कॄष्णविवरे (Black holes) या शास्त्रीय सत्याविषयी लिहिलेले पुस्तक

blackhol गालचा नबाब सिराज उदाभ्लाने १७५७ साली इंग्रजांना छोटया अंधाय्रा खोलीत पकडल्याने ‘ब्लॅकहोल ऑफ कक्रलकक्रएाा’ असे नाव प्रचारात आले. परंतु या ऐतिहासिक संकल्पनेला शास्त्रीय दॄष्टया अर्थ प्राप्त व्हायला १९६९ साल उजाडावे लागले. याचे ओय अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जॉन व्हीलर यांना जाते. वास्तविक कॄष्णविवरेवरच्या संशोधनाचे श्रेय १९३५ सालीच तरूण भारतीय खगोलशास्त्रझ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना मिळायला हवे होते, पण मिळाले नाही. कॄष्णविवर ही संकल्पना अलीकडे प्रसारमाध्यमे, मासिके, पुस्तके आणि विज्ञानकथांतून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचली आहे. ‘गुढतेबद्दल कुतुहल हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे’, असे व्यापक सापेक्षतेच्या सिध्दांताचा जनक अल्बर्ट आइन्स्टान म्हणतो. कॄष्णविवरे या आकाशातील अत्यंत गुढ वस्तु आहेत. आधुनिक दुर्बिणींचा आणि तंत्रझानाचा उपयोग करून खगोलीय निरीक्षणतंत्रात खरच प्रगती झाल्याने पुर्वी अशक्य वाटणारे वेध आता शक्य झाले आहेत. अशा वेधातून विश्वातील अनेकक्र गुढ गोष्टींचे स्वरूप आजकाल अधिककाधिक स्पष्ट होत आहे.

‘कॄष्णविवरे’ ही मोठया ताय्राच्या जीवनातील शेवटची अवस्था असते. अशा ताय्रातील अणुइंधन संपले की, तो स्वत:च्या कय्क्रद्राकक्रडे ढासळू लागतो. त्यामुळे त्याचे गुरुक्रत्वाकर्षण प्रचंड होते. परिणामी त्याच्यापासस्न प्रकाशही बाहेर पडत नाही. प्रकाश बाहेर पडत नसल्याने तो तारा दिसत नाही. यालाच ‘कॄष्णविवर’ म्हणतात. कॄष्णविवर म्हणजे निश्चित कडा असलेले विवर. त्यात पडेल ते गिळंकॄत करून, आपल्या प्रचंड गुरुक्रत्वाकर्षणामुळे प्रकाशालाही ते पकडून ठेवते. कॄष्णविवराच्या आत स्थलाचे व कालांचे गुणधर्म अत्यंत आश्र्चर्यकारकरित्या बदलतात. या ठिकाणी नेहमीचे भॊतिकशास्त्रातील नियम निरुपयोगी ठरतात.

या पुस्तकत एकदम कॄष्णविवरांकडे वाचकांना न नेता, सुरुवातीला आपले विश्व व ताय्रांच्या निर्मितीची माहिती दिली आहे. माणसांच्या जन्माचा मार्ग एकच असला तरी मरणाचे मार्ग विविध असतात. त्याचप्रमाणे ता्य्रांचा शेवटही वेगवेगळ्या पध्दतीने होतो. ही माहिती करून घेताना या पुस्तकात श्वेतबटस्, न्युटॉन, पल्सार इत्यादींची माहिती सुलभरित्या मिळते. त्यानंतर कॄष्णविवरांची रचना, त्यांचे प्रमुख घटक, इत्यादींची सचित्र महिती सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत करून देण्याचा प्रा. पाटील यांचा प्रयत्न आहे. आजच्या आघाडीच्या शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी विश्व निर्मितीच्या वेळी निर्माण झालेल्या सुक्ष्मकॄष्णविवरांवर जे संशोधन केले आहे त्याविषयी माहितीही येथे दिलेली आहे.

पुस्तकक्रात शेवटी दिलेल्या शब्दार्थांमुळे व पारिभाषिक शब्दांच्या मराठी समानधर्मी शब्दांमुळे हे पुस्तक कुतुहल असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य वाचकांची उत्कंठा भागवु शकेल.

मराठी भाषेत या विषयावर सोप्या भाषेत लिहिलेले हे एकक्रमेव पुस्तक आहे.

पुस्तककॄष्णविवरे
लेखक – डॉ. निवास पांडुरंग पाटील, १/१६ साईदेव हाउसिंग सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक ४२२००५.
प्रकशक – अनिरुध्द अनंत कुलकर्णी, कक्रा टिनय्टल प्रकक्राशन, विजयानगर, पुणे ४११ ०३०
दुरध्वनी – ०२०-४३३७९८२

