हत्ती आणि मुंगी
हत्ती आणि मुंगीची जमली मैत्री
दोघांनी मिळून खाल्ली संत्री
संत्र्याची साल हत्तीच्या डोळयात पिळली
हसता हसता.. मुंगीने बी गिळली
हत्ती लागला डोळे
चोळू मुंगी लागली गडबडा लोळू
दोघांची ऐशी फजिती पाहून
चिमणीने आणले पाणी वाहून
हत्तीने खसा-खसा डोळे धुतले
मुंगीने गटा-गटा पाणी प्यायले
चिमणीने दोघांची समजूत काढली
दोघांची भांडणे आणखीनच वाढली
दोघांनी घेतली एकमेकांशी कट्टी
मैत्रीला मिळाली कायमची सुट्टी
|
सूर्यफूल
सूर्याला पाहून
सूर्यफूल सूर्याहून
तेजस्वी झालं
उमलता उमलता
सोनेरी किरणाचं
अमृत प्यालं
हृदयातला आनंद
डोळयांत भरून
सूर्यास निहाळत राहिलं
तळपत्या सूर्याला
मायेचा ओलावा देत
सूर्यासाठी आयुष्य वाहिलं
|
पिकनिक
जंगलातले प्राणी एकदा चालले होते पिकनिकला
घोडयांची गाडी होती बसायला
पुढे चालेले होते वाघोबा
गाडी चालवत होते कोल्होबा
मनीमाऊने घातला होता पांढरा पांढरा ड्रेस
त्याला होती छान छान लेस
अस्वलाने घातला होता काळा काळा कोट
त्यावर काढली होती छान छान बोट
माकडे हरणे ससे मंडळी
सर्वजण बसली होती गाडीत
गाडी लागली चालायला
सर्व जण लागले ओरडायला
सर्वांचा आवाज ऐकून
हत्ती बुवांनी वाजवली शिट्टी
ओरडायचं कोणी नाही मुळीच
नाहीतर त्याला पाठवू घरीच
|
कोंबडी
एक होती कोंबडी
तिला मिळाली एक घोंगडी
मग तिची पळाली थंडी
तिने घातली दोन छान अंडी
घोंगडीच्या आत अंडी ठेवली
दोन पिल्ले त्यातून निघाली
पिल्ले होती गोरी गोरी पान
नव्हतेच मुळी पण त्यांना कान
कोंबडीने आणला पिल्लांना खाऊ
त्यात होता भात मऊ मऊ
मटा मटा खाऊ खाऊन
पिल्ले झोपली घोंगडीत जाऊन
|