बालमुक्तांगण लेख

बालकवयित्री राधिका लाड
उन्हाळयाची सुटी अशी घालवू या... नुपूरमाधुरी तिजारे
एक ना धड भाराभर चिंध्या रौनक पत्की
'बटाटयाची चाळ' अर्निका प्रकाश परांजपे
बास झालं आता उतरवा मुखवटा अर्निका प्रकाश परांजपे
चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी 'सृष्टी' अर्चना जोगळे
ऑस्करच्या पडद्यावर 'लगान' प्रेरणा भास्कर महाजन
माझा अविस्मरणीय अनुभव प्रेरणा भास्कर महाजन

एक ना धड भाराभर चिंध्या

एक ससा होता त्याचे नाव पिल्लू. त्याचे एक शेत होते. पण त्याचे शेत वाळले होते. एकदा त्याच्या गावी पाऊस आला. त्याचे शेत टवटवीत झाले. तेंव्हा त्याला वाटले की, आपले शेत तर आता टवटवीत झाले. आता आपल्याला काही करायची गरज नाही. असे म्हणून पिल्लू सशाने शेताकडे दुर्लक्ष केले.

एके दिवशी त्याच्या शेतात काही जनावरे घुसली आणि शेताची नासधुस केली. तेथे एक बगळा आला आणि पिल्लू सशाला सांगितले की, तू मासेमारी कर.

एक दिवशी पिल्लू ससा आपली सायकल घेऊन मासेमारी करायला नदीकाठी गेला. त्याचा मित्र तेथे बसला होता. पिल्लू सशाने एक मासा पकडला. पण तो फार लहान होता. परत असेच झाले. शेवटी तो कंटाळला त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, तू सायकल रेस मध्ये भाग घे. त्याने आपली सायकल घेतली आणि सायकल रेसमध्ये भाग घेतला. पिल्लू ससा सर्वात पुढे होता. तो जिंकत होता. म्हणून त्याने दोन्ही हात सोडले व तेवढयातच तो पडला. तितक्यात तेथे शेतावरचा बगळा आला आणि पिल्लू सशाला म्हणाला की एकाच वेळी अनेक गोष्टी करू नये. त्या दिवसापासून ससा फक्त आपले शेत सांभाळतो व मजेत रहातो.

म्हणूनच म्हणतात ना एक ना धड भाराभार चिंध्या

– रौनक पत्की

‘बटाटयाची चाळ’

प्रसिध्द सहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या लेखणातून सहजगत्या लिहिलेलं नाटक श्री. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या कलाविष्काराने भारून टाकले. हे नाटक म्हणजे पु. लं नी आपल्याला अर्पण केलेलं आनंदधनच आहे. ना कुठे ओढुणताणून विनोद बसविलेला की ना कुठे सनसनाटी थरारक! जीवनात रोज घडण्याऱ्या गोष्टी आसपासची लोकं, त्यांच वागणं बोलणं, पूर्वीच्या काळातील शहरी जीवन या सर्व गोष्टीचे सहज सुंदर दर्शन ‘बटाटयाची चाळ’ ह्या नाटकातून घडते. खरं तर ही संगीत नाटिका. त्यामुळे गळाही गोड रूपही सुंदर अशी माणसे सापडणे गरजेचे असते. पण पु. ल. आणि दिलीप प्रभावळकर एकत्र आल्यावर कठीण हा शब्द शब्दकोषातून पळूनच जातो. इतकी सुंदर ठसठशीत आणि धिट नाटका बद्दल विलक्षण आस्था असलेले कलाकार एकत्र रंगमंचावर आल्यामुळे नाटक सर्व रंगांनी परिपूर्ण झाले आहे.

लहान मुलांनी हे नाटक बघितल्यास त्याकाळची जीवनपध्दती, तेव्हा महत्त्व प्राप्त झालेली शहरे, समाजाच्या कल्पना आणि लोप पावत चाललेली एकमेकांबद्दलची आपुलकीची भावना याबद्दल नकळत माहिती मिळते. मोठया माणसांच्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा मिळतो. महाराष्ट्रात बरेच साहित्यिक होऊन गेले पण पु. ल. म्हणजे एक वेगळचं रसायन! सत्य वास्तव्याची जाणीव, विनोदांना कारुण्याची झाक आणून सांगणारे पु. ल. एकचं. ‘बटाटयाची चाळ’ बद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की, नाटक पाहतांना-नयनात तरळते पाणी पण मनात हास्याची गाणी !

– अर्निका प्रकाश परांजपे

बास झालं आता उतरवा मुखवटा

आहो, भारत आणि अमेरीका एकत्र आले तर पाकिस्तान डोंगराआड लपणार यात काही शंका नाही, पण तसं होणार कधी? अमेरीका आपली दोन्ही बाजूने इकडून तिकडून पिना मारतेय. आधी त्यांच्या डोळयातच वाळवंटातल्या तस्कराने धुळ फेकलेली आहे. त्याला शोधतांना त्याची पुरेवाट झालेली आहे. ह्याच संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने भारताच्या भव्य संसदभवनावर आक्रमण केले आणि अतेरिक्यांच्या मागणीला उत्तर नाही म्हणून ठाकरे यांची मागणी मात्र अमेरीकेशी झालेल्या चर्चेनंतर आणि सार्क परिषदेनंतर मुशर्रफ याने बेभानपणे उचलली जीभ टाळूलाच चिटकून बसली. गेली 54 वर्ष पाकिस्तान देश अस्तित्वात आहे. यांनी पुरस्कृत केलेला दहशतवाद जगाला माहिती नाही? कालपरवा घातलेला हा मुखवटा काय कामाचा?

– अर्निका प्रकाश परांजपे