स्वरानंदनवन – एक आगळावेगळा वाद्यवृंद

Manoranjan संगीत ही सर्वांना उमजणारी भाषा आहे. हृदयाच्या वेदना हृदयाला सांगणारी भाषा आहे. लोकप्रिय मराठी तसेच हिंदी गाणी, रसिकांची मनपसंत उडत्या चालींचीगाणी, लोकनृत्य, शिकारी नृत्य, आदिवासी नृत्य असे विविध सादरीकरण यामध्ये केले जाते. अंध, बहिरे, शारीरिक अपंगत्व असणारे कलाकार या वाद्यवृंदामध्ये आहेत. परंतु, त्यांची चपलता, डौल, रसाळ आवाज आणि कष्ट करून कमतरतेवर मात करण्याची धडपड ही रसिकांच्या मनाला आनंद देणारी ठरते.

जवळपास दीडशे कलाकरांच्या ताफ्यासह हा एक आगळावेगळा वाद्यवृंद उभारला आहे. ज्या अपंग किंवा अंध व्यक्तिंना समाजात संधी मिळत नाही, त्यांच्याकरिता खास निर्माण केलेला असा हा वाद्यवृंद आहे. बाबा आमटे यांच्या निरलस सेवेतून सुरू झालेल्या ‘महारोगी सेवा समिती’ आनंदवन यांच्याशी संलग्न असा हा वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदामागची प्रेरणा ही डॉ. विकास आमटे यांची असून, अशोक हांडे यांनी त्यांना सुरवातीचे सांगितिक साहाय्य देऊ केले आहे. इतर कुठल्याही दर्जेदार ऑर्केस्ट्राच्या तोडीस तोड एक अत्युत्तम असा हा ऑर्केस्ट्रॉ आहे.

संपर्क – डॉ. विकास आमटे-
९८२२४६६७३४

असा मी कसा मी?

आपला स्वभाव खरंच कसा आहे? आजूबाजूची माणसे अशीच का वागतात? आपले इतरांशी कसे पटेल? विवाह कुणाशी करावा? आपल्याला कोणती वर्षे उत्तम आहेत? कोणत्या वर्षी कसे वागले पाहिजे? कोणते करियर आपल्या स्वभावाशी सुसंगत आहे? आपल्यात कोणते सुप्त गुण वा अवगुण आहेत? अशा प्रश्नांची उकल तुम्हाला करावीशी वाटते का?

…अनादी काळापासून मानव आपल्या विविध प्रकारच्या स्वभावाने किंवा वागण्याने समाजात इतरांना आनंद किंवा त्रास देत आला आहे. विचित्रपणे वागणार्‍यांची दखल न घेता, आपण बर्‍याच वेळा तापदायक बाबी सोडून देतो, पण आपल्याला जर आधी कळले, की एखादा माणूस एखाद्या परिस्थितीत असाच का वागतो? तर जगण्यातील, परस्पर संबंधातील दु:ख, वादविवाद कमी करून आपण जीवनात आनंद आणू शकतो.

जन्मवर्ष, जन्मवेळ आणि जन्मवर्षावर अंमल करणारे पंचमहाभूतातील एक तत्त्व- हे घटक माणसाच्या स्वभावनिश्चितीसाठी चिनी लोकांनी महत्त्वाचे मानले. चिनी स्वभावशास्त्राची तोंडओळख सर्वांनीच करून घ्यावी अशी आहे. चला, एकमेकांना ओळखूया व प्रत्येकाचा मार्गही त्यातून सुकर होईल, अशी कामना करूया!

संपर्क – श्री. प्रसाद टिळक
९८२०१८३४२९