सेवासुविधा

रींगटोन्स् १

‘वंदे-मातरम’ ह्या आकाशवाणी-टयुनचा रींगटोन
4c2, 4d2, 8-, 8#f2, 8g2, 8#f2,
2g2, 4-, 8g2, 8a2, 4f2, 8e2,
4d2, 4-, 8d2, 8e2, 4c2, 8b1,
4a1, 4-, 8a1, 8d2, 8c2, 8c2,
4b1, 8a1, 8b1, 2g1, 4-, 4g1,
8a1, 8c2, 8d2, 8c2, 2d2, 4-,
8d2, 8f2, 8e2, 2d2, 4-, 4c2,
4d2, 8-, 8#f2, 8g2, 8#f2, 2g2.

हा रींगटोन ‘100 बी.पी.एम.’ ह्या ‘टेंपो’ ला
‘सेव्ह’ करुनच वाजवावा, म्हणजेच तो योग्य लयीत वाजेल.

‘उन-पाउस’ ह्या झी मराठी वरील
सीरीयलच्या शीर्षकगीताचा रींगटोन
8g1, 8g1, 8e2, 8e2, 8d2, 16e2,
16d2, 8c2, 8c2, 8c2, 8b1, 8d2,
8-, 8d2, 8c2, 8a1, 8g1, 8g1,16a1,
16g1, 8e1, 8d1, 8e1, 8#g1, 8a1,
8-, 8a1, 8b1, 8c2, 16e2, 16d2,
8c2, 8c2, 8-, 8c2, 8c2, 8b1, 8b1,
8a1, 8a1, 8e2, 16d2, 16e2, 16d2,
16c2, 8c2, 4c2, 8c2, 4c2.

हा रींगटोन ’90 बी.पी.एम.’ ह्या ‘टेंपो’ ला ‘सेव्ह’ करुनच वाजवावा, म्हणजेच तो योग्य लयीत वाजेल.

‘दिसला, ग बाई दिसला’, ह्या पिंजरा चित्रपटातील लावणीचा रींगटोन

8d2, 8d2, 4e2, 8g2, 32-, 4e2,
8d2, 8d2, 8d2, 4e2, 4-, 16-,
8d2, 8d2, 8d2, 32-, 4d2, 8e2,
8d2, 32-, 4d2, 8#a1, 8#a1,8#a1,
4#a1, 8a1, 4a1, 8#a1, 8g1, 8a1,
8a1, 8g1.

हा रींगटोन ‘160 bpm’ ह्या ‘tempo’ ला ‘save’ करुनच तो वाजवावा, म्हणजेच तो योग्य लयीत वाजेल.

‘पाडाला पिकलाय आंबा’ ‘आज गोकुळात रंग, खेळतो हरी’
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ‘बलसागर भारत होवो’
‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’ ‘वल्हव रे नखवा, हो, वल्हव रे रामा’
हॅपी बर्थ डे टू यू’ ‘मन मोराचा कसा पिसारा फुलला’
‘पप्पा सांगा कुणाचे’ दुर्गे दुर्घट वारी, तुज विण संसारी’
शारद सुंदर चंदेरी राती ‘आम्ही ठाकरं ठाकरं’
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ‘माळयाच्या माळयामंदी’
‘मामाच्या गावाला जाऊ या’ ‘गोविंदा आला रे आला’
‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ‘सांग सांग भोलानाथ’
‘जयोस्तुते’ ‘श्री स्वामी समर्थ जप
‘वेडात मराठे, वीर दौडले सात’ ‘सुखकर्ता दु:खहर्ता’
‘तोच चंद्रमा नभात’ ‘काळया मातीत मातीत’

मित्रहो, आज मराठीवर्ल्डवर आपणासाठी ‘दिसला, ग बाई दिसला’ हा 25 वा रींगटोन सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. ज्या तंत्राविषयी आणि क्षेत्राविषयी मला 9-10 महिन्यांपूर्वी अगदी जुजबी माहिती होती, त्या विषयावर आज मी चक्क लेखमाला(की रींगटोन-माला?) लिहतोय आणि तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, हे सगळे माझ्यासाठी अगदी स्वप्नवतच आहे.

मराठीवर्ल्डवरील रींगटोन-मालीकेची सुरवात कशी झाली त्याची कथा काहीशी गमतीदारच आहे. साधारण 9-10 महिन्यांपूर्वी मला नाशिकवरुन मराठीवर्ल्डच्या सौ. सुवर्णा घुले ह्यांची ई-मेल आली;

‘आपण मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी रींगटोंनस बनवू शकाल का?’, अशी त्यात पृच्छा होती. (माझी हिंदुस्थानी संगीतावरची लेखमाला मराठीवर्ल्डवर सुरु असल्यामुळे, मला संगीत क्षेत्रातील सर्व काही ज्ञात आहे, असा मराठीवर्ल्डच्या चमूचा फार मोठा गैरसमज आहे, त्याचाच हा भाग असावा).

