साहित्य – १ वाटी कढीलिंबाची पाने, २ चमचे पांढरे तीळ, ५-६ हिरव्या मिरच्या, चविनुसार मीठ, थोडी पिकलेली चिंच. फोडणीसाठी गोडेतेल २ चहाचे चमचे व हळद, हिंग, मोहरी प्रत्येकी १ लहान चमचा.
कृती – कढईत थोडया तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मिरचीचे तुकडे करून टाकावेत, गॅसवर जरावेळ मिरचीचे तुकडे परतावेत, नंतर त्याच फोडणीत कढीलिंबाची पाने घालावीत व तीळ आणि चिंच घालून परतावे. नंतर त्याच फोडणीत कढीलिंबाची पाने घालावीत व तीळ आणि चिंच घालून परतावे. कढीलिंब कुरकुरीत झाला की कढई खाली उतरवावीव सर्वपदार्थांची पाटयावर किंवा मिक्सरमध्ये चटणी वाटावी.
साहित्य – १ वाटी ओल्या नारळाचा चव, ५-६ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, १ चमचा साखर, १ वाटी कोथिंबीर, अर्धे लिंबू.
कृती – हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे, व कोथिंबीर बारीक वाटा त्यावर ओल्या नारळाचा चव, साखर बारीक वाटून घ्या व लिंबू पिळा.
साहित्य – १ गड्डी लसूणपात, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ वाटी कोथिंबीर, १ लिंबाचा रस, मीठ.
कृती – लसणीची पात बारीक चिरून घ्या, ओले लसूण सोलून घ्या. प्रथम मीठ, मिरच्या व जिरे बारीक वाटून चिरलेली पात व कोथिंबीर बारीक वाटा. नंतर लिबू पिळा. सुंदर हिरवीगार चटणी तयार होते. गरम भाकरीबरोबर छान लागते. ही चटणी २-३ दिवस टिकते.
साहित्य – १ वाटी दोडक्याच्या शिरा, १ वाटी कोथिंबीर चिरून, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, १ लिंबाचा रस, १ चमचा साखर.
कृती – दोडक्याच्या शिरा काढून घ्या. हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, जिरे व कोथिंबीर मिक्सरवर वाटा. लिंबूरस व दोडक्याच्या शिरा घालून गुळगुळीत चटणी वाटा. पुदिना किंवा लसूण पाकळया आवडत असल्यास घाला.
साहित्य – ५-६ हिरव्या मिरच्या, मीठ, १ चमचा जिरे, २ चमचे सायीचे दही व ४ चमचे साधे दही.
कृती – हिरव्या मिरच्या मंद गॅसवर भाजून घ्या. दगडी खलात किंवा मिक्सरमध्ये मीठ, जिरे घालून चांगल्या बारीक करून, गोळा करून काढा. काचेच्या भांडयात सायीचे व साधे दही घालून त्यात मिरचीचा गोळा नीट कालवा. खमंग चटणी तयार होते. ही चटणी साबुदाण्याच्या खिचडीबरोबर छान लागते.