बळीराजा

पावसाच्या पाण्याचे नियोजन

rainwater-management जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेच पाणी वाहून वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तर पाण्याचा हा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे व ‘पाणी साठवणे’ या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे त्यात घट होत नाही.जल व्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून पाइपलाइन्स शहरांपर्यंत नेणे व पाण्याचा फ्लश सोडून घरातील घाण बाहेर घालवणे एवढा मर्यादित अर्थ नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय, त्यासाठी पाण्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याचा शहाणपणा आपल्या अंगी आला पाहिजे. अन्यथा सर्वाना पुरवता येईल एवढे पाणीच राहणार नाही.भारताच्या उष्ण वाळवंटात, कुंडी हे अतिशय साधे साठवण-तंत्रज्ञान वापरून जलव्यवस्थापनाचा मोठा परिणाम साधला आहे. कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या जमिनीच्या तुकडय़ावर तेथे पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. हे पाणी मग उतारावरून विहिरीत जाऊन साठेल अशी व्यवस्था केली आहे. जर पाऊस एकंदर १०० मि.मी पडला आणि ते सर्व पाणी साठवले तर एक हेक्टर जमिनीवर १० लाख लिटर पाणी साठवता येते. देशात काही ठिकाणी पुराच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. एका ढगफुटीतही एवढा पाऊस पडू

rainwater-management शकतो हेही लोकांना माहीत आहे. पावसाचे पाणी साठवून ते उर्वरित वर्षभर भूजल साठय़ात पाणी मुरवणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी जेव्हा व जिथे पडेल तिथे साठवणे. जमिनीवर किंवा जमिनीच्या खाली ते साठेल अशा रीतीने व्यवस्था करणे गरजेचे आहे. आज आपली शहरे खूप लांबून पाणी मिळवतात. शहरी-औद्योगिक पट्टय़ातच पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यांनी त्यांची जलसाधने वाढवण्याकडे दुर्लक्ष केले. पाणी साठवण्याचे व त्याचा कमी वापर करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जलप्रक्रिया प्रकल्पांअभावी पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागात भूजल पातळी घटत आहे, कारण बोअरच्या विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढत आहे. नगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत त्यामुळे बोअर विहिरी खोदल्या जातात व भूजलाचा उपसा केला जातो त्यामुळे त्याची पातळी कमी झाली आहे, अशा प्रकारे पाण्याची टंचाई वाढतेच आहे. पण खरी शोकांतिका वेगळीच आहे; ती म्हणजे जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा शहरातील लोक गळा काढतात. भारतात आधुनिक काळात शहरांना पावसाच्या पाण्याचे महत्त्व समजून देण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात व वसाहतीत तर झालेच पाहिजे. परंतु आता पुन्हा शहरांनजीक तरी जलटाक्या तळी बांधणे गरजेचे आहे. जवळपास प्रत्येक शहरात अशा टाक्या होत्या, ज्या पूरस्थितीत पाणी साठवून भूजलाचे पुनर्भरण करीत असत पण शहर नियोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाणी साठवण्यासाठी जमीन राखून ठेवली नाही. आज या टाक्यांच्या रूपातील जलसाठे अतिक्रमित आहेत, काहींची गटारे बनली आहेत, काहींमध्ये कचरा भरला आहे, काहींमध्ये पाणी भरले पण ते निष्काळजीपणाने वाहून जात आहे अशी दयनीय अवस्था आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांना पाणी साठवण्याचे, जलसंधारणाचे प्रशिक्षण दिले जात नाही.

पाण्याची साठवण कशी कराल?

rainwater-management घरगुती पाणी साठवण – छतावरून आणि छपरावरून गोळा केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्यामुळे अशा पाण्याला प्रक्रिया करून वापरणे आवश्‍यक ठरते. पावसाचे पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाणी साठवण टाक्‍यांमध्ये पाण्याची साठवण करावयाची झाल्यास अशा टाक्‍यांना झाकण असणे गरजेचे असते. तसेच शेवाळाची वाढ थांबवणे आणि पाणी दूषित होण्याचा धोका कमी करणे शक्‍य असते. घराशेजारी मोठा खड्डा घेऊन तो आतून प्लॅस्टर करावा लागतो. त्यामुळे त्या खड्ड्यात निचऱ्याचे पाणी शिरण्यास प्रतिबंध होतो. तसेच बाहेरून वाहून येणाऱ्या पाण्यासही प्रतिबंध करता येतो. जेव्हा पाणी कपातीचे प्रश्‍न निर्माण होतात. नंतर छतावर पडणारे पाणी एका पाइपद्वारे त्या खड्यात सोडता येते तेव्हा शहरी भागासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त ठरेल. या पद्धतीने जेथे पाणी वापरावयाचे आहे तेथेच ते साठवून त्याचा उपयोग करणे शक्‍य आहे.

पाझरतलाव – जलविरोधी खंदक कठीन खडकापर्यंत न नेता मध्येच थाबविला जातो. खंदक व खडक यांच्यामधून पाणी पाझरून जमिनीत राहते; त्यामुले ओढा प्रवाहित राहतो जवळच्या विहिरिंचे पाणी टिकते. तलावातिल पाणी जनावरांना उपयोगी पडते.

गावतळी – गावतळयांमधे सुद्धा याचप्रमाने पाणी साठविता येते. किहि ठिकाणी त्याचजागेवर खणुन त्याच मातीचा खालच्या बाजूला भराव टाकून तालाव केला जातो व पाणी साठविले जाते.

नालाबंडिंग – पाण्याचा साठा ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी तो केला पाहिजे. डोंगरउतारावर एखाद्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरु होतो. या प्रवाहावर वा नाल्यावर प्रवाहाच्या मध्यापासून वा सुरुवातिपासुन तकाखाली राक अशा प्रकारे काही अंतरावर बांध टाकले जतात. हे बांध माती-मुरमांचे किंवा विटा-वालू सिमेंटही असू शकतात.

साठवण तलाव – हा तलाव लघुपाटबंदाऱ्यापेक्षा लहान असतो व त्याला कलावे नसतात. हीच संकल्पना ‘शेतातली’ तयार करण्यासाठी ही आहे. जगेवराच उपलब्ध असणारे खडक, गोटे, दगड, माती, मुरूम, हे साहित्य तसेच पॉलिथीन कगद वापरुन असे तलाव तयार केले जातात. यांचा उपयोग पिकाला एखादे संरक्षक पाणी देण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी या दृष्टीने होऊ शकतो.

कोल्हापूर बंधारे – ज्या ठिकाणी नाल्याचे पात्र खोल आहे व पाया चांगला आहे, अशाठीकाणी कोल्हापूर पद्धातीचे बंधारे बांधता येतात. त्यांना उंचीचे बंधन नसते. या पध्दतीत ते चार फूट उंचीचेही असू शकतात. मोठा पूर् येउन गेल्यानंतरच या ठिकाणी पाणी आडविले जाते.

– अमोल मारुती निरगुडे