साहित्य – १ कप बटाटे – उकडून, साले काढून आणि फोडी करुन
१/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे )
१/२ कप डाळिंबाचे दाणे
१/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी
१/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी
१/४ कप उकडलेले शेंगदाणे
१/४ कप किसलेले गाजर
२ कप कुरमुरे
१ कप शेव
१/२ कप खजूर-चिंचेची चटणी (आईने केलेली)
२ टेबल स्पून हिरवी चटणी (आईने केलेली)
मीठ चवीनुसार
कृती – १. वरील सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घ्या.
२. लगेचच खायला घ्या.
साहित्य – मूठभर मूग, मटकी, चवळी, हरभरे, मसूर भिजवून मोड आणावेत, ओले खोबरे पाव वाटी, कोथिंबीर धुऊन बारीक चिरलेली, टोमॅटो-कांदा , घट्ट दही अर्धी वाटी, तिखट, मीठ.
कृती – मोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्यात तिखट मीठ मिसळून वर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीसाठी साखर घालून दही घालून खायला द्या. ही भेळ विटामिन ई आणि प्रथिनयुक्त आहे.
साहित्य – पाव वाटी सर्व प्रकारची कडधान्ये, सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, उडीददाळ इ. तळणीसाठी तेल, चवीनुसार तिखट मीठ, मूठभर धुवून वाळवून भाजलेले तीळ, एक चमचा हळद.
कृती – प्रथमच सर्व धान्ये-कडधान्ये भिजवून मोड आणा नंतर ती सर्व थोडीशी वाळवून भाजा. नंतर त्याचे मिक्सरमध्ये पीठ करून त्यामध्ये तिखट, तीळ, मीठ, हळद, घालून एक चमचा तेल टाकून कोमट पाण्यात भिजवा. पीठ मळून घेऊन कडबोळी करून तळावी.
साहित्य – मोठे बीट, तीन वाटया रवा, अर्धी वाटी कणीक, एक चमचा तिखट, एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आमचूर, दोन कांदे, एक चमचा मैदा, मीठ, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.
कृती – बीटरूट उकडून घ्यावे, कांदा अगदी बारीक चिरावा. कणीक व रवा कोरडाच भाजून घ्यावा. गार होऊ द्यावा, नंतर सर्व एकत्र करून पाणी टाकून पीठ तयार करावे. सपाट तव्याला तेल लावून त्यावर डावाने थोडे पीठ घालून उतप्पा घालावा. ओल्या डावाने पीठ सारखे करावे, झाकण ठेवावे, नंतर झाकण काढून कडेने थोडे तेल सोडावे व उलटवावे. दोन्ही बाजूने लालसर झाल्यावर काढावा व चटणीबरोबर खाण्यास द्यावा.