उद्योजक - उद्योजकांच्या मुलाखती

विजयश्री सोवनी – ज्वेलरी डिझाइनर

vijayshree-design असे म्हटले जाते पोषाख म्हत्त्वाचा असला तरी दागिना माणसाला वेगळेपण देतो. पुरातन काळापासून दागिना हा आपल्या समाजाचा संस्कृतिक आणि प्रतिष्ठेचा महत्त्वाचा भाग आहे. बारा बलुतेदारांमध्ये सोनारकीच्या व्यवसायाला प्रतिष्ठा होती. दागिन्यांची खरेदी ही फॅशन आणि गुंतवणुकीच्या दॄष्टीकोनातून केली जाते. आजच्या काळात पारंपारिकसोनारांच्या पेढींचा चेहरा-मोहरा बदलला असून बहुतेकांचा ‘ब्रॅन्ड’ तयार झाला आहे. त्यामुळे दागिन्यांच्या कलाकुसरीलाही तितकेच महत्त्व आले आहे. मराठीवर्ल्ड डॉट कॉमने विजयश्री सोवनी ह्या ज्वेलरी डिझायनरशी ह्या संवाद साधला. वेगळ्या वाटेने करीयर करणा-या ह्या युवतीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

विजयश्री, ज्वेलरी डिझाइन हे करीयर म्हणून कसे आहे ? तुम्ही ह्याकडे कश्या वळलात ?
ज्वेलरी डिझाइन हा कलात्मक व्यवसाय असून त्यामध्ये डिसाइन्स (आराखडा) तयार करणे, कलाकुसर करणे आणि दागिना घडवणे अपेक्षित आहे. आजच्या काळात ह्याला खूपच मागणी आहे. हल्ली लोकांना स्वत:चे व्यक्तीमत्व खुलवणारे हटके दागिने हवे असतात. पारंपारीकतेबरोबरच आधुनिक आणि हटके दागिने घालण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे असे दागिने डिझाइन करणा-या व्यवसायिकांची मागणी वाढली आहे. कलात्मक दृष्टिकोन आणि सृजनशील असलेल्या मुलामुलींसाठी हे उत्तम करीयर आहे.

कलेची आवड मला लहानपणापासूनच होती. एखादा धातुच्या तुकडयाचे किंवा मौल्यवान दगडाचे रुपांतर सुंदरश्या दागिन्यात होते हेच मुळी मला लहानपणापासून आश्चर्यकारक वाटत असे. त्यामुळे पदवीधर झाल्यावर माझ्या आवडत्या व्यवसायाकडे वळायचे ठरवले.

तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये खालिल पुरस्कारांचा मी आवश्य उल्लेख करीन –

  • Winner in the Silvermist Diamonds Category, Rising Star Level at the Rio Tinto Global Diamonds Design Competition 2011.
  • Received an HONORARY MENTION in the REBEL CHIQUE DESIGN COMPETITION 2013 conducted by ROYAL ASSCHER, NEW YORK, in the BRACELET CATEGORY
  • Highly Commended design entry in the Professional jewellery designer category at the F Hinds High Street by Design Competition 2014,IJL London.
  • First Prize in Aakar Jewellery Design Competition at the South India Jewellery Show, Bangalore 2011 organized by The Art of Jewellery Magazine.
  • First runners-up in the Pendant Category of the Tahitian Pearl Trophy 2007-2008, Indian Subcontinent.
  • Awarded Second Prize in the Everyday wear (Stone-Studded) Category of the IIGJ Vision 2005 All India Jewellery Design Competition.

ऑस्कर ह्या मानाच्या सोहळ्याला तुमचे डिसाईन्स कोणी घातले होते ?

vijayshree-designमाझे बक्षिसपात्र ठरलेले हातातले कडे म्हणजेच ब्रेसलेट ‘द सॅण्ड ऑफ टाईम’ हे ऑस्कर २०१२ दरम्यान स्टाईललॅब रेड कार्पेट सेलेब्रिटी सूट मध्ये दाखवले गेले होते. हॉलिवूडची प्रसिध्द केचरचनाकार तबाथा कोफेने ‘द सॅण्ड ऑफ टाईम’ ब्रेसलेट घालून ऑस्करचा कार्यक्रम दूरचित्रवाणीवर संचलित केला होता. इतक्या मोठा आणि प्रसिध्द व्यक्तीने मी डिसाईन केलेला दागिना परिधान केला हे पाहून खूपच उत्साह वाढला.

तुम्हाला दागिने डिसाईनचे भवितव्य भारतात कसे दिसते आहे ?

आतापर्यंत सर्वाधिक सोन्याची खरेदी करणारा देश म्हणून भारताचे नाव अग्रस्थानी होते. पण आता केवल सोने खरेदी न राहता वेगळ्या डिसाईनचा हटके दागिना घेण्याकडे सर्वांचा कल आहे. आपल्याकडच्या अनेक सोनार आणि जहिवरांचे परदेशात उद्योग भरभराटीला आले आहेत त्यामुळे परदेशातून पैसा भारताकडे वळत आहे. फार पूर्वी भारतीय कारागीरांना खूप मागणी होती, आताही ते दिवस परत येत आहेत असे म्हणायला हरकत नाही.

ज्वेलरी डिसाईन नोकरीतल्या संधी कोणत्या ?
vijayshree-design तुम्ही मोठ्या ब्रॅन्डमध्ये पूर्णवेळ ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करु शकता.
तुम्ही मुक्त डिझायनर म्हणून काम करु शकता
तुम्ही सोने व हि-याचे व्यापारी होऊ शकता
तुम्ही स्वत:चा व्यवसायही स्थापन करु शकता.

तुमचे सध्याचे प्रकल्प कोणते आहेत ?
सध्या मी विजयश्री सोवनी नावाने स्टर्लिग चांदीचे दागिने बाजारात आण्याच्या विचारात असल्याने त्या कामात व्यस्त आहे. मी भरपूर प्रवास करते आणि माझ्या आजूबाजूचा परीसर टिपत असते. एखादे शिल्प, झाड, पानं, झाडावड घर बांधणारा सुतार पक्षी असे अगदी काहीही त्यात सामाविष्ट असते. ह्या आजूबाजूच्या गोष्टीतूनच मला नवनवीन कल्पना सुचत असतात. ह्या कल्पनांवर आधारीतच माझी डिसाईन्स असतात. हटके क्रीएटिव्ह डिसाईन्स अल्पदरात ग्राहकांना पुरवणे हेच माझे ध्येय आहे. तुम्ही माझ्या फेसबुक व वेबसाईट पेजवर ही डिसाईन्स पाहू शकता –
www.facebook.com/vijayshreesovanidesigns, https://www.vijayshreesovanidesigns.com