संगीतप्रेमी ऋषितुल्य शिक्षक – डॉ. अशोक रानडे

ashok ranade देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण ह्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने संगीत क्षेत्रातील शिक्षक श्री. अशोक रानडे ह्यांना त्यांच्या विद्यार्थांनी वाहिलेली आदरांजली. मुंबई विद्यापीठात संगीत विभागाचे संचालक असतांना रानडे सरांचं अनेक विद्यार्था​ना मार्ग​दर्श​न मिळालं. ‘संगीताचं सौंदर्य​शास्त्र’, “संगीताचा रसास्‍वाद”, “लोकसंगीतशास्त्र” अशा अनेक विषयांची त्‍यांनीच सुरूवात करून दिली. संगीत कसं ऐकावं किंवा संगीताचे घटक आणि प्रकार काय आहेत हे लोकांना समजावं या हेतूने त्‍यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला. रानडे सरांच्‍या म्‍हणण्यानुसार जे जे संगीताशी निगडीत आहे त्‍याचा संगीताच्‍या अभ्यासकाने विचार केलाच पाहिजे. स्‍वर, लय, ताल, शब्द, भाव हे तर संगीताचे प्राण! नुसतं संगीत शिकणं नव्‍हे, तर संगीत कसं ऐकावं हेही त्‍यांच्‍याच कडून शिकावं! ‘‘संगीताचे रसग्रहण’’ असा एक अभ्यासक्रम संगीतप्रेमी जनतेसाठी विद्यापीठात त्‍यांनी चालवला होता. मोठ्या कलाकारांना कमी मानधनावर विद्यार्थ्या​साठी विद्यापीठात बोलावून त्‍यांनी गायला/वाजवायला आमंत्रित केलंच पण त्‍यांचं ध्वनिमुद्रण करून ठेवलं!

डॉ. अशोक रानडे यांचा परिचय
ashok ranade डॉ. अशोक दामोदर रानडे यांचा जन्म पुणे येथे २५ नोव्हेंबर १९३७ साली झाला. पंडित गजाननराव जोशी, पंडित प्रल्हाद गानू, पंडित लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे श्री. रानडे यांनी अनेक वर्षे ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, पतियाळा घराण्यातील गायकी, राग, बंदिशीची तालीम मिळवली. प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे आवाजाच्या आणि कंठसंगीताच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. संगीताच्या या पारंपारीक तालमी बरोबरच एल. एल. बी करून कायदाविषयक पदवी संपादन करणारे, मराठी व इंग्रजी विषयांमध्ये एम.ए केलेले रानडे, संगीताचा व्यासंग अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून करत होते. मुंबई आकाशवाणीत नोकरी (१९६३ ते ६६), सिंद्धार्थ कॉलेजमध्ये अध्यापन (१९६७ ते ६८) केल्यानंतर डॉ. रानडे यांची निवड मुंबई विद्यापीठातल्या ‘‘संगीत विभाग’’ या केंद्राचे संचालक म्हणून झाली. १९६८ ते ८३, तब्बर १६ वर्षे डॉ. रानडे यांनी या संचालक पदाची धुरा वाहिली. त्यांनतर १९८४-१९९३ या काळात मुंबईच्या ‘एनसीपीए’ येथे रंगभूमी संवर्धन व संशोधन प्रकल्पासाठी सहसंचालक म्हणून कार्यरत होते. स्वतः जयपूर ग्वाल्हेर घराण्याची गायकी गळ्यात घोटवून घेतलेले डॉ. रानडे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताला आपल्या सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. डॉ. रानडे यांचे संगीतशास्त्रातील तसेच आवाजशास्त्रातील कार्य बहुआयामी आहे. त्यांच्या शास्त्रकार म्हणून असणा-या व्यक्तिमत्वाला प्रयोगपंरपरेतील-क्रियाशील-कलाकार-विचारवंत,आवाजसाधक, विद्वत्परंपरेतील- चिकित्सक विश्लेषण करणारा समालोचक, नवीन संकल्पना व विचेचन मांडणारा सैद्धांतिक, संगीत संस्कृतीतज्ज्ञ, आस्वादक समीक्षक, सौदर्यशास्त्री असे अनेक पैलू आहेत.

