आधुनिक उखाणे

गुदगुल्या – राजेश अग्निहोत्री

आधुनिक विनोद आपल्या दैनंदिन व एकसूरी आयुष्यात हास्याची कारंजी उडवा. मराठीवर्ल्डच्या वाचकांनी हास्यकॉर्नर सदरासाठी पाठवलेले साहित्य खालील प्रमाणे.या विभागात आम्हाला वाचकांचा सहभाग हवा आहे, तरी आपल्या आयुष्यात घडलेले काही गमतीदार किस्से, विनोद आम्हाला पाठवावे

टिप : हास्यकॉर्नर मधील मजकूरास मराठीवर्ल्ड सहमत असेलच असे नाही.

वन,टू , थ्री
.. चं नाव घेते मला करा फ्री .
इवल्या इवल्या हरिणाचे इवले इवले पाय
…….. राव आले नाही घरला कुठे पिऊन पडले की काय.
चांदीच्या ताटात शिळया भाकरीचे तुकडे
घास भरवते मरतुकडया थोबाड कर इकडे.
चांदीच्या भांडयांना असावा नाशिकचा घाट
……. चं नाव घेते …. च्या डोहाळेजेवणाचा थाट.
शिसवी पलंग त्यावर मखमली गादी अन् किनखापी उशी
मी गेले …. रावांपाशी तर राव म्हणतात ‘ आज एकादशी ‘.
घरापुढे अंगण,
अंगणापुढे ओसरी
ओसरीपुढे माजघर
माजघरात फडताळ
फडताळात चांदीचा भगुला
भगुल्यात ठेवला खवा
… राव आले घरला आता तुम्ही जावा.
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर
…….. चं नाव घेते ….. ची लव्हर.
चंदेरी चोळीला सोनेरी बटन
……. रावांना आवडते तंदुरी चिकन.
गणपतीच्या देवळात शंकराची आरती
…… राव गेले वरती मी राहिले खालती.
स्टुलावर स्टुल बत्तीस स्टुल
….. राव एकदम ब्युटिफूल.
गव्हावर गहू नऊ गहू
लग्न नाही झालं तर नाव कोणाचे घेऊ ?
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू
…… राव दिसतात साधे पण आतून मात्र चालू.
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल
….. राव एवढे हँडसम पण डोक्यावर टक्कल.
आयलीवर पायली पायलीवर भुंगा
….. चं नाव घेतो टांग टिंग टिंगा.
गणपतरावांबरोबर चित्रपट पाहिला त्याचं नाव सायको
वामनरावांचं नाव घेते चिमनरावांची बायको.
वेडीवाकडी बाभळी तिला वेडा-वाकडा पाला
तुकाराम मेला आणि मी सखाराम केला.
….. चा नि माझा संसार होईल सुकर
जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुकर.
गुलाबाचे फूल पाकळी पाकळी उमलले
……. राव गेले खिंडारात त्यांना डुकराने ढकलले.
सायकली होत्या सात मधली सायकल कुचकी
…… राव गेले कामाला अन् मला लागली उचकी.
बाजारातून आणला लसूण
….. राव पडले तुपात त्यांना मी घेतले चाटून पुसून.
पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी धनी
सोडल्या तिघीजणी आणि झालो……. चा धनी.
अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका
मला नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका.
शिडीवर शिडी बत्तीस शिडी
…….ओढतो बिडी आणि मी लावते काडी.
नाच नाच नाच राधे उडवूया रंग
…… जाऊ तिकडे सगळे आहेत जेवणात दंग.
हत्तीवर अंबारी अंबारीवर झूल
……. म्हणजे माझं गुलाबाचं फूल.
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस
………. चं नाव घ्यायला मला नाही आळस.
इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून
……. चं नाव घेते ……. ची सून.
सॉफ्टवेअर, हार्डवेअर शिवाय काप्युटर पूर्ण होत नाही
………… शिवाय मला कश्शात इंटरेस्ट वाटत नाही.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…….. आहे माझी ब्युटीक्वीन
हल्लीच्या जमान्यात सर्वांना समानता आवडे
…….. ने घासली भांडी तर …….. धुवेल कपडे.
हल्लीच्या जमान्यात केली कामाची समसमान वाटणी
मी केली इडली तर ……….. वाटेल चटणी