जेजुरीचा खंडोबा हे साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. जेजुरीच्या आसपासचं एक गावं. त्यात सुखानं रहाणारं धोंडीबा, सरजा, मुलगा कृष्णा व मुलगी आक्का असं ग्रामीण कुटुंब. रामदासबुवा हा त्यांचा घरचा मित्र. कृष्णा एकदा इतका आजारी पडतो की, विश्वास नसतानाही नाईलाज म्हणून वाघ्याच्या आग्रहास्तव धोंडीबा खंडोबाला मुरळी वहाण्याचा नवस बोलतो. एका वाघ्या अन् मुरळीचा हा धंदाच असतो की, नवीन कोवळया मुलींना मुरळया करायचं अन मग भुजंगरावासारख्या हैवानाकडून पैसे उकळायचे. बिचाऱ्या आक्काच्या बाबतीत नेमके हेच घडते.
पण…. आक्काला हत्यार सापडतं अन त्या अनोळखी हैवानावर वार करून ती दूर गावाबाहेर पळून जाते. इकडे धोंडीबाला आक्काचं बरंवाईट झाल्याचं कळतं अन बायकोचा मुरळी वाहण्यास विरोध असतांनाही त्याने हे काम केले असल्याने पश्चातापापोटी ते जीव देतो. धक्का सहन न झाल्याने सरजाही मरते. कृष्णा एकाकी पडतो. रामदासकाकांच्या आसऱ्याने रहातो पण वर्षानुवर्षे अक्काचा शोधच घेत रहातो.
भुजंगरावाच्या अत्याचारांचा अतिरेक होऊन त्यात एका शेतकऱ्याचा बळी जातो. सी.आय.डी इनस्पेक्टर रेखा त्या गावात ग्रामीण वेषात येते. कृष्णाच्या स्वभावाने ती भारावून जाते व त्यांच्यात जवळीक होते. आक्का तिकडे एका वृध्द मुरळीच्या, शेवंताबाईच्या घरी लहानाची मोठी होते. पण तो अनोळखी माणसाकडून अत्याचाराचा धक्का तिला बचैन करत रहातो. मार्तंड हा सुपारी घेऊन काम करणारा गुंड भुजंगरावाकडेच असतो. मार्तंड शेवंताबाईच्या ओळखीचा असतो.
…….आणि तो दिवस येतो. भुजंगरावाची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गुंड आक्काला पळवून नेऊन त्याच्यासमोर हजर करतात. मुरळयांचे आयुष्य म्हणजे पोट भरण्यासाठी वेश्याव्यवसाय! समाजाने करायला लावलेला हा व्यवसाय. किती दिवस हे चालणार? मुरळयांना सुधारण्यासाठी व त्यांना चांगल्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी अक्का खूप प्रयत्न करते. परंतु काही मुरळयांना आपला धंदा सोडणे आवडत नाही. भुजंगरावाची इच्छा पूर्ण होते का? अक्काचे पुढे काय होते? रेखा व कृष्णाचे पुढे काय होते?
खलनायक वाघ्या व मुरळीचे पुढे काय हाल होतात? स्त्रीयांचे शोषण व अंधश्रध्देपोटी त्यांचे होणारे हाल ही जगभराची समस्या आहे. मुरळी ही एक प्रातिनिधीक इंडियन समस्या आहे.
हा चित्रपट पहायला विसरू नका. लवकरच आपल्या शहरात येत आहे.