पष्ठे – ११४, किंमत : रुपये ६० फक्त

शहेनशहा अमिताभ : खिळवून ठेवणारी चरित्रकहाणी

shahenshah अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार हिंदी चित्रपटसॄष्टिच्या इतिहासात झाला नाही. त्याच्याएवढी लोकक्रप्रियता कुणाला मिळाली नाही. त्याच्याइतके प्रेम कुणाच्याही वाटयाला आले नाही. त्याच्याइतका दीर्घकाळ उच्च स्थानी टिकून राहिलेला अभिनेता दुसरा झाला नाही. त्याच्या भाव-भावनांनी ओतप्रोत असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये लोक जेवढे गुंतले, तेवढे इतर कुणातही गुंतले नाहीत. १९७० ते ८० या अस्वस्थ दशकाच्या या ‘अगदी यंग’ नायकाने हिन्दी चित्रपट जनमानसाच्या पातळीवर आणले. १९७० च्या दशकातला अमिताभ सुपरस्टार होता आणि आजचा अमिताभही वेगळ्या माध्यमातून – दूरचित्रवाणीच्या वाहिनीद्वारे सुपरस्टारच बनला आहे. हिन्दी चित्रपटसॄष्टितील ‘अमिताभ पर्व संपले’ अशी भाषाबोलली जात असतानाच त्याला पुर्नजन्म मिळाला आहे छोटया पडद्याच्या माध्यमातून. ‘चलो, हम ऒर आप मिलकर खेलते हॆ , कॊन बनेगा करोडपती’ ची मजा अनुभवण्यासाठी लाखो प्रेक्षक रात्री नऊ वाजता दूरचित्रवाणी संचासमोर बसू लागले आहेत. ‘शहेनशहा’ नंतर कित्येक वर्षांनी प्रथमच अमिताभचे संवाद लोकप्रिय होऊ लागले. ‘कॉन्फीडंन्ट?’, ‘शुअर?’, ‘लॉक किया जाए?’, हे शब्द घराघरांत पोचले आहेत. त्यावर विनोद रचले जाऊ लागले आहेत. ‘के.बी.सी. (कॊन बनेगा करोडपती?) विनोद’ ई-मेल वरून जगभर पोचले आहेत.

भारतीय जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाय्रा अमिताभ बच्चनच्या भव्य जीवनाचा आलेख सहजसोप्या परंतु शॆलीदार मराठीत चितारण्याचा प्रयत्न ‘शहेनशहा अमिताभ’ या पुस्तकात बाबू मोशाय यांनी केला आहे.

कालचा अमिताभ चांगला होता की आजचा अधिक चांगला आहे? या दोन्हीत काही फरक आहे का? अमिताभने आमची निराशा केली, की आशा जागवली? अमिताभ बच्चन आता पॆशाचा गुलाम होऊन स्वत:चे स्वातंत्र्य गमावून बसला आहे, की तो दु:खी जनांना सुखी बनण्याची स्वप्ने आणि सुखी माणसाचे सदरे वाटत सुटला आहे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत बाबू मोशायनी हे चरित्र लेखन केलं आहे. त्यात अमिताभच्या जीवनातील चढउतारांचा आलेख मांडत असतानाच अमिताभबद्दलच्या प्रांजळ आणि प्रसंगी परखड भावनाही लेखकाने व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे अमिताभविषयी आस्था आणि प्रेम बाळगणाय्रा वाचकालादेखील लेखक आपल्याच मनातील भावनांना शब्दरूप देत आहे असं वाटेल. हिंदीतील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन हे अमिताभचे आईवडील. त्यांची नेहरू घराण्याशी असलेली जवळीक, त्यांनी मुलांवर केलेले संस्कार, अमिताभचा चित्रपटसॄष्टीत प्रवेश हे सारे ‘जडणघडणीचे दिवस’ या प्रकरणात वाचताना फारच रोचक वाटते. ‘निराशेच्या मेघांनी आयुष्य झाकळून द्यायचे नाही, तुम्हाला घरात जायचे असेल व तुमची किल्ली हरवली असेल, तर अशावेळी भिंतीवर चढून पलीकडे प्रवेश करायचा’ ही वॄती हरिवंशराय यांनी मुलांच्या अंगी बाणवली होती. या एकाच वाक्यातून अमिताभच्या या चरित्रलेखनाची दिशा स्पष्ट होते. या चरित्रलेखनाच्या सुरवातीप्रमाणेच त्याचा शेवटही लेखकाने अतिशय समर्पक केला आहे.

माणसे गोंधळून गेली आहेत. आपण या माहिती-क्रांतीच्या जगात कालबाह्य ठरू अशी भीती केवळ प्रॊढांनाच नाही तर तरुणांनाही वाटत आहे. त्यामुळे साठीकडे झुकलेल्या अमिताभ बच्चनची वॆचारिक-मानसिक गोची होणे समजू शकते. ही केवळ अमिताभची गोची नाही, ही त्याच्या पिढीचीच गोची आहे. त्याने साध्य व साधने दोहोंचे भान ठेवून मार्गावर यावे. पण आता मिळविलेले नाव व प्रतिष्ठा जाईल असा तरी व्यवहार करू नये. यापुढे तरी करोडपती अमिताभ बच्चन तसे करणार नाही, असा असंख्य प्रेक्षकांचा विश्वास आहे.

अमिताभच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचे हे चरित्रही प्रारंभापासून अखेरपर्यंत वाचकांना खिळ्वून ठेवणारे, अत्यंत वाचनीय आहे.

पुस्तकशहेनशहा अमिताभ
लेखक – बाबू मोशाय
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे ४११ ०३०
पृष्ठे : ३५८, मूल्य : २२५ रुपये