‘श्यामची आई’चा पहिला प्रिमियर

Shyamchiaai Add ‘श्यामची आई’ ह्या अजरामर चित्रकृतीला आज (शुक्रवार, ६.०३.२००९) रोजी छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये दुपारी ३ वाजता ‘श्यामची आई’चा पहिला खेळ (प्रिमियर) झाला. त्यावेळचे कृष्णा टॉकीज पार्शी माणसाच्या मालकीचे होते. सिनेमाचा पहिला खेळ पंचमातांच्या हस्ते झाला. ह्या पंचमाता होत्या – श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री. अश्या अनोख्या पध्तीने चित्रपटाच्या खेळाला सुरुवात झाली.

त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सेनापती बापट ह्यांच्या हस्ते मुंबईच्या किस्मत चित्रपटगृहात पुन्हा उदघाटन झाले. ‘श्यामची आई’ हा सिनेमा दोन प्रिंटसह रिलीज झाला होता. त्याचे दिवसाला तीन खेळ होत असत. ह्या चित्रपटाची प्रथम जाहिरात नवाकाळ मध्ये २७ फेब्रुवारी १९५३ साली छापली गेली होती. जाहिरात मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे श्री सुभाष छेडा ह्यांनी.

– भाग्यश्री केंगे, नाशिक

साने गुरूजी

Saaneguruji ‘श्यामची आई’ सारखी अजरामर कलाकृती निर्मिणारे संवेदनाशील लेखक, प्रथितयश शिक्षक, बहुजनांचा तसेच कष्टकऱ्यांचा कळवळा असणारे साने गुरूजी, लहान मूल होऊन मूलांमध्ये रमणारे साने गुरूजी… महाराष्ट्राची माय माऊली अशा सार्थ विशेषणाने गौरविले गेलेले साने गुरूजी…साने गुरूजींनी कितीतरी धडपडणाऱ्या मुलांना भावी आयुष्याचे दिशादर्शन केले; आपणही त्यातलेच एक असाल. या महामानवाचे कार्य आजच्या पिढीला ज्ञात व्हावे, आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचा उपयोग व्हावा आणि गुरूजींना आदरांजली वाहावी म्हणून ‘साने गुरूजी’ या चित्रपटाची निर्मिती; त्याचबरोबर गुरूजींच्या गाण्याच्या कॅसेटची निर्मिती ‘श्री क्रिएशन्स’ ही संस्था करीत आहे. तसेच साने गुरूजींच्या निवडक गोष्टी ऍनिमेशन द्वारा प्रसिध्द करण्यात येणार आहेत. चित्रपटासाठी अंदाजे दीड करोड इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अनेक मार्गांनी जमा करण्याचा प्रयत्न आहे. आपणही गुरूजींच्या परिवारातीलच आहात. आणि ज्या हेतूने आम्ही हा चित्रपट करीत आहोत तीच आपलीही सदिच्छा असेल. आणि म्हणूनच आपणाकडून आम्ही मदतीची अपेक्षा करीत आहोत.चित्रपटासाठी मदतनिधी देऊन आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता:चित्रपटासाठी जाहिरात द्या- ही जाहिरात चित्रपटाच्या १,००,००० सीडी मधूनही अर्थातच दिसेल. साने गुरूजी चित्रपटाकरिता सढळ हस्ते मदत करा.

अधिक माहितीकरिता, तसेच जाहिरात देण्याकरिता येथे क्लिक करा व आम्हाला लिहा.

संपर्क :
२०५, अमर आर्केड, कुलकर्णी कॉलनी,
शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२
महाराष्ट्र, भारत फोन – २५३-२३१२२८८, २३१९५५०

छायाचित्रे – ‘श्यामची आई’

shyamchiaai-photo1
shyamchiaai-photo1
shyamchiaai-photo2
shyamchiaai-photo2
shyamchiaai-photo3
shyamchiaai-photo3
shyamchiaai-photo4
shyamchiaai-photo4
shyamchiaai-photo5
shyamchiaai-photo5
shyamchiaai-photo6
shyamchiaai-photo6
shyamchiaai-photo7
shyamchiaai-photo7
shyamchiaai-photo8
shyamchiaai-photo8
shyamchiaai-photo9
shyamchiaai-photo9
shyamchiaai-photo10
shyamchiaai-photo10
shyamchiaai-photo11
shyamchiaai-photo11
shyamchiaai-photo12
shyamchiaai-photo12
shyamchiaai-photo13
shyamchiaai-photo13
shyamchiaai-photo14
shyamchiaai-photo14
shyamchiaai-photo15
shyamchiaai-photo15
shyamchiaai-photo16
shyamchiaai-photo16
shyamchiaai-photo17
shyamchiaai-photo17
shyamchiaai-photo18
shyamchiaai-photo18