निर्मिती आशय कम्युनिकेशन ऍण्ड सर्विसेस प्रा. लि. |
भाषा मराठी दिग्दर्शक सुभाष घोरपडे निर्माती पुष्पलता लेले, वर्षा माडगुळकर कथा, पटकथा, संवाद वर्षा माडगुळकर छायाचित्रण प्रकाश शिंदे गीते जगदीश खेबुडकर, क. रा. माडगुळकर, मोहन बेदरकर व प्राजक्त संगीत राधाचंद्र पार्श्वगायक वैशाली सामंत, प्रदीप कदम, कुणालकुमार, रुपाली बलसाने, उत्तरा केळकर, प्रमोद रानडे ध्वनी शरद चव्हाण कलाकार ऐश्वर्या नारकर, अशोक शिंदे, सारीका, प्रदीप कोतमिरे, मधु कांबीकर, उल्हास आढाव, उषा नाईक, प्रकाश धोत्रे बालकलाकार मधुरा जुगादे, शेखर जाधव तांत्रिक संचालक चंद्रमोहन हंगेकर |
रंगभूषा महेश बराटे (सहाय्यक – प्रसाद चव्हाण) वेषभूषा महेश नारकर (सहाय्यक- राजेंद्र बाचकर) केशभूषा आशा पाटील नृत्य दिग्दर्शक राजू नायडू, अंकुश शिंदे कला दिग्दर्शक वासु पाटील (सहाय्यक – गोरख सुतार , संतोष पवार) स्थिर चित्रण विजयकुमार हरीश्चंद्रे टायटल्स बी एन. सरनाईक प्रॉडक्शन मॅनेजर प्रवीण जाधव, दीपक खैरे लाईटस रविंद्र सागवेकर (बाबू) सिनेमॅटीक सहाय्यक बाळकृष्ण गोमले, ताहीर शेख, मारुती, नंदू, प्रवीण, बाळासाहेब शिंदे, मधु चव्हाण, किसन चव्हाण जनरेटर पाटील, कोल्हापूर भोजन हेंद्रे, बाळासाहेब वांढेकर. निवास हॉटेल प्रेसिडेंट, सासवड स्पॉट बॉईज विनोद, श्रीकांत इनामके, भूषण म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, तुकाराम इनामके |
सह दिग्दर्शक राजू चिटको प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक सतीश पाटील रसायन रावको लॅब, मुंबई संकलन राकेश (स्नेहा रेकॉर्डींग, गोरेगाव) पुनर्ध्वनीमुद्रण तरुण शर्मा निगेटीव कटींग गुलाब सिंग लोकेशन श्री राम मंदिर, सासवड, निसर्गोपचार केंद्र, सासवड, श्री. कऱ्हाबाई मंदिर, सासवड, श्री. खंडोबा मंदिर, जेजुरी |
सहाय्यक |
दिग्दर्शन दीपक साळुंखे ध्वनी सखाराम संगीत माधव आजगावकर, अद्वैत पटवर्धन, आशीष केसकर, अतुल-राहुल, चैतन्य आडकर कॅमेरा नाना खेडकर, राजेंद्र घोरपडे ऍटेंडन्ट लाला |
विशेष आभार |
शिरीष कुलकर्णी, एस. एम. रंजन (निर्माता), सुजाता गुरव |
सहकलाकार |
महादेव गोरे, मधुकर बुधावले, पांडूरंग खंदारे, मंजुषा हिवरकर, सीमरन संदेश, सुजाता गुरव, अर्चना टपले, गीता गंटेलु, गजानन गडकर, अंजली गायकवाड, रेश्मा म्हेत्रे, सोनिया इनामके, कल्याण माडगुळकर, उमेश इनामके, संदीप, काँ. बशीर मुल्ला, गणेश इनामके, आशआ नेगी, बालकलाकार ऐश्वर्या जगताप, वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, महादेव पांचाळ, सुरेश व उज्वला फडतरे, संतोष शिखरे, महादेव सुतार, दीपक जाधव, अशोक जाधव, अशोक शिर्के, भोलेनाथ निघुले. |
प्रसिध्दी –
प्रबोधन माध्यम, पुणे
भ्रमणध्वनी – ९८२२०३६१६३
ऑनलाईन पार्टनर
मराठीवर्ल्ड डॉट कॉम
आभार –
मा. अशोक चव्हाण, सांस्कृतिक मंत्री
मा. राणा जगजीतसिंह पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री
अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर
मा. संजय आपटे, अध्यक्ष, दुर्गा नागरी सह. पतसंस्था, सातारा
सर्व स्टाफ, जिजामाता महिला सह. बँक सातारा
विश्वस्त, श्री. खंडेराय मंदिर ट्रस्ट, जेजुरी
सर्व ग्रामस्थ, सासवड, जेजुरी
श्री. जयसाहेब पुरंदरे, प्रसाद सुर्वे
स्मार्तना पाटील (पोलीस उप अधीक्षक)
प्रकाश पाटील, सुरेश फडतरे, डॉ. खलाटे, डॉ. भरत तांबे, डॉ. धारवाडकर, अशोक जाधव (श्रध्दा फिल्मस) डॉ. वांढेकर, मोहन रावळ (पत्रकार), भगवंतराव तरवडे
कथा आणि व्यथा मुरळीची
‘इंडियन मुरळी’ हा चित्रपट वाघ्या मुरळीच्या प्रथेवर आधारित आहे. स्त्रियांचे धार्मिकतेच्या नावाखाली शतकानुशतके शोषण होते आहे. या शोषणाविरुध्द परिवर्तनाचा आवाज उठवणाऱ्या महिला असा ह्या चित्रपटाचा विषय आहे. ऍडव्होकेट वर्षा माडगूळकर निर्मित आणि सुभाष घोरपडे दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रिमियर २९ जुलै २००५ रोजी नॅशनल फिल्म्स अर्काईव्हज्, प्रभातरोड पुणे – ४ येथे होत आहे.
तसेच ५ ऑगस्ट पासून मल्टिप्लेक्स पुणे येथे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. इंदोरला रिगल थिएटर येथे ३१ जुलै २००५ रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल ह्यात शंकाच नाही.
मुरळी प्रथा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कायदा कमी पडतो आहे.
भारत 21व्या शतकाकडे जात असतांना आजही धार्मिक रुढी परंपरांच्या नावाखाली माहिलांचे होणारे शोषण ही बाब गंभीर आहे.
पौष पौर्णिमेला सुमारे तीन वर्षापूर्वी २ ते २ २/१ वर्षांची मुलगी हात पाय करकचून बांधून खंडोबाच्या पायथ्याशी आणून सोडली. भारतात देवदासी प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. परंतू ही प्रथा आजही गुपचूप चालू आहे. कायदा अस्तित्वात जरी आला असला तरी समाजात जागृती झाली नसल्याने आजही ही ७ वर्षाची ही मुलगी मुरळी म्हणून खंडोबाच्या पायथ्याशी उघडयावर रहाते. मुरळी म्हणून ती आयुष्य जगत आहे. जग म्हणजे काय? हे कळण्याच्या आतच तिला तिच्या आई वडिलांनी मुरळी म्हणून जेजूरीला सोडली.
एवढया कोवळया वयात हातात घाटी घेऊन फिरणारी , कधी भिक मागणारी हसतमुख पुष्पा पाहून आम्ही आजूबाजूला चौकशी केली असता वरील हकीकत समोर आली. त्यानंतर उपयुक्त महिला व बालकल्याण मा. रवि पाटील साहेब यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी मा. महेंद्र गायकवाड साहेब यांच्या मदतीने सदर मुलगी ताब्यात घेऊन नुसार शासकिय नियंत्रण गृहात तिचे पुनर्वसन करण्यात आले. मुरळी प्रथा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी उद्ध्वस्त होणारे आयुष्य सावरण्यासाठी कायदा कमी पडतो आहे. त्यासाठी जनजागृती होणेच महत्त्वाचे आहे.
‘द इंडियन मुरळी’ चित्रपट त्यात नक्कीच खारीचा वाटा उचलेल ह्यात शंकाच नाही.
अॅड. वर्षा माडगूळकर