सेवासुविधा

पत्रमुद्रासंग्रह (फिलाटेली)

छत्रपति श्री शिवाजी महाराज (१६२७-१६८०)
प्रकाशन – १७/०४/१९६१
किंमत – १५ नवे पैसे
साडेतीनशे वर्षाच्या यवनी पारतंत्र्यातून महाराष्ट्रभूमीला मुक्त करुन स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना. शिवशक कालगणनेची सुरुवात, अष्टप्रधान मंडळाची स्थापना, स्वराज्याची उभारणी अशा अनेक वैशिष्टयतेने नटलेली शिव कारकिर्द.
लोकमान्य टिळक (१८५६-१९२०)
प्रकाशन – २३/०७/१९५६
किंमत – २ आना
‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच’ असे खडसावून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढयाचे रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या इतिहासातले आद्यपुरुष,’केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व मंडालेच्या कारावासात ‘गीतारहस्यचे’ लिखाण म्हणजेच टिळकपर्वच होय.
धोंडो केशव कर्वे
प्रकाशन – १८/०४/१९५८
किंमत – १५  नवे पैसे
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा उल्लेख आद्यक्रमाने करावा लागेल. स्वत:च्या घरापासून स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरूवात करुन पुढे पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाची (एस एन डी टी) स्थापना कर्व्यांनी केली. भारतरत्न या उपाधीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
विष्णू नारायण भातखंडे (१८६०-१९३६)
प्रकाशन – ०९/०१/१९६१
किंमत – १५  नवे पैसे
भारतीय संगीत क्षेत्रातील एक संशोधक भातखंडे यांनी शास्त्रीय संगीतातील रागांचे शास्त्रशुध्द वर्गीकरण करुन रागांची स्वर लिपीत मांडणी केली. संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यासक्रमही तयार केला. माधव म्युझिक कॉलेज, मॉरिस कॉलेज ऑफ हिंदूस्थानी म्युझिक (भातखंडे विद्यापीठ) या संस्थांची त्यांनी स्थापना केली. अभिनव व रागमंजिरी, संगीत दर्पण अशा अनेक ग्रंथांचें लेखन.
रमाबाई रानडे (१८६२-१९२४)
प्रकाशन – १५/०८/१९६२
किंमत – १५ नवे पैसे
लहानपणी अशिक्षित परंतू पुढे मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेचा अभ्यास. न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी. स्त्री शिक्षणाच्या खंद्या पुरस्कर्त्या. तुरुंगात असलेल्या स्त्रियांच्या हिताच्या रक्षणार्थ कार्य. गरजू, निराधार स्त्रियांच्या कल्याणार्थ मुंबई आणि पुण्यात सेवासदनची स्थापना. स्त्रियांच्या मताधिकार चळवळीत भाग. ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ एक उत्कृष्ट कलाकृती.
img नारायण मल्हार जोशी (१८७९-१९५५)
प्रकाशन – ०५/०९/१९८२
किंमत – ३० पैसे
भारतीय संघटीत कामगार चळवळीचे जनक. ‘भारतीय समाजसेवक’, ‘सोशल सव्र्हिस लिग’ अशा संस्थांच्या कार्यात सहभाग. कामगारवस्तीत अनेक कल्याण केंद्रे, रात्रशाळा, वाचनालये सुरु केली. दिल्लीत ‘विधानसभेचे पिता’ म्हणून सन्मानित.
img भिमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६)
प्रकाशन – १४/०४/१९६६
किंमत – १५ पैसे
थोर सामाजिक राष्ट्रीय नेते. भारतीय घटनेचे शिल्पकार, निर्भीड, झुंजार पत्रकार. दलितांचे कैवारी. इंग्रजी व मराठीमध्ये विस्तृत लेखन, अर्थशास्त्र कायदा, इतिहास, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र हयावर लिखाण. ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ इ. वृत्तपत्रे काढली. ‘शिकून संघर्ष करुन’ सामान्य जनांनी आपले हक्क मिळवावेत अशी त्यांची शिकवण. ते समाजसुधारक व सामाजिक चळवळीचे प्रणेते हाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा आदींची स्थापना केली. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात सहभाग.
img वि. दा. सावरकर (१८८३-१९६६)
प्रकाशन – २८/०५/१९७०
किंमत – २० पैसे
प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावान लेखक, सामाजिक समानतेचे खंदे पुरस्कर्ते असे अष्टपैलू व्यक्तीमत्व. रत्नागिरीत पतीतपावन मंदिर अस्पृश्यांना खुलं करुन सहभोजन घातलं. ‘कमला’ सारखे काव्य, ‘जयोस्तुते श्री महनमंगले’ सारख्या स्फुर्तीगीताचे रचनाकार म्हणजेच वीर सावरकर.
img संत नामदेव (१२७०-१३५०)
प्रकाशन – ११/०९/१९७०
किंमत – २० पैसे
संत परंपरेतील एक महान संत. भागवत धर्माचा प्रसार. विपुल अभंगरचना. हिंदी भाषेतही पद्यरचना. ‘नामदेवजीकी मुखवाणी’ या शिर्षकाखाली ६१ पदे शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात समाविष्ट. पंढरपुरला समाधी.
विष्णू दिगंबर पलुस्कर (१८७२-१९३१)
प्रकाशन – २७/०७/१९७३
किंमत – ३० पैसे
भारतीय संगीतातले एक थोर गायक. संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ची अशी संगीत लेखन पध्दती निर्माण केली. सुमारे ६० संगीत विषयी ग्रंथांचे लेखन. राजाश्रयावर आधारित संगीताला लोकाश्रय मिळवून दिला. संगीत शिक्षण अणि प्रसारासाठी गांधर्वसंगीत महाविद्यालयाची स्थापना केली.
राणी लक्ष्मीबाई (१८५७-१९५७)
प्रकाशन – १५/०८/१९५७
किंमत – १५ नवे पैसे
पैसे महाराष्ट्रातल्या तांब्यांच्या घराण्यातील मनू , झाशीच्या गंगाधरपंत नेवाळकरांची महाराणी. 1857 मधे जनरल ह्यूरोज याने झाशीवर हल्ला केल्यावर ‘मेरी झाशी नही दूंगी’ अशी करारी गर्जना करत ब्रिटिशांशी निकराची झुंज देतांनाच या रणरागिणीचा दुर्दैवी अंत झाला
img आहिल्याबाई होळकर
प्रकाशन – २५/०८/१९९६
किंमत – २ रुपये
आपले इंदूर संस्थान एक आदर्श संस्थान बनविण्याच्या ध्येयाला आहिल्याबाईंनी स्वत:ला वाहून घेतलेले होते. प्रजेच्या हितासाठी अनेक नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे, प्रजाजनांना सतावणा-या चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करणे अशा कार्यातून इंदूर संस्थानाचा त्यांनी नावलौकीक वाढवला होता.
ज्योतीराव गोविंदराव फुले (महात्मा फुले)
(१८२७-१८९०)
प्रकाशन – २८/११/१९७७
किंमत – २५ पैसे
सामाजिक सुधारणेसंबंधी क्रांतीकारी भुमिका मांडणारे विचारवंत लेखक. ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, शेतक-याचा आसुड, सार्वजनिक सत्यधर्म हे त्याचे गाजलेले साहित्य. समाजातील शोषीत घटकांच्या उन्नतीसाठी फुले यांनी आपले आयुष्य वेचले.स्त्री शिकल्या शिवाय तिची आणि पर्यायाने समाजाची प्रगती होणार नाही हे जाणून प्रथम आपल्या पत्नीला शिकवले व स्त्री शिक्षणाचा प्रसार केला.
राजर्षी शाहू छत्रपती
१८७४-१९२२)
प्रकाशन – ०१/०५/१९७९
किंमत – २५ पैसे
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा उल्लेख आद्यक्रमाने करावा लागेल. स्वत:च्या घरापासून स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरूवात करुन पुढे पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाची (एस एन डी टी) स्थापना कर्व्यांनी केली. भारतरत्न या उपाधीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर
(१२७४-१२९६)
प्रकाशन – ०५/०३/१९७७
किंमत – ५ रुपये
संन्याशाच्या घरात जन्म म्हणून हिणवणा-या समाजाबद्दल रोष न मानता उलट बहुजन समाजाला धर्मग्रंथ समजावेत म्हणून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली व त्याच समाजासाठी पसायदान मागितले.
img भिमराव रामजी आंबेडकर
(१८९१-१९५६)
प्रकाशन – १४/०४/१९६६
किंमत – १५ पैसे
थोर सामाजिक राष्ट्रीय नेते. भारतीय घटनेचे शिल्पकार, निर्भीड, झुंजार पत्रकार. दलितांचे कैवारी. इंग्रजी व मराठीमध्ये विस्तृत लेखन, अर्थशास्त्र कायदा, इतिहास, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र हयावर लिखाण. ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ इ. वृत्तपत्रे काढली. ‘शिकून संघर्ष करुन’ सामान्य जनांनी आपले हक्क मिळवावेत अशी त्यांची शिकवण. ते समाजसुधारक व सामाजिक चळवळीचे प्रणेते हाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा आदींची स्थापना केली. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात सहभाग.
img डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
(१८९१-१९५६)
प्रकाशन – १४/०४/१९९१
किंमत – १ रुपया
थोर सामाजिक राष्ट्रीय नेते. भारतीय घटनेचे शिल्पकार, निर्भीड, झुंजार पत्रकार. दलितांचे कैवारी. इंग्रजी व मराठीमध्ये विस्तृत लेखन, अर्थशास्त्र कायदा, इतिहास, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र हयावर लिखाण. ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ इ. वृत्तपत्रे काढली. ‘शिकून संघर्ष करुन’ सामान्य जनांनी आपले हक्क मिळवावेत अशी त्यांची शिकवण. ते समाजसुधारक व सामाजिक चळवळीचे प्रणेते हाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा आदींची स्थापना केली. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात सहभाग.
img भिमराव रामजी आंबेडकर
१८९१-१८५६)
प्रकाशन – १४/०४/१९७३
किंमत – २० पैसे
थोर सामाजिक राष्ट्रीय नेते. भारतीय घटनेचे शिल्पकार, निर्भीड, झुंजार पत्रकार. दलितांचे कैवारी. इंग्रजी व मराठीमध्ये विस्तृत लेखन, अर्थशास्त्र कायदा, इतिहास, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र हयावर लिखाण. ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ इ. वृत्तपत्रे काढली. ‘शिकून संघर्ष करुन’ सामान्य जनांनी आपले हक्क मिळवावेत अशी त्यांची शिकवण. ते समाजसुधारक व सामाजिक चळवळीचे प्रणेते हाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा आदींची स्थापना केली. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात सहभाग.
img डॉ. केशव बळीराम हेडगेवार
(१८८९-१९४०)
प्रकाशन – १८/०३/१९९९
किंमत – ३ रुपये
भारतीय स्वातंत्र्य लढयात असहकार चळवळ आणि सवनिय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभाग.सामाजिक समानतेचा आग्रह. १९२५ साली ‘राष्ट्रीय सेवक संघ’ या शिस्तबध्द संघटनेची स्थापना-हिंदूसमाज संघटीत करुन विधायक कार्य करण्यासाठी.