जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.
जगभरातील वाचकांच्या माहितीसाठी, मराठी वर्ल्डवर पुस्तक परिचय.
‘मराठी वर्ल्ड.कॉम’ हे, महाराष्ट्र, मराठी संस्कृती व मराठी भाषा या विषयाला वाहिलेले पोर्टल आहे. सणवार, गाणी मनातली गाणी गळयातली, साहित्यिक, हमखास चुकणारे शब्द, असे निरनिराळे विभाग ‘मराठी वर्ल्ड.कॉम’ हया वेबसाईटवर उपलब्ध आहेत. देश-विदेशातील मराठी भाषिकांना साहित्य व संस्कृती-विषयक सतत अद्ययावत माहिती आम्ही पुरवितो.
मराठीतील प्रकाशकांसाठी, ‘मराठी वर्ल्ड’ने ‘पुस्तक-परिचया’ची एक अभिनव योजना हाती घेतली आहे. मराठी पुस्तकांचा खप वाढविण्यासाठी ही एक सुवर्णसंधीच होय.
१. एकदा पाठविलेले पुस्तक आपल्याला परत मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
२. त्या पुस्तकाविषयी वर्णनपर लेख मराठी वर्ल्डवर प्रसिध्द केला जाईल. |
३. याकरिता रू. २५०/- (रूपये दोनशे पन्नास मात्र) इतकी फी आपल्याला भरावी लागेल. |
त्वरा करा, नोंदणी सुरू आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी, या तत्त्वावर पुस्तक परिचय प्रसिध्द केला जाईल. आपल्या पुस्तकाचा परिचय एकाच वेळी जगभरातील मराठी लोकांना करून देणाऱ्या या सुसंधीचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.