगानचे दिग्दर्शक श्री अशुतोष गोवारीकर यांची मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीतून ऑस्करच्या दृष्टीने चालू असलेली लगानची वाटचाल समजते.
कलाकारांनी सेटवर केलेल्या गमती जमती, त्यांच्या यशापयशाच्या संकल्पना, त्यांच्या लगान बद्दलच्या अपेक्षा असे सगळे प्रसंग खुद्द गोवारीकरांच्या तोंडून एकताना प्रेक्षक भारावून गेले. त्यांना काळ वेळेचं भानच राहीलं नाही. जणू काही गोवारीकरांनी सगळयांवर जादूच केली होती. त्याच वेळी पाच मिनीटांचं मध्यंतरही लोकांना पाच तासाचं वाटत होतं. पण कधी संपूनये असा वाटणारा कार्यक्रम संपलाच. श्री अशुतोष गोवारीकरांची मुलाखत मनात साठवूनच लोक आपापल्या घरी परतले. आपल्या सगळयांच्या आवडत्या लगानला परदेशातही उदंड प्रतिसाद मिळूदे व लगानला ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळूदे अशी आपण प्रार्थना करून ‘लगान’ ला सुयश चिंतू या !
– प्रेरणा भास्कर महाजन
दिवाळीच्या सुट्टीत मी पदभ्रमण आणि गिर्यारोहण शिक्षणासाठी गेले होते. त्यात मला बरेच अनुभव आले. त्यातला एक रॅपलींगचा. गिर्यारोहण झाले होते म्हणून मी खाली उतरायला गेले. सकाळची वेळ होती. थंडी खुप पडली होती. बोचरं वारं होतं. रॅपलींगच्या डोंगराजवळ पोहचल्यावरच माझ्या छातीत धस्स झाले. तो कडा साधारण दिडशे फुटाचा होता. लहान लहान मुलंही न घाबरता रॅपलींग करत होती. शेवटी माझा नंबर झाला. मला तेव्हाही भीती वाटत होती. मी पोटाला दोर बांधून घेतला. हातात ग्लोव्हज घातले. आणि शेवटच्या क्षणी मात्र गांगारले. उतरायचा धीरच होईना. बाईंनी खुप धीर दिला न् अर्धा डोंगर बिनधास्तपणे उतरले. पण खाली पाहिलं आणि मला रडायला आलं. आपण हे सगळं का करतोय? का शिकतोय? कुठे उपयोग होणार याचा? मी मन घट्ट केलं आणि पुर्ण डोंगर उतरले.
खाली आल्यावर जाणीव झाली, की आपला विचार किती चुकीचा होता? कोणतं शिक्षण कधी, कुठे, कसं न् केव्हा उपयोगी पडेल कुणी सांगावं? संकटकाळी हे शिक्षणच मला तारून नेईल !!
– प्रेरणा भास्कर महाजन