रानडे सरांना त्यांच्या विद्यार्थ्यांची आदरांजली

चैतन्य कुंटे
रानडे गुरुजींकडून मला प्रत्यक्ष रागसंगीताची तालीम मिळाली. त्यात एखाद्या रागाकडे सम्यक दृष्टीकोनातून कसे बघायचे ते कळले. हाच सम्यक, सकारात्मक आणि पूर्वग्रहरहित दृष्टीकोन स्वतःच्या जीवनसरणीत कसा असावा याचेही त्यांनी सूत्र दिले. शिस्तशीर दिनक्रम, विद्यावंत असूनही सहृदयता आणि विनोदबुद्धी जपणे असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. सतत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन अपडेट असणे त्यांना आवडे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आणि निदिध्यासाने एखाद्या विषयाचा वर्षानुवर्षे अभ्यास करण्याची आणि त्यानंतर तो विषय आपल्या विद्यार्थ्याला तळमळीने शिकवण्याची बांधिलकी ही त्यांनी दिलेली मोठी शिकवण आणि आयुष्यभराची पुंजी आहे.

शुचिता आठल्‍येकर
रानडे सर म्‍हणजे ज्ञान आणि दृष्टी ह्यांचा मिलाफ असं मला वाटतं. एखाद्या रागाकडे, बंदीशीकडे कसं पाहावं, त्‍या बंदिशीचं त्‍या रागाचं काय म्‍हणणं आहे ते समजून घ्यावं आणि मग त्‍याची पेशकश करावी असं सर नेहमी म्‍हणतं. त्‍यांच्‍या मते ‘‘राग’’ म्‍हणजे एक ब्लॉक नाही किंवा फ्लॅट नाही, ज्‍याला एकच दरवाजा आहे. तो एक महाल आहे ज्‍याला अनेक दरवाजे आहेत. त्‍या दरवाजांमधून आत शिरून त्‍या रागांची आपण व्‍याप्‍ती समजून घेऊ शकतो. त्‍यामुळे अशी नजर असणा-या अनेक बंदिशी तुम्‍हालां माहिती असल्‍या तर त्‍या रागाच निरनिराळ्या प्रकारे दर्श​न होतं आणि तुम्‍ही अधिक समृद्ध होता.

मला रानडे सरांची कामाची पद्धत बघायला मिळाली हे माझं भाग्य आहे. ज्‍याप्रमाणे गायन, वादन आणि नृत्‍य हे सगळं मिळून संगीत म्‍हणतात. त्‍याचप्रमाणे संगीतातील गायन, शिक्षण आणि लेखन हे या तिन्‍ही गोष्टी मिळून संगीताचा संगम आणि हा संगम म्‍हणजेच ‘‘रानडे सर’’. हे ज्ञान पुढच्‍या पिढीकडे सोपवण्याचे आम्ही प्रयत्‍न करतोय.

कल्याणी साळुंके
ashok ranade १९९३ सालापासून रानडे सरांकडे रीतसर गाण्याची तालीम सुरु झाली. गायकी शिकवण्याच्या बाबत नेहमी म्हणायचे की मध्यलयीची गायकी येत्य काळाची गरज आहे. अतिविलंबित गाणे ऐकायला आता लोकांना वेळ नाही. त्यांनी शिकवलेले एक एक ख्याल म्हणजे कसदार आणि बंदिस्तपणातही असलेला मोकळेपणा दाखवणारे होते. त्यांच्याकडे मी वॉईस कल्चरचे सुद्धा धडे घेतले. हर त-हेच्या रचना गाण्यात नव्हे तर हर त-हेच्या रचना गाण्याची पात्रता गायकाच्या गळ्यात असावी. आवाजाचे लगाव गायकी प्रमाणे बदल-ण्याची कुवत आवाजामध्ये आणि विचारांमध्ये निर्माण केली. मला आठवते त्याप्रमाणे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सुदेश भोसले पासून श्रुती सडोलीकर ताई अशा सर्व त-हेच्या गायकांच्या मांदियाळीत आम्ही शिष्य मात्र सगळीकडेच असायचो, कारण एकच, हर त-हेची गायकी आम्हाला गाता यावी.

