पानात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना आपल्याकडे तसे वरचे स्थान आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याच्या लोणच्यांचे दिवस आल्यासारखे वाटते.
डिसेंबर-जानेवारी महिन्यात लिंबाचे लोणचे घातले जाते. याशिवाय कच्ची करवंदे, भोकरे, माइनमूळ, मिरची, विविध भाज्यांची तात्पुरती लोणची ही जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी खाल्ली जातात. उन्हाळयाच्या दिवसात भाज्या फारशा चांगल्या मिळत नाहीत व मिळाल्याच तर त्या खूप महाग असतात. त्यावेळी पूरक तोंडीलावणे म्हणून यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. प्रत्येकाला जेवणात काहीतरी नवीन, चटकदार हवे असतेच. वेगवेगळया चटण्या-लोणची किंवा कोशिंबीरी जेवण अधिक रूचकर बनवितात. अशा चटकदार चटण्या कोशिंबीरींच्या कृती येथे नमूद केलेल्या आहेत.
साहित्य – २ मोठे पिकलेले पिवळे पेरु, चवीनुसार मीठ, साखर १ चमचा, दही १ लहान वाटी.
कृती – पेरु धुवून स्टेनलेसस्टीलच्या सुरीने उभा कापून त्यातला गर ऍ़ल्युमिनीयमच्या रोवळीने गाळावा. गाळताना त्यावर थोडे मीठ व ताक घालावे. बिया फेकून द्याव्यात. बाहेरच्या दळाचे चिंचोक्याएवढे तुकडे करावे. पेरु वास दरवळेल इतका पिकलेला असावा. कच्चा असेल तर कोशिंबीर तूरट होते. स्टेनलेसच्या पात्याची विळी किंवा सूरी नसेल तर पाटयावर उभा वरवंटयाने ठेचावा. त्याची छकले झाली की चमच्याच्या कडेने त्याचे फोडीसारखे बारीक तुकडे करावेत. अथवा पेरु भाजून घ्यावा व नंतर त्याच्या बिया काढाव्यात. त्यात साखर-मीठ-मिरची घालावी. वाढण्याच्या वेळी त्यात दही घालून कोशिंबीर नीट कालवावी. या कोशिंबीरीला वेलदोडयाचा वास चांगला लागतो त्यामुळे आवडत असल्यास वेलदोडा वाटून घालावा.
साहित्य – किसलेला मुळा १ लहान वाटी, गोड दही १ लहान वाटी, भिजलेली चणेदाळ ३- ४ चमचे, मीठ चवीप्रमाणे साखर १/४ चमचा, हिरवी मिरची – एक किंवा दोन (मिठात चुरून किंवा वाटून), २-३ चमचे धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल व हळद, हिंग, मोहरी प्रत्येकी १ चमचा.
कृती – चणेदाळ रवाळ वाटावी किंवा कुटावी. त्यात किसलेला मुळा, दही, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर वगैरे सर्व पदार्थ मिसळावेत. तेलाची फोडणी करून ती शेवटी त्यात मिसळावी.
साहित्य – पिकलेल्या टोमॅटोच्या फोडी १ लहान वाटी, दही अर्धा वाटी, साखर २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, ओल्या नारळाचा चव (असल्यास) २ चमचे, दाण्याचे कूट २ चमचे, हिरवी मिरची – एक किंवा दोन (मिठात चुरून), एक कांदा (आवडत असल्यास), फोडणीसाठी १ चमचा तूप व हिंग, मोहरी, हळद प्रत्येकी १ चमचा.
कृती – मिरचीचे बारीक तुकडे करावेत. टोमॅटोच्या फोडीमध्ये दही, साखर, मीठ, मिरचीची तुकडे, नारळाचा चव, दाण्याचे कूट हे सर्व पदार्थ मिसळावेत. तुपाची हिंग, हळद व मोहरी घालून फोडणी करुन त्यात मिसळावी.
टीप – कोशिंबिरीसाठीचे टोमॅटो पिकलेले पण टणक असावेत, नाहीतर कोशिंबिरीला फार पाणी सुटते, फोडणी नाही दिली तरी चालते दही आंबट असल्यास थोडे दूध घालावे. आवडल्यास दोन तीन काळया मिर्यांची पूड मिसळावी. कोशिंबीर खाण्यास वेळ असल्यास ती फ्रिजमध्ये ठेवावी.

साहित्य – काळ्या सालीची ४-५ केळी, २-३ चमचे घट्ट दही, १ चमचा साखर, मीठ, मोहरी, जिरे, फोडणीसाठी तुप.
कृती – ४-५ केळीची सालं काढून घ्यावीत. नंतर ती मऊसर कुस्करुन घ्यावीत, त्यात घट्ट दही, साखर आणि चवीनुसार मीठ घालावे, वरून तुपातील मोहरी, हिंग, हळदीची चरचरीत फोडणी घालावी. केळी कुस्करुन फार वेळ ठेवल्यास काळी पडतात, म्हणून हे रायते केल्यावर ताबडतोब संपवावे. (केळ हे अत्यंत पौष्टिक असून सारकही आहे. हिरव्या सालीच्या केळीपेक्षा पिवळया सालीची केळी अधिक चांगली. कच्चं केळ कधीही खाऊ नये.)