मुक्ताई – कथानक

muktai१३ व्या शतकातील संतश्रेष्ठ स्त्री मुक्ताबाई हिच्या जीवनावर सदर चित्रपट आधारीत आहे.
संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ व सोपानदेव या अलौकिक भावंडांची १४ वर्षाची मुक्ता ही धाकटी बहिण आहे. महाराष्ट्राच्या संत मंदियाळीत ज्या स्त्री संत झाल्यात त्यात मुक्ता सर्वात लहान. परंतु बुध्दीने आणि कृतीने खूप मोठी!

आई रुक्मिणी व वडिल विठ्ठलपंत यांच्या वेदांत प्रायश्चित्तानंतर आपल्या मोठया भावडांना आईची माया अन् जननिंदेपासून जगण्याचा आधार देणारी मुक्ता ही आदिशक्तीचं रूप होती.
१६ हजार कूट काव्य करणारी श्रेष्ठ कवयित्री, १४०० वर्ष जगलेल्या हठयोगी चांगदेवाची गुरू, स्वत: उपेक्षित दुर्लक्षित राहूनही स्त्री मनामध्ये धीराने जगण्याचं सामर्थ्य देणारी तेजस्विनी म्हणून सार्थ ठरलेली माई.

वयाच्या १४व्या वर्षी भू-लोकीचं कार्य संपवून कोथळी (मुक्ताईनगर. जि. जळगाव) या तापी-पूर्णच्या तीरावर वीजेच्या रुपात समाधिस्त झाली. महाराष्ट्राच्या भागवत धर्मात, वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आदि संतांबरोबरच मुक्ताबाईचं महत्व अनन्य साधारण आहे. अलौकिक योगी संत ज्ञानेश्वर माऊली असले तरी मुक्ता त्यांची आई होती म्हणून मुक्ताई.

कलाकार

निर्मिती
आशय कम्युनिकेशन ऍण्ड सर्विसेस प्रा. लि.
पटकथा / संवाद -योगेश्वर दत्त, विजय कुवेकर, राजु फुलकर
संगीत – आशिष मुजुमदार
छाया – इम्तियाज बारगीर
गायिका -देवकी पंडित
कला – ज्योती नवरे
संकलन – संतोष गोठोस्कर, नचिकेत, वसंत हरदास
वेशभूषा -सचीन करंबेळकर
कार्यकारी निर्माती – कु. श्रेया (छोटी मुक्ता), केतकी करंदीकर (मोठी मुक्ता) गौरी, गोविंद धर्माधिकारी, प्रतिभा दाते, माधुरी भागवत, गौतम, मुर्डेश्वर, रोहिणी केतकर, सुनिल गोडबोले, सुयोग, आनंद, प्रसाद व इतर

छायाचित्रे

muktai1
muktai1
muktai2
muktai2
muktai3
muktai3
muktai4
muktai4
muktai5
muktai5
muktai6
muktai6
muktai7
muktai7

सहकार्य

अधिकृत संकेतस्थळ
ऑनलाईन पार्टनर – मराठीवर्ल्ड डॉट कॉम www.marathiworld.com/muktai

संपर्क

रुद्रा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड
२/४१०, सुंदर नगर, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – २८
फोन – ०२२-२०६३२१३८
मोबाईल – +९१ ९८२०२ २२७७६