सुरेश बापट
रानडे गुरुजींनी १८ वर्षांच्या तालमीत आत्मज्ञानाकडे जाण्याची वाट दाखवली. राग, बंदिश, आलापी, त्यांच्या मांडणीतील तर्कसंगती आणि शब्दोच्चारातील- सुस्पष्टता ही शिस्त अंगी बाणवली. कलेतील सौंदर्य नेमकेपणाने पाहाण्याची नजर आपल्या दैनंदिन व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होते आणि त्यामुळे आपले जीवन आनंदमयी होते, ही त्यांची सर्वात मोठी शिकवण. आजच्या या स्पर्धात्मक युगात निष्ठेने, शिस्तीने आपण आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहायचे व हाच विचार पुढच्या पिढीमध्ये सुद्धा रुजविण्याचा प्रयत्न करायचा हा मौलिक विचार दिला.

दिनेश अडावतकर
‘आवाजाची जोपासना’ या संबंधी प्रशिक्षण घेण्याचा योग डॉ. अशोक रानडे यांच्यासारख्या मातब्बर व्यक्तिकडून माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी तो भाग्ययोग समजतो. ‘म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेने आयोजित केलेल्या प्राशिक्षणेसाठी माझी निवड झाली होती. रानडे सरांच्या घरीच सहा महिने प्रशिक्षण असल्यामुळे त्याला व्‍्यक्तिगत स्‍्पर्श होता. सरांच्या घराला सिमेंट, विटा यांच्या भिंती नसून पुस्‍्तकांच्‍्या भिंती होत्या. सरांचा संगीत, साहित्य, नाटक, ललित कला, तंत्रज्ञान अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास होता. अतिशय खेळीमेळीच्‍्या वातावरणात हे प्रशिक्षण चालू केल्यावर दबाव नाहीसा झाला आणि आमचाही सहभाग सुरु झाला. आवाजाच्‍्या क्षेत्रातले अनेक बारकावे त्‍्यांच्‍्याकडून शिकायला मिळाले. शब्‍्दांचे उच्चारण, शुद्ध, निर्दोष कसं असावं, काही शब्‍्दांचा उच्चार करताना जो गोंधळ होतो तो संभ्रम कसा टाळावा, आपल्या बोलण्यातून श्रोत्यांना आपलसं कसं करुन घ्यावं याचं मार्गदर्शन सरांकडून मिळालं. वाक्याची सुरुवात मोठ्याने करण्याची सवय सरांनी मोडून काढली. निवेदनाचे वेगळे प्रकार, त्याचे बारकावे, त्‍्यांच्‍्या गरजा आणि त्‍्याची तंत्र आम्हाला शिकायला मिळाली. भाषणांचे वेगळे प्रकार आहेत. शोकसभेतलं, षष्ठ्यापूर्ती सोहळा, एखाद्या सांस्कृतिक भाषण असे वेगळे प्रकार शिकायला मिळाले. रानडे सर काही काळ आकाशवाणीला असल्‍्यामुळे मला फायदा एवढ्यासाठी जास्‍त झाला की आकाशवाणीच्‍्या निवेदनाची भाषा कशी असावी, शब्‍्दांची निवड, शब्दांचे उच्चारण, श्राव्य माध्यम असल्‍्यामुळे चुका कशी होऊ शकतात हे सगळं सरांनी नेटकेपणाने समजावलं. आज मी त्यांच्या आशीर्वादाने उत्त्‍्स्फूर्तपणे आत्‍्मविश्वासाने कोणत्याही विषयावर बोलू शकतो.

