एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात इंग्रजीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. त्यावेळी गुरूला विशेष महत्त्व होते. इतर क्षेत्रापेक्षा संगीत आणि अध्यात्म या क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व होते. परंतु गुरुकुल पद्धतीचा अट्टाहास मागे पडू लागला. गुरुकुल पद्धतीऐवजी इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिले जाऊ लागले. त्याची सावली संगीत क्षेत्रातही पडली. या काळात कौटुंबिक नाते नसतानाही केवळ कलेसंबधीच्या आसक्तीने संगीत शिक्षणाकडे पाहिले जाऊ लागले. या काळातील गुरु-शिष्या संबंधीचे गोड उदाहरण म्हणजेच पं.विषाणू नारायण भातखंडे आणि श्रीकृष्ण नारायण रातंजनकर हे होय.
पंडित विष्णू भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० साली झाला. १८८० साली ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे जाऊन वकिली केली. १९१० पर्यंत वकिलाची नोकरी केली. प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी संगीताची विविध पारितोषिके जिंकली होती. त्यांना बासरी व सतार वादनाची आवड होती. त्यामुळे घरच्यांनीही भातखंडेना विरोध केला नाही. १८८४ लला भातखंडे मुंबईतील गायनोत्तेजक मंडळीचे सभासद झाले. त्या ठिकाणी रावजीबुवा वेलगावकर हे प्रसिध्द धृपदिये त्या ठिकाणी नोकरीला होते. त्यांच्याकडून भातखंड्यानी ३०० धृपद शिकून घेतली. गायनोत्तेजक मंडळीत ज्या गायकांचे कार्यक्रम होत असत त्या ठिकाणी काही चर्चा होत. त्यातूनच भातखंडेना संगीताविषयी भाषण करण्याची आवड निर्माण झाली. कालांतराने काही अडचणीमुळे गायनोत्तेजक मंडळीशी असलेला भातखंडेचा संबंध १९१७ साली संपला. त्यावेळी गायन हा भातखंड्याचा दिनक्रम झाला होता. संगीतातील रागकल्पना, चीजा, रचना यांचा पुरेपूर अभ्यास करून त्यांच्या संशोधन कार्यातून ‘हिंदुस्थान संगीतपद्धती’ नावाचा संगीतग्रंथ तयार केला. हा संगीतग्रंथ सुमारे २५०० पानांचा होता. त्या पुस्तकाच्या पुढे ४ आवृत्या प्रकाशित झाल्या.
या पुस्तकामुळे भातखंडेची कीर्ती, संशोधन अनेक मोठ्या राज्यापर्यंत पोहचले. बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड हे सरकारी संगीत विद्यालय स्थापण्याच्या विचार करीत असताना त्यांना भातखंडेची माहिती मिळाली. बडोद्याच्या महाराजांनी भातखंडेचा सल्ला घेऊन पुढील काम सुरु ठेवले. त्यांनतर सयाजीरावांनी संगीताची तत्व प्रणाली, स्वरलिपी, क्रमिक पुस्तके याविषयी भातखंडेकडून माहिती घेतली. याच चर्चेतून बडोदा येथे १९१६ साली अखिल भारतीय संगीत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संगीतविषयक निबंधवाचन, चर्चा आणि गायनाचे कार्यक्रम आदी साजरे त्यापुढील लखनौ येथील १९२५ च्या परिषदेत संगीताची शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे जाऊन तिचे ‘मारिस कॉलेज ऑफ म्युझिक’ असे नामकरण करण्यात आले. या शिक्षणसंस्थेतील अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धती भातखंडे यांनी तयार केली होती. त्यांनी त्यापूर्वी आखलेली ग्वालेर येथील माधव संगीत विद्यालयाची स्थापना करण्यासाठी योजना त्यांनी इथे वापरली होती.
गायनोत्तेजक मंडळीत असताना गायकांना प्रशिक्षण देण्याकरिता भातखंडे त्या ठिकाणी वर्ग चालवीत असत. त्यांच्याच सूचनेवरून मुंबई महानगरपालिकेने प्राथमिक शाळांत संगीताचा विषय समावेश केला होता.ग्वालेरचे महाराज शिंदे यांच्याकरवी संगीत विद्यालयाची स्थापना केल्यानंतर महाराज्यांच्या सल्ल्यावरून संस्थानातील गायकांची शिक्षक म्हणून निवड केली होती. पाठ्यपुस्तकांची गरज भासल्यानंतर त्यांना क्रमिक पुस्तिकेची कल्पना सुचली. १९१७ ते १९३६ यया काळात क्रमिक पुस्तिकेच्या सहा मालिका प्रसिद्ध झाल्या. या क्रमिक पुस्तिकेत संगीतविषयक तात्विक विवेचन, रागाची वैशिट्ये, चिजांचे विश्लेषण, स्वरविस्तार, लक्षणगीते आणि यया सर्वाची दहा थाटांत विभागणी सविस्तरपणे देण्यात आली आहे. पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा मृत्यू १९ सप्टेंबर १९३६ साली झाला. त्यांनी आयुष्याची पन्नासपेक्षा अधिक वर्षे संगीत साधनेत घालवली. आजही त्यांच्या अनेक पुस्तकांचा संदर्भ घेतला जातो. त्यांचा हिंदुस्थानी संगीतपद्धती हा देखील महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
– पवार गोकुळ एकनाथ