पूर्वी कटीभूषणाचा उपयोग स्त्री व पुरूष दोघेही करत. त्या काळी कमरपट्टा, मेखला, रशेना, माचपट्टा, साखळया, करकोटा, ही कटीभूषणे वापरत. कटीभूषणे ही बहूदा चांदीची असत. मराठे-पेशवेकाळात नऊवारी साडीवर स्त्रिया कंबरपट्टा घालत. ब-याचवेळा या कंबरपटटयाच्या मध्यभगी खडा असत. उपनयनाच्यावेळी मुंजाच्या कमरेला जे तृणाचे कटीसूत्र बांधले जात त्यास मेखला म्हणतात.
आज या सर्व कटीभूषणांची जागा लहान अश्या छल्ल्याने घेतली आहे.
कबंरपट्टा
हा दागिन्यांमधील अतिशय जुना दागिना आहे. राजघराण्यातील राण्या नऊवारी पातळावर कबंरपट्टा लावत त्यामुळे त्या अगदी रुबाबदार वाटत. हा पट्टा ऍक्युप्रेशरचे काम करतो त्यामुळे पाठदुखी सारख्या विकारांना आळा बसतो. तसेच यामुळे पोटाचा घेर प्रमाणात रहातो.
मेखला
हा कमरेच्या एका बाजुला लटकणारा दागिना आहे. यात नक्षीदार साखळी/वेल असतात. ह्याला दोन टोके असतात. एक टोक साधारण पोटाच्या बाजुला अडकवतात व दुसरे टोक थाडे अंतर सोडून पाठीच्या बाजूला अडकवतात.
छल्ला
हे कटीभूषण भारतात प्रचलित आहे. बहुतांशू ठिकाणी ते वापरेले जाते. छल्ल्यामध्ये वरच्या बाजुस नक्षीदार प्लेट असते. व पाठीमागच्या बाजूस किचेन सारखे चाव्या अडकविण्यासाठी जागा असते.
पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला हा प्रकार आहे. महाराष्ट्रीयन स्त्री ही नथीशिवय पूर्ण होऊ शकत नाही. नाकातील नथींची अनेक नावे आहेत जसे चमकी, लोलक, मोरणी, नथीची ही कल्पना जनावराच्या नाकात असणा-या वेसणीतून निर्माण झाली आहे. मराठा नथ ही भारदस्त, लांब तारेची असते यात लहान मोठे बरेच मणी असतात. ही नथ ओठावर रूळते. तर ब्राह्मणी नथ ही नाजुक, मोजक्या लाल हिरव्या पाचूंची, मोत्यांची असते. सरजाची नथ ही वेणी गुंफल्याप्रमाणे, नक्षीदार विणकाम केल्यासारखी व वजनाने जड असते. हल्लीच्या काळात बायका नथ न घालता नाजुक एकच खडा किंवा मोती असणा-या किंवा सोन्या-चांदीत नाजुक फुलाच्या आकाराच्या मोरण्या (मुरण्या) घालतात.
अगदी गळयाला भिडल्यापासून ते लोंबणारे असे विविध लांबीचे दागिने गळयात असतात. गळयाला अगदी भिडून असणारे दागिने म्हणजे चितांग, चिंचपेटया, वज्रकटिका, ठुशी हे होय.
चिंचपेटी
ही पोकळ सोन्याच्या पेटीने बनवलेली असते. मोत्याच्या नाजूक सरींना यष्टिलता किंवा यष्टिका म्हणत असत. लांबट टपो- आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवितात त्याला एकलट किंवाएकदानी म्हणतात. तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजुक तारेत गुंफलेले असतात. त्याचप्रमाणे मोहनमाळ, गुंजमाळ, जांभूळमाळ, जवमाळा ही बनविल्या जातात.
ठुशी – ठुशी म्हणजे ठासून भरलेले गोल मणी. ठुशी हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिध्द होता.
लफ्फा लफ्फा हा प्रकार म्हणजे मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार. यात हारच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून रेशमी गादी मगच्या बाजूस लावलेली असते. हाराला पाठीमागे अडकविण्यासाठी कडया किंवा रेशमी दोरे असतात.
पुतळया
गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात. पुतळया ह्या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.
मंगळसुत्र
हिंदू संस्कृतीत मंगळसुत्र हा सौभाग्यवती स्त्रीचा महत्त्वाचा अलंकार होय. मंगळसुत्र हे सातवाहन काळापासून चालत आले आहे. या काळात यास कनकसर व कनकदोर असे म्हणत पुढे यादव काळात ते कनकसूत्र व हेमसूत्र नावाने प्रचलीत झाले. नंतर त्याचे नामकरण साज असे झाले.
कोल्हापुरी साज
कोल्हापुरकडच्या लोकांनी हा साज मोठयाप्रमाणात वापरून त्याचे नामकरणअसे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बालपान, शंख, नाग, कासव. भुंगा अशी पदके तारेने समोरासमोर जोडलेली असतात. मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात.
सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे त्यात काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे मणी वापरण्याची प्रथा आहे.
मंगळसुत्रास त्यातील विविध प्रकारांमुळे पुढील नाव पडली आहेत अंबरसा, आयतोळी, कंठा, कारले, गोफ, पेंडे, पोवते, पोत, गुंठण, डोरले, बिरडे. मंगळसूत्रात ‘सवतीची पुतळी’
सुध्दा वापरली जाते. विवाहित स्त्री स्वर्गवासी झाल्यावर तिच्या पतीने दुसरे लग्न केले तर दुस-या पत्नीस पहिल्या पत्नीच्या स्मृत्यर्थ जी पुतळी घालावी लागते त्यास ‘सवतीची माळ’ म्हणतात.