लोकजीवन

आदिवासी

आदिवासी नृत्याचा उगम देवतांच्या नृत्यांनमधून
adivasi भारतात आदिवासी नृत्याचा उगम देवतांच्या नृत्यांनमधून झाला आहे. देवापर्यंत पोहचण्यासाठी नृत्य करणे हा एक मार्ग आहे अशी समजूत असल्याने आदिवासींची नृत्ये धर्मभावनेशी संलग्न असतात. त्याचे निरनिराळे धर्मविधी नृत्यमय आहेत. सामाजिक उत्सव समारंभ त्याच प्रमाणे शिकार, कृषीशी संबंधित कामे या सर्व बाबींशी नृत्ये जोडलेली आहेत. गाण्यातून, नाचण्यातून ते आनंद व्यक्त करतात आणि त्यातूनच जीवन जगण्याचा उत्साह व आनंद मिळवितात. महाराष्ट्रातील आदिवासी सामान्यपणे सुगीच्या दिवसात बेफामपणे नाचतात व गातात. गोंड, कीलाम, कोरकू, भिल्ल, ठाकर, वारली या सर्व आदिवासी जमातीचे पारंपरिक नाचणे हे लहानपणापासूनच्या प्रत्यक्ष सहभागाने एका पिढी पासून दुस-या पिढीपर्यँत चालत आलेले दिसते. त्यांची नृत्य नाट्ये निसर्गातील बदलांशी ऋतूत होणा-या परिवर्तनाशी संबंधित असतात हे पाहिल्या नंतर आदिवासींच्या रंगभूमी वरील एकूण नाट्यमय आविष्काराची पुढील लक्षणे आपल्याला सप्ष्टपणे दिसतात.

१) निसर्ग आणि ऋतू यातील बदलांशी त्यांचा संबंध असतो

२) आदिवासींच्या नृत्यनाट्यात मुख्यत्वेकरून मुखवट्याचा वापर होतो.

३) धर्मविधीशी त्यांचा संबंध असतो.

४) भावड्यातील सोंगे घेणारी व्यक्ती संचारीत अवस्थेत असल्याचे मानले जाते

५) भावड्याचे नृतनाट्य देवातावरणाचा अनुभव डेरे असते. आदिवासींच्या रंगभूमीवर प्रामुख्याने पुरुषांचीच सहभाग असतो. काही नृत्यनाट्यात स्रियांचा सहभाग असतो. पण ब-याच ठिकाणी पुरुषच स्त्रीयांचा वेष घेऊन नाचतात.

६) आदिवासी नृत्यांना रंगमंच नसतो. भावंडं व सोंगे सादर करताना त्यासंबंधी परंपरेने चालत आलेल्या संकेताचे काटेकोर पालन करताना दिसतात.

७) ही सर्वत्र समूहनाट्ये असतात. ह्यात सर्वच सहभागी होतात किंवा होऊ शकतात.

८) आदिवासींनी त्यांच्या नृत्य नाट्यातून स्वतःच्या कलात्मक आविष्काराचे निराळेपण दाखवले आहे. ती त्याच्या जीवनाचे अंग आहे. तिच्यातून त्यांची जीवनदृष्टी प्रकट होते.

– दीपा बोथ

संदर्भ – आदिवासी साहित्य आणि लोककला