‘क्लासिक्स ऑफ वर्ल्ड लिटरेचर’ मध्ये संत तुकारामांचे अभंग

दरवर्षी देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या तुकाराम व ज्ञानेश्वरांच्या पालख्यांचे अनन्यसाधारण महत्त्व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाढत ओह. त्याचाच एक परिणाम म्हणून अमेरिकेतील ‘ओरिएंट लाँगमन’ या विख्यात प्रकाशन संस्थेने ‘क्लासिक्स ऑफ वर्ल्ड लिटरेचर’ या आगामी पुस्तकामध्ये तुकारामांच्या निवडक १२ अभंगांचा समावेश केला आहे. जेष्ठ साहित्यिक व कवी दिलीप चित्रे यांनीही इंग्रजीत अनुवादित केलेल्या निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यासह बहिणाबाई यांच्यापर्यंतच्या निवडक अभंगांचा संग्रहही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

तुकोबांच्या अभंगाला मिळणारा वैश्विक पातळीवरचा प्रतिसाद उदंड आहे. आता इंटरनेटवर तुकोबांवर असलेल्या सात ते आठ या तुकोबांच्या अभंगांवरील इंग्रजी संकेतस्थळांवर इंग्रजीसह इटालियन, पुस्तकाचा यापूर्वी जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच व अन्य पाश्चात्य पोलिश आणि डