बळीराजा

काय आहे पाण्याचे नियोजन?

water-planning नियोजन करायचे म्हणजे काय करावे लागते. नियोजन कोणते पण असले तरी त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करन्याचा हेतू असतो. आपण शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देतो पण आपण देतो तेवढे पाणी त्या पिकाला आवश्यक आहे का? याचा विचार केला जात नाही. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पीक चांगले येण्यासाठी भरपूर पाणी लागत नाही.

भोवतीच्या जमिनीला पाणी देत असतो. पाणी केवळ झाडाच्या बुंध्याला आणि त्यातल्या झाडाच्या मुळांना दिले पाहिजे. ते केवळ मुळांनाच मिळावे यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतल्यास आपल्याला पाण्याची मोठीच बचत करता येईल. झाडांप्रमाणेच माणसालाही पाणी लागते. ते प्यायला लागते म्हणून आपण तहान लागताच पूर्ण शरीराला भिजवील एवढे पाणी अंगावर ओतून घेत नाही तर नेमकेच आणि सरळ पोटात जाईल एवढेच पाणीपिकांना ‘मोजकेच’ पाणी लागते आणि ‘वेळेवर’ लागते. आपण जे पीक घेतो, त्या पिकाच्या वाढीच्या कोणकोणत्या अवस्थांत त्यात पाणी दिले पाहिजे, याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि त्या त्या वाढीच्या अवस्थांत त्याला पाणी मिळेल याची योजना आखली पाहिजे. कधीही पाणी देत राहणे हा पाण्याचा गैरवापर आहे. या अवस्थेत सुद्धा आपण किती पाणी दिले पाहिजे याचा विचार करून तेवढेच पाणी दिले पाहिजे. आपण झाडाला पाणी न देता झाडाच्या आपण पितो मग हाच न्याय शेतातल्या पिकांना पाणी देताना लावायचा आहे. तेव्हा नेमके, वेळेवर आणि आवश्यक तेवढेच पाणी देण्याची योजना म्हणजे पाण्याचे नियोजन. पाण्याचे नियोजन करत असताना पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर या संबंधात काही सामान्य माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये याला जलसाक्षरता असे म्हटले जाते.

water-planning साक्षर माणसाला अक्षराची तोंडओळख असते. तशी शेतकर्‍याला पाण्याची तोंडओळख होणे गरजेचे आहे. तिलाच जलसाक्षरता म्हणतात.आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात जेवढे पाण्याचे साठे उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्यांचा वापर केला तरी महाराष्ट्रातली केवळ ३० टक्के जमीन बागायती होईल, असे म्हटले जाते. अर्थात उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला तर हे शक्य आहे. जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याकरिता आवश्यक एवढ्या पाटबंधार्‍याच्या योजना उभारणे. अशा उभारल्या तरच महाराष्ट्रातली ३० टक्के जमीन बागायती होईल. प्रत्यक्षात शक्य असेल तेवढ्या योजना उभ्या केलेल्या नाही. अनेक योजनांना हातच घातलेला नाही. काही योजना पूर्ण झाल्या आहेत तर काही योजनांची कामे अर्धवट राहिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे योजना या शेती पिकविण्यासाठी उभारण्याऐवजी मते मिळविण्यासाठी उभारल्या जातात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा कल कोणतीही योजना पूर्ण न करता अनेक योजना अर्ध्या अर्ध्या करण्याकडे असतो. त्यामुळे महाराष्ट्रात जेवढ्या पाटबंधार्‍याच्या सोयी होणे शक्य आहे तेवढ्या होत नाहीत. त्यामुळे सध्या तरी पाटबंधारे योजनांखाली जेमतेम १५ टक्के जमीन भिजते.

water-planning भारतामध्ये काही राज्यांत पाटबंधार्‍याच्या सोयी अमाप उपलब्ध आहेत. पंजाबमध्ये सगळी जमीन बागायतीच असते. हरियानातही ६० ते ७० टक्के जमीन बागायत आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात पाटबंधार्‍याच्या सोयी आहेत. भारत देशाचे एकूण क्षेत्राशी असलेले बागायत क्षेत्राचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण केवळ १५ टक्के आहे. पाण्याचा जास्तीत जास्त वापर झाला तर हे क्षेत्र ३० टक्के होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात ७० टक्के जमीन ही कायम जिरायत आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणार आहे. ही स्थिती बदलायची असेल तर उपलब्ध असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी कसा वापर करता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. . महाराष्ट्रात पाणी कमी. त्यावर पाटबंधारे प्रकल्प कमी. महाराष्ट्रात सारे उपलब्ध पाणी वापरणारे प्रकल्प तयार नाहीत. पण आहेत त्या प्रकल्पांची गणना केली तरी लहान-मोठ्या प्रकल्पांबाबत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. शिवाय महाराष्ट्राची सगळी जमीन सपाट नाही. चढ-उतार ङ्गार आहेत. त्यामुळे पाटबंधारे प्रकल्पांच्या उभारणीचा खर्चही मोठा होतो आणि खर्चाच्या मानाने कमी जमीन बागायती होते. शिवाय पाणी शेतापर्यंत नेण्याचाही खर्च जास्त आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. एखाद्या पाण्याच्या साठ्यापासून पिकांपर्यंत पाणी नेताना आपल्याला नाकी नऊ येतात. त्यातच पण दांडाने पाणी देतो ज्याला मोकाट पाणी म्हणतात. पाण्याचा सर्वात अधिक गैरवापर या दंडात होतो. विहिरीतले पाणी मोटारीने वर काढले जाते आणि विहिरीपासून पिकापर्यंत दंडाने पाणी नेले जाते. ते दंडात झिरपते , जिरत पिकापर्यंत जायला बराच वेळ लागतो. एवढा वेळ निसर्गाने उपलब्ध करून दिलेले अनमोल पाणी दंडातच संपून गेलेले असते. या पाण्याने दंडात काय पीक येते का ? या पाण्याचा उपयोग काय? दांडात येणारे निरर्थक गवत हेच त्याचे उत्पन्न. यालाच म्हणतात पाण्याचा अनुत्पादक वापर. काही काही शेतात तर दंडात पाणी तासभर जिरते आणि प्रत्यक्षात पिकाला अर्धा तास मिळते. दंडात जिरणारे पाणी हे गरिबीचे आणि शेती न परवडण्याचे सर्वात मोठे कारण आहे. पाण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो, पण पाणी मिळावे म्हणून एवढा आटापिटा करण्यापेक्षा आहे ते पाणी विचारपूर्वक वापरावे. पाण्याची बचत म्हणजे पाण्याचे नियोजन आहे.

– अमोल मारुती निरगुडे