वादन

पारंपारिक वाद्य

शास्त्रीय गायक

पंडित भीमसेन जोशी

pandit bhimsen joshi संगीत हि मानवाला मिळालेली महत्वपूर्ण देणगी आहे. त्यातून माणसाच्या भावभावना , इच्छा , जीवनात आलं;आलेले नैराश्य यासर्व गोष्टीवर मत करता येऊ शकते. भारतीय संगीत परंपरेत अनेक कलाकारांचा मोठा वाट दिसून येतो . त्यावेळी आणि आजही संगीत हेच आपले जीवन मानणाऱ्या कलाकारांची भारतात कमतरता दिसत नाही. भीमसेन जोशी जन्म ४ फेब्रुवारी १९२२ कर्नाटक येथील गदग याठिकाणी झाला.

भीमसेनजींचे वडील पेशाने शिक्षक होते. त्यामुळे भीमसेनजींचा संगीताकडे असणारा कल त्यांना आवडत नसे. त्यामुळे कालांतरानेआपली आवड जोपासण्यासाठी घर सोडावे लागले. त्यांनी पुढे उत्तर भारतात जाऊन उस्ताद अब्दुल करीमखाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर या सारख्या अन्य उस्तादांकडे त्यांनी गायन-वादन शिकून घेतले. घरी आल्यानंतर त्यांच्या वडीलानी संगीताचा ओढा लक्षात घेऊन कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळ यांच्याकडे शिकवणी चालू केली. रामभाऊ सवाई गंधर्व होते. त्यामुळे शास्त्रीय संगीत शिकवण्याकडे अधिक भर होता.पुढे त्यांनी लवकरच पुण्यातील हिराबागेत आपली पहिली संगीत मैफिल भरवली. विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत असत. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौ मध्ये एक वर्ष राहून तेथील प्रसिद्ध गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती.

आपल्या गुरूच्या स्मरणार्थ त्यांनी १९५२ सालापासून सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरु केला होता. भीमसेन जोशींनी सुरवात जरी जाऊन केली होती तरीही त्यांना प्रत्येक गायनाचा प्रकार आवडायचा. त्यामुळे जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य हि पदवी बहाल केली भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिण भारत प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. एका ठिकाणी त्यांचा प्रसंग सांगितला आहे, वसंत बहार नंतर भीमसेनजींनी पुन्हा एकदा हिंदीत ठसा उमटवण्यासाठी अमोल पालेकर यांच्या अनकही चित्रपटातून ते झळकले. १९८४ मध्ये आलेल्या या चित्रपटात दोन भजने गाण्यासाठी पंडितजींना बोलावण्यात आले. परंतु त्या आधी हे निश्चित नसताना अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात कोण्या गायकांकडून गावीत, हे चालू असताना जयदेव म्हणाले या भूमिकेसाठी विचार करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा. भीमसेन जोशी यांच्यासारखा हवा तर भीमसेन जोशींचं का नकोत? त्याच वेळी पालेकरांनी पंडितजींना फोन लावला, व त्यांनी दुसऱ्या दिवशी विमान तळावर भेटण्याचे सांगितले.

pandit bhimsen joshi दुसऱ्या दिवशी त्यांची भेट झाली. त्या दोघांनी वाहनांमध्येच बोलायला सुरवात केली. पालेकर म्हणाले अनकही नावाचा सिनेमा करतोय, त्यासाठी दोन भजन आपण गावीत. हे ऐकून पंडितजींनी लगेचच होकार दिला. पालेकर यांच्या सोबत असलेले संगीतकार जयदेव देखील त्यावेळी भावनाशील झाले होते.

पंडितजीनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त गायनावर. त्यांनी विविध संगीत मैफिलीतून संगीताला चालना दिली. त्यांनी केलेल्या संगीतसेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार किशोरी आमोणकर, पंडित जसराज यांना मिळाला आहे.

या महान गायकाचे २४ जानेवारी २०११ रोजी पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.

– पवार गोकुळ एकनाथ