बालमुक्तांगण कविता – बालजगत

खेळ नम्रता पवार सूर्यफूल मकरंद मनगोळी
शतकात नम्रता पवार हत्ती आणि मुंगी मकरंद मनगोळी
दिवाळी नुपूरमाधुरी तिजारे कोंबडी नीता सोहनी
गुढीपाडवा नुपूरमाधुरी तिजारे पिकनिक नीता सोहनी
बालजगत नुपूरमाधुरी तिजारे कॉम्प्युटर नीता सोहनी
सुटीची मजा नुपूरमाधुरी तिजारे होळी परमानंद राऊत
आजीचा उपवास नुपूरमाधुरी तिजारे कान्हा मारू नको पिचकारी श्रीधर वसंतराव घुले
सुर्य आणि चंद्र नुपूरमाधुरी तिजारे लबाड कोल्होबा दिपक शिंगण

बालजगत

हे आहे आमचं बालजगत
मुला फुलांचं असं हे जगत
झाडं, फूलं, फळं करतात
इथं साऱ्यांच स्वागत ।

रंगात बुडवून कुंचले 
काढू लागले कुणी चित्र
चिमणी काढली, गाय काढली
काढलं कुणी कुत्रं ।

तबल्याच्या तालावर नाचू
लागले सारे,
आजी म्हणाली गोष्ट सांगते
बाळांनो इकडे यारे ।

शिकवती इथं नाच गाणी
सर्व मिळूनी ऐकली कहाणी
मुले म्हणाली छान छान
कहाणी आहे खूप महान ।

सुटीची मजा

एक तारखेला माझी, सुरू झाली शाळा
खूप झाली मस्ती, आता काही नियम पाळा
सुटीत आम्हाला नव्हती, अभ्यासाची सजा
खूप खा, खूप खेळा केली मजाच मज्जा

झोपतांना रात्री आजी सांगे गोष्ट
शिवबांची गोष्ट ऐकून वाटे
व्हावं आपणही मोठ्ठं
मामी आणि मामांसोबत केली खूप मस्ती

आम्हा बहिणींची तर व्हायची
रोजच कुस्ती आणि दोस्ती
आता शाळा झाली सुरू
शू ऽऽऽ अभ्यास सुरू आहे
कुणी गडबड नका करू

आजीचा उपवास

आज माझ्या आजीचा उपवास आहे
फराळाला भरपूर भगर आहे, रस आहे, 
रताळयाचा किस आहे.
उपवासाच्या दिवशी माझी मज्जा असते,

माझी आजी मला खूप फराळाचं देते
एक सांगू का मी तुम्हाला,
उपवासाच्या दिवशी
बुट्टीच मारते मी जेवणाला

रोज कर ना ग आजी उपवास,
असं मी म्हणते
माझी आजी मात्र,
माझा प्रेमानं गोड पापा घेते !

सुर्य आणि चंद्र

पूर्व दिशेला सूर्य उगवतो
हळूहळू वर येतो
प्रकाश देवूनी धरतीवरती
पश्चिमेस मावळतो ।

चंद्र नभी हा रात्री उगवतो
कलेकलेने वाढत जातो
सूर्याकडूनी प्रकाश घेवूनी
शितल छाया आम्हास देतो
दिवस उगवता झोपी जातो !