इला भाटे
‘‘स्‍्पर्धा कितीही असली तरी शिखरावर गर्दी नसते’’ हे रानडे सरांचं वाक्‍्य मला सतत प्रेरणा देत राहतं. सरांनी मला नुसतं ‘आवाज जोपासना शास्‍्त्र’ शिकवलं नाही तर स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलं ‘शब्‍्द’ हे कसं अभिनयाचं गर्भरुप आहे, ते दाखवून दिलं आणि ‘शब्‍्दांच्‍्या’ मदतीने शब्दांपलिकडचा आशय शोधण्याचा मार्गही दाखवला. वक्‍्तशीरपणा, रियाज, सातत्‍्य यांचं महत्व मी रानडे सरांकडून शिकले. ते म्‍्हणायचे, “भूमिका तुमच्‍्याकडे येण्याची वाट कशाला बघत बसता? रियाज म्हणून तुम्‍्हाला आवडणारी, आव्हान देणारी भूमिका सोडवायला घ्या ना! ”

मकरंद कुंडले
ashok ranade वासुदेव चंद्रचूड आजारी पडले म्‍हणून मला शेखर खांबेटे अशोक रानडे सरांकडे घेऊन गेले. तीन दिवसांमध्ये मला ४० नवीन गाणी वाजवायची होती. मी टेप रेकॉर्ड​र घेऊन गेलो होतो. रिहर्स​ल सुरू झाली की मी विचारायचो, ह्या जागेचं नोटेशन काय, की जेणेकरून मला वाजवायला सोपं पडेल. पण रानडे सरांनी ह्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. ते म्‍हणाले की तू ऐकू येई​ल ते वाजवं. मी ह्याचा अर्थ​ विचारला. ते म्‍हणाले की हाड आणि स्किन ह्याच्‍यामध्ये किती गोष्टी आहेत ते समजून घे. तू मला डायरेक्‍ट हाड विचारतो आहेस तर मी कशाला सांगू. नोटेशनच्‍या आजूबाजूच्‍या गोष्टी समजून घे. कायम ते सांगायचे, तुम्‍ही आज आहात, उद्या नसणार. पण हे संगीत कायम राहणार आहे. फार तर त्‍याचं स्‍वरूप काळानुरूप बदलेल. माणूस छोटा असतो. पण संगीत आपल्‍यापेक्षा मोठं असतं. संगीत कायम बदलत आहे, प्रवाही आहे. काल गायलेला ‘‘यमन’’ आज नसतो. भारतीय संगीताची परंपरा २००० वर्षा​ची आहे. त्‍यामुळे कोणीही नवीन केलं असं म्‍हणू नये. तुम्ही फक्‍त म्‍हणा की मी नव्याने पुढे आणलंय. रानडे सर म्‍हणजे विचारांचा राजवाडा होता . त्‍याच्‍यातलं ‘‘संगीत’’ हे दालन होतं. त्‍या दालनामध्ये आम्‍ही सगळे खेळायचो.

रानडे सरांचं बोलणं, स्पष्ट शब्दोच्चार, आदर्श​ खणखणीत नाणं! त्‍यांचं वागणंही तसंच सरळ, साधं! विषयाचा नेमकेपणा ते विद्यार्थी​ आणि श्रोते यांना अचूकपणे उलगडून दाखवायचे. मोजक्‍या शब्दांत जास्‍तीत सरांकडूनच शिकावं. असे हे ज्ञानयोगी, ऋषितुल्‍य शिक्षक म्‍हणजेच रानडे सर आज आपल्‍यात नाहीत. पण त्‍यांच अस्तित्त्व आहे त्‍यांच्‍या पुस्‍तकांच्‍या माध्यमातून तसंच शिष्यसमुदायांच्‍या रूपांमध्ये!

आभार : श्री चैतन्य कुंटे

पूर्णि​मा पारखी, मुंबई