आता खरे सांगायला हरकत नाही, मला त्या वेळेला रींगटोनस हे मोबाईलवर वाजतात, ह्यापलीकडे रींगटोनस विषयी काहीही माहिती नव्हती. त्यामुळे मेलला उत्तर काय द्यावे हे काही सुचत नव्हते, म्हणून ‘ मी प्रयत्न करीन’ असा मोघम ‘रीप्लाय’ दिला. अहो जास्त काय, त्यावेळेस माझा स्वत:चा सेल-फोनसुध्दा नव्हता.दोन- तीन दिवस नुसते विचारात गेले.परंतु रींगटोन बनविण्याची कल्पना अगदी नाविन्यपुर्ण होती, आणि रींगटोन डाऊनलोड करण्यापेक्षा ते स्वत: बनविणे हे जास्त क्रीएटीव्ह व आनंददायक नाही का, ह्या विचारामुळे आपण काहीतरी करायला पाहिजे, असे सारखे वाटत होते. शेवटी मित्राचा सेल-फोन आणला, नोकीयाचा होता.त्यातील रींगटोन हे ‘ऑप्शन’ अभ्यासायला सुरवात केली.गाण्याच्या नोटेशनचे प्राथमिक ज्ञान होते, त्याची मदत झाली. भारतीय संगीतातील स्वरांचे नोटेशन, म्हणजे सा, रे, ग आणि ह्या स्वरांचे इंग्रजी नोटेशन, ज्यांच्या माध्यमातून सेल-फोन मधे स्वर ‘की-इन’ करतात, जसे, भ्, म्, य्, ह्यांचा आपापसातील संबंध शोधुन काढला. ‘कंपोज’ ह्या सबमेनुत जाउन सगळे स्वर वाजवून पाहिले. त्यांच्या मात्रा कश्या कमी-जास्त करता येतात हे पडताळून बघितले.’टेंपो’ कमी-जास्त करुन गाण्याची लय कशी कमी जास्त करता येते ते अभ्यासले.एका गाण्याचे नोटेशन बनवून वाजवून पाहिले. अगदी छान वाजले, त्यामुळे हुरुप वाढला.शेवटी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा रींगटोन हाती लागला. आणि ‘तुम्हीही बनवू शकता रींगटोन’ ह्या लेखाने ह्या रींगटोनमालेचा प्रारंभ झाला.त्यानंतरच्या कालावधीत २५ रींगटोन तयार झाले, आणि ते सर्वच बनविताना माझ्या मनाला अगदी निखळ आनंद प्राप्त झाला आहे.

ह्या सदराला खुप प्रचंड प्रतिसाद मिळाला, जवळ-जवळ 25,000 लोकांनी हे सदर वाचले,रींगटोनस स्वत: बनवून ते वाजवून पाहिले. सदर आवडल्याच्या बऱ्याच मेल्स आल्या. हे सगळे माझ्यासाठी खूप आनंददायक होते.बऱ्याच लोकांनी ‘अमुक रींगटोन बनवून द्या’ अशी फर्माईश केली, काही जमले, काही नाही. काही रींगटोन न जमण्याचे कारण म्हणजे असे की सेल-फोन हे काही स्वतंत्र संगीत-वाद्य नाही, त्याच्या स्वत:च्या अश्या मर्यादा आहेत. केवळ दोनच्या पटीतील स्वर-मात्राच, म्हणजे, 1/2, 1/4, 1/8, 1/16 इ, सेल-फोन मधे(नोकीया) की-इन करता येतात. त्यामुळे ज्या गीतामधे 1/3 अश्या लांबीची स्वर मात्रा आहे, ती सेल-फोनमधे की-इन करता येत नाही आणि त्या गीताचा रींगटोन नीट वाजत नाही. ह्या शिवाय जोड-स्वर किंवा मिंड-स्वर सेल-फोन मधे की-इन करता येत नाहीत. ह्या मर्यादेमुळे मला कितीतरी चांगल्या गीतांचे रींगटोनस बनविता आले नाहीत.

मित्रहो, आपण जे बनवितो आहोत ते ‘मोनोफोनिक’ रींगटोनस आहेत. पॉलीफोनिक रींगटोनसचे तंत्र आणि काही विशिष्ट सॉफ्टवेअर (जसे music master works) वापरुन जवळ-जवळ कुठल्याही गीताचा रींगटोन बनविता येउ शकेल. हा MIDI format मधे बनविता येउ शकतो.

आपल्याजवळ संगणकाशी जोडणी करण्याची सुविधा असलेला सेल-फोन असल्यास, असा रींगटोन संगणकावर बनवून तो ‘इंटरफेस केबल द्वारे’ सरळ सेल-फोन वर डाऊनलोड करता येउ शकतो. ‘नेट’ वर ह्या बाबतीत अधिक माहिती मिळू शकेल. असो.

हे छोटेखानी भाषण संपविण्याआधी मी सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार मानू इच्छीतो, ज्यानी ह्या सदराला उदंड प्रतिसाद दिला.केवळ त्यांच्या प्रेमामुळेच माझा उत्साह शतपटीने वाढला. तसेच सौ. सुवर्णा घुले ह्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना सुचविल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन व कौतुक करु इच्छीतो. ह्याशिवाय मराठीवर्ल्डच्या सौ. अनघा दिघे ह्यांनीही मला वेळोवेळी जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.

अच्छा तर बाय बाय, पुन्हा भेट होइलच! असाच लोभ असू द्यावा.

– जयंत खानझोडे

श्री. जयंत खानझोडे हे इलेक्ट्रिकल इंजिनियर असून ‘महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, पडघा, भिवंडी’ येथे गेली 18 वर्षे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. संगीताविषयी त्यांचा विशेष अभ्यास असून प्रायोगिक कलांच्या सादरीकरणामध्ये त्यांना विशेष रस आहे. कविता, वाचन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.