धबधबे

भंडारदरा

Bhandardara भंडारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रखरखीत असतो. १९२६ साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. इथला ‘छत्री’ (umbrella) धबधबा हा अतिशय सुंदर व मनोहर आहे. भंडारद-यापासून ११ कि.मी. वर रंधा धबधबा आहे. हा धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ आहे. महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात.

रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे. अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे. हा किल्ला फारसा वैशिष्टयपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्याजोगा आहे. भंडारदऱ्यापासून २२ कि.मी. असणारे ‘घाटघर’ ठिकाण थरारक ड्रायव्हींगची आवड असणा-यासाठी योग्य आहे. पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी (६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा उपलब्ध आहे. भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.
Bhandardara dam प्रेक्षणीय स्थळे
भंडारदरा धरण

मुंबई-भंडारदरा अंतर १८१ कि.मी. भंडारदरा धरण म्हणजेच आर्थर लेक विल्सन डॅम, अशिया खंडातील एकमेव सर्वात जूने धरण सन १९२६ साली इंग्रजांनी बांधलेले असून ते समुद्रसपाटीपासून ७५० मिटर उंचीवर आहे. धरणाची क्षमता ११ टी. एम. सी. , धरणाचे परिक्षेत्र-१२१.७० चौरस किलो मिटर पाऊस, ३००० मिली मिटर असतो.

अंब्रेला फॉल – (छत्री धबधबा)
Bhandardara भंडारदरा धरणाच्या भिंती लगत असून खूपच रमणीय व सुंदर दृश्य असते.रांधा फॉल – भंडारदरा धरणापासून अवघ्या ११ किलो मिटर अंतरावर आहे. तेथे ४५ मिटर वरून खाली पाणी पडते.

अमृतेश्वराचे मंदीर व रतनगड
भंडारद-यापासून बोटीने ८ किलो मिटर लांब. अमृतेश्वर मंदीर हे हेमाडपंथी शंकराचे शिल्प कलाकृती मंदीर असून १२०० वर्ष पूर्वीचे जुने मंदीर आहे.

घाटघर
भंडारद-यापासून अंतर २० कि. मी. तेथे कोकण कडा आहे.

पेमगिरी
भंडारद-यापासून ५५ कि.मी. अंतरावर असून तेथे वडाचे झाड दिड एकर परिक्षेत्रात पसरलेले आहे.

कळसूबाई शिखर

Kalsubai महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वतावर असून उंची १६६४ मीटर आहे. Location Icon

भंडारद-यास आपण कसे याल ?

हवाई – जवळचे विमानतळ मुंबई.
रेल्वेमार्ग – जवळचे रेल्वस्थानक इगतपूरी, सेंटर रेल्वपासून ४५ किलामिटर.
बसमार्ग – मुंबई – भंडारदरा १८५ कि.मी. , पुणे – भंडारदरा १९१ कि.मी.

आरक्षणासंबंधी माहिती
वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य)महाराष्ट्रात पर्यटन विकास महामंडळ सी. डी. ओ, हटमेन्टस् , मादमकामा रोड,
योगक्षेम बाजूला,मुंबई – ४०००२०
फोन- २०२६७१३, २०२४६२७,
फॅक्स – ९१२२-२८५२१८२२.
Kalsubai वरिष्ठ व्यवस्थापक म. प. वि. म.प्रादेशिक कार्यालय
टी / १ गोल्फ क्लब,
जूना आग्रा रोड नाशिक – २
टेलिफॅक्स – (०२५३) ५७००५९३.

वरिष्ठ व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,
पर्यटक निवास भंडारदरा,
पोस्ट शेंडी ता. अकोला जिल्हा – अहमदनगर
फोन व फॅक्स – (०२५३) ५७००५९३. Location Icon