बालमुक्तांगण कविता – कॉम्प्युटर

खेळ नम्रता पवार सूर्यफूल मकरंद मनगोळी
शतकात नम्रता पवार हत्ती आणि मुंगी मकरंद मनगोळी
दिवाळी नुपूरमाधुरी तिजारे कोंबडी नीता सोहनी
गुढीपाडवा नुपूरमाधुरी तिजारे पिकनिक नीता सोहनी
बालजगत नुपूरमाधुरी तिजारे कॉम्प्युटर नीता सोहनी
सुटीची मजा नुपूरमाधुरी तिजारे होळी परमानंद राऊत
आजीचा उपवास नुपूरमाधुरी तिजारे कान्हा मारू नको पिचकारी श्रीधर वसंतराव घुले
सुर्य आणि चंद्र नुपूरमाधुरी तिजारे लबाड कोल्होबा दिपक शिंगण

कॉम्प्युटर

एकदा एका माकडाला 
दिसला एक कॉम्प्युटर 
स्क्रीनवर दिसताच त्याचे चित्र
त्याला आली चक्कर
तिकडून आली मनी माऊ
ती बसली कॉम्प्युटरवर जाऊन
तिने दाबले स्पीकरचे बटण
त्यातून आवाज आला म्याऊँ म्याऊँ

मग आला उंदीरमामा
तो चढताच प्रिंटरवर
त्याचा आला एक फोटो
फोटो पडताच मनीमाऊने
त्यावर मारली उडी
मनीमाऊला पहाताच
उंदीरमामाने मारली दडी 

होळी

लाकडे आपण जमवू या
पूजा होळीची करू या 
गाठी आणि नारळ 
होळीत टाकूया 
रात्री गाणे म्हणूया 
होळी रे होळी पुरणाची पोळी॥

नारींगी रंग 
पळसाच्या फुलांचा 
हीरव्या गुलाबी गुलालाचा
पिचकारीत भरूनी सारे रंग 
रंगवूया एकमेकांना॥

प्रेम देण्याचा हा सण 
प्रेम घेण्याचा हा सण 
आनंदाने नाचू गाऊ 
म्हणूया होळी आली॥

लबाड कोल्होबा

एकदा झाली गंमत भारी । 
कोल्हाबांची होती उपाशी स्वारी ॥

इकडे पाहिले तिकडे पाहिले । 
शोधून विचारे हतबल झाले ॥

मग शोधू लागता एक युक्ती । 
कावळेदादा झाडावर दिसती ॥

चोचीत त्यांच्या पाहून बोटी । 
स्तुती केली खोटी – खोटी ॥

कावळे दादा गळा तुमचा फारच गोड । 
रूपाला अन् रंगाला नाही कुणाची तोड ॥

स्तुतीने मग कावळेदादा बहू आनंदले । 
आनंदे ‘काव’ चे गीत गाऊ लागले ॥

इतक्यात मोठी गंमत झाली । 
बोटी एकदम खाली पडली ॥ 
कोल्हाबांनी मग पटकन् गिळली बोटी मटकन् ॥ 

कान्हा मारू नको पिचकारी

राधा नको मारू कान्हा पिचकारी 
माझी रंगाने भिजेल साडी ॥ 

दही दूध देते तुला खायला
तुला काशी सांगू घडी घडी ॥ 

पिचकारीत भरलेत सात रंग
थरथरले माझे बघ अंग

कशी झाले मी पहा बावरी ॥

कृष्णा कसा केलात मनात विचार 
मजूर आहे नंदाचा पोर 

आता सोडतो पिचकारीची धार 
अंग भिजून जाईल तुझे पार 

काढू का अजून तुझी खोडी॥ 
सण असा रंगपंचमिचा 

एकमेका प्रेम देण्याचा 
समजू नको तू ही खोडी ॥