जिद्द

jidd जिद्द हे एक साहस, धाडस, मुलखावेगळे छंद, इतिहास, निसर्ग व गिर्यारोहण या विषयांना वाहिलेले मासिक आहे.
आता आम्ही २५व्या वर्षात पदर्पण करीत आहोत.

गेल्या वर्षीच्या जिद्दच्या दिवाळी अंकाला, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रायगड जिल्हयातून द्वितीय पुरस्कार मिळाला.

साहित्य दरवळ मंच, मुबंई यांनी उत्कृष्ट अंक म्हणून गौरविले. तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय समितीने जिद्दची शिफारस सर्व ग्रंथालयांना केली.

यंदाच्या दिवाळी अंकात युवराज गुर्जर यांनी स्थलांतर करणा-या पक्ष्यांचे रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. जयवंतानी वेगवेगळया ऋतुतील निसर्ग वैभव प्रकट केले आहे. त्याचबरोबर श्री. आप्पा परब या मान्यवर इतिहास संशोधकाच्या लेखणीतून अपरिचित इतिहास मांडला आहे. धाडसी तरूणांच्या सुळके चढाईची व स्पर्धेची दखल देखील आम्ही घेतलेली आहे. साता समुद्रापार अमेरिकेत पोहचलेल्या अंकाचे आपल्यासारख्या लहानांपासून थोरांनी सभासदत्व पत्करून निसर्गाचा, धाडसाचा, साहसाचा अनुभव घ्यायलाच पाहिजे.

दिवाळी अंक मुल्य २०.०० अधिक पोस्टेज रू.५.०० एकुण रू.२५.००

वार्षिक वर्गणी पोस्टेजसह रू. ७५.०० (भारतात) किंवा $ ४ ( अन्य देशात)

आजीव सभासद वर्गणी पोस्टेजसह २,०००/- (भारतात) किंवा $ १०० (अन्य देशात)

जुने उपलब्ध अंक संच रू. ५५०.००

हि योजना ३१ डिसेंबर २००६ पर्यंतच आहे. याची नोंद घ्यावी.

कृपया मनिऑर्डरच्या संदेश भागावर आपले नाव व पत्ता न विसरता लिहावा.
DD infavour of ‘JIDD’ with full postal address.

आमचा पत्ता
संपादक – सुनील सुमंत राज
बी – ३०२, शिवम अपार्टमेंट, दत्त मंदिराच्या मागे,
प्लॉट नं – १९८, सेक्टर ४,
नवीन पनवेल (पूर्व) – ४१०२०६
फोन नंबर – ०२२- ६५११२४१९
भ्रमणध्वनी – ९८६९३३१६१७
ईमेल – jidd52@yahoo.co.in

आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरुर कळवाव्यात.