उद्योगवार्ता

नाशिकची सायबरएज सोल्यूशन्स एशियन बॅंकरच्या पुरस्काराने सन्मानित, श्री अनुराग केंगे ह्यांचा सिंगापूर येथे सत्कार

गेले १५ वर्षांपासून नाशिकमध्ये कार्यरत असलेली सायबरएज सोल्यूशन्स ( पूर्वाश्रमीची सायबरटेक नेटवर्क्स ) ही वेबसॉफ्टरवेअर संस्था सातत्याने प्रगोशील उपक्रम राबवत आलेली आहे. नाशिक शहराची पहिली वेबसाईट www.nashik.com तसेच मराठी भाषेतील पहिले पोर्टल www.marathiworld.com ह्यामुळे ही संस्था नाशिककर तसेच परदेशी भारतीयांमध्येही सुपरीचीत आहे. ह्या पुढचे पाऊल म्हणजे सायबरएज सोल्यूशन्सने YES बॅंकेकरीता तयार केलेले वेबवरचे मनुष्यबळ विकास (Human Resource implementation) च्या सॉफ्टवेअरला अशिया खंडातून पहिला क्रमांक मिळाला आहे. सायबरएज सोल्यूशन्सचे संस्थापक आणि सीईओ श्री.अनुराग केंगे ह्यांचा सिंगापूर येथे सत्कार समारंभात प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ह्याबाबत माहिती देतांना श्री केंगे म्हणाले, ” गेल्या काही वर्षांपासून webbased HR softwares हे आमच्या कंपनीचे वैशिष्टय ठरले आहे. भारतातल्या काही अग्रगण्य कॉपोरेट्समध्ये आमची ही सॉफ्टवेअर्स वापरली जातात. कॉर्पोरेट बॅंकसाठी तयार केलेल्या HR software ला हा पुरस्कार मिळाला आहे. ह्या पुरस्कारासाठी अशिया, आखाती देश आणि मध्य अशियातल्या ५० विविध फायनानशियल संस्थांकडून नामांकने आली होती. अशियातल्या काही अग्रगण्य आणि तुलनेने मोठ्या असलेल्या कंपन्या स्पर्धेत असतांनाही सायबरएज सोल्यूशन्सला मिळालेला हा मान आमच्या सायबरएज टीमच्या आणि सीटीओ राजेश शेठ ह्यांच्या मेहनतीचे फळ आहे” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

हा पुरस्कार The Asian Banker तर्फे भव्य सोहळ्यात हा प्रथम पुरस्कार श्री अनुराग केंगेना देतांना श्री. क्रीस कॅपफर, एशियन बॅंकर रिसर्चचे मुख्य, म्हणाले की, “सायबरएज सोल्यूशन्सने तयार केलेले हे HR software संस्थेच्या रोजच्या गरजा पूर्ण करतेच पण त्यापलिकडे जाऊन काही वैशिष्टयपूर्ण फीचर्सही त्यामध्ये एकत्रित करण्यात आली आहे. ज्यामुळे ख-या अर्थाने संस्थेला मनुष्यबळ विकास साधन्यास मदत होते. हे सॉफ्टवेअर डिसाईन करतांना बॅंकेच्या गरजांचा आणि विकासाचा अत्यंत सुक्ष्मपणे विचार केला गेला आहे.” पुरस्कार ठरविण्याची ही प्रक्रीया गेले दोन महिन्यांपासून चालली होती. पुरस्कारांच्या परीक्षकांमध्ये विविध देशांतले अर्थसल्लागार, अर्थशिक्षण तज्ञ आणि कॉर्पोरेट बॅंकींग क्षेत्रातले उच्च अधिकारी होते. त्यामध्ये The Asian Banker Technology Implementation Awards 2010 चे मानकरी नाशिकची सायबरएज सोल्यूशन्स ही सॉफ्टवेअर संस्था ठरली.

उद्योजिका जोत्सना दप्तरदार यांना पुरस्कार

पर्यावरणाशी समतोल राखणारी डास अळीनाशकं व जंतूनाशकं आणि डास नियंत्रणाचे तंत्रशुध्द आराखडे बनवून राज्यातील पालिका क्षेत्रात त्यांचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योत्सना दप्तरदार आणि त्यांच्या मे. डॅपमन्स पेस्ट कंट्रोल ऍण्ड अलाइड सव्र्हिसेस या कंपनीचा भारत उद्योग रतन आणि राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दिल्लीत ‘नॅशनल डेव्हलपमेंट थ्रू इंडिव्हिज्युल काँट्रिब्युशन’ या विषयावरील ३२ वं अधिवेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक प्रोग्राम सोसायटीचे प्लॅन्स ऍण्ड पॉलिसिज ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन १९९१ पासून पालिका क्षेत्रात डासनियंत्रणाचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणं तसंच या कामाचे तंत्रशुध्द आराखडे बनवून हिवतापवाहक डासांचा प्रादुर्भाव रोखण्याचं काम जोत्सना दप्तरदार करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जंतूनाशक कार्बोफिनॉल पॉवर, वनस्पतीजन्य डास अळीनाशक व डास प्रतिबंधकांचे उत्पादनही त्यांच्या कंपनीतर्फे घेतलं जातं. वनस्पतीजन्य कीटकनाशकं पर्यावरणाशी समतोल राखणारी आहे. मानवी जिविताच्या दृष्टीनेही सुरक्षित आहेत. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या रासायनिक कीटकनाशकांऐवजी वनस्पतीजन्य कीटकनाशकं बनवण्यासाठी पाश्चात्य देशही प्रयत्न करत असल्याचं जोत्सना दप्तरदार सांगतात. भारतात औषधी वनस्पती मुबलक असल्याने या वनस्पतीची लागवड आणि निर्मितीतून भारताला आर्थिकदृष्टया चांगला फायदा होऊ शकतो, असं त्याचं मत आहे. या पुरस्कारांनी आत्मविश्वास वाढवला असून यापुढे अधिक चांगलं काम करण्यासाठी बांधील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान त्यांना ऑल इंडिया ऍवॉर्ड तसंच ऑफ इंडिया बिझनेस ऍण्ड कम्युनिटी फाऊण्डेशनच्या वतीने ‘नॅशनल अचिव्हमेट ऍवार्ड फॉर कार्पोरेट लिडरशीप’ पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे.

महाराष्ट्रटाईम्सच्या सौजन्याने