| राष्ट्रगीतजन गण मन अधिनायक जय हे,भारत भाग्यविधाता।
 पंजाब, सिंध, गुजरात, मराठा,
 द्राविड उत्कल बंग,
 विध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
 उत्कल जलधितरंग,
 तव शुभ नामे जागे,
 तव शुभ आशिष मागे,
 गाहे तव जय गाथा,
 जन गण मंगलदायक जय हो,
 भारत भाग्यविधाता।
 जय हे, जय हे, जय हे,
 जय जय जय हे।
 – रवींद्रनाथ टागोर 
 | वन्दे मातरमवंन्दे मातरम् !सुजला सुफलां । मलयज शीतलाम्
 सस्य श्यामलां । मातरम् । वंन्दे मातरम्।
 शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिणीम्
 सुहासिनीम् । युमधुर भाषिणीम् ।
 सुखदां वरदां मातरम् । वंन्दे मातरम ।
 – बंकिमचंद्र चटोपाध्याय
 | 
| हे राष्ट्र देवतांचेहे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
 कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाचीरमायणे घडावी येथे पराक्रमांची
 शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
 येथे नसो निराशा थोड्या पराभवानेपार्थास बोध केला येथेच माधवाने
 हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
 येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचायेथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
 हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
 हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचेसत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
 येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
 येथे परंपरांचा सन्मान नित्य आहेजनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
 येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
 – ग.दि.माडगूळकर
 | झेंडा आमुचा प्रिया देशाचाझेंडा आमुचा प्रिया देशाचाफडकत वरी महान
 करितो आम्ही प्रणाम याला
 करितो आम्ही प्रणाम
 लढले गांधी याच्याकरिताटिळक, नेहरू लढली जनता
 समरधूरंधर वीर खरोखर
 अर्पुनि गेले प्राण
 करितो आम्ही प्रणाम याला
 करितो आम्ही प्रणाम
 भारतमाता आमुची माताआम्ही गातो या जयगीता
 हिमालयाच्या उंच शिरावर
 फडकत राही निशाण
 करितो आम्ही प्रणाम याला
 करितो आम्ही प्रणाम
 या देशाची पवित्र मातीजूळती आमुच्या मधली नाती
 एक नाद गर्जतो भारता
 तुझा आम्हा अभिमान
 करितो आम्ही प्रणाम याला
 करितो आम्ही प्रणाम
 गगनावरी आणि सागरतिरिसळसळ करिती लाटा लहरी
 जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
 करितो आम्ही प्रणाम याला
 करितो आम्ही प्रणाम!
 | 
| जिंकू किंवा मरूमाणुसकीच्या शत्रुसंगेयुद्ध आमुचे सुरू
 जिंकू किंवा मरू
 लढतिल सैनिक, लढू नागरिकलढतिल महिला, लढतिल बालक
 शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू
 देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचाशिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू
 शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभरमरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
 हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगरअंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
 – ग.दि.माडगूळकर
 | बलसागर भारत होवोबलसागर भारत होवोविश्वात शोभुनी राहो॥
 हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
 वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीनहा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
 हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
 करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊंविश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
 या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थहे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
 ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेलजगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
 | 
| मंगल देशा पवित्र देशामंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
 राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
 अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
 भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
 ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
 वैभवासि, वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
 प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
 अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशासह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
 पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
 तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
 ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
 – गोविंदाग्रज 
 | उठा राष्ट्रवीर होउठा राष्ट्रवीर होसज्ज व्हा, उठा चला,
 सशस्त्र व्हा, उठा चला
 युध्द आज पेटले जवान चालले पुढेमिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
 एकसंघ होउनि लढू चला लढू चला
 उठा उठा, चला चला
 लाख संकटे जरी उभी समोर ठाकलीमान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
 थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
 उठा उठा, चला चला
 वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्कराहोउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
 मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला
 उठा उठा, चला चला
 चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवूशूरता शिवाजिची नसानसात साठवू
 दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
 उठा उठा, चला चला
 यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवतीदुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
 देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
 उठा उठा, चला चला
  – रवींद्र भट 
 | 
| खरा तो एकची धर्मखरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलिततया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
 जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडतीतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
 समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावाअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
 सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकलतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
 कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावेसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
 प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारीकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
 असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्यासदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
 भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतातसदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
 असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचेपरार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
 जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारात्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
 – साने गुरुजी
 | जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझारेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
 भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
 जय जय महाराष्ट्र माझा …
 भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
 सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
 दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
 दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
 देशगौरवासाठी झिजला
 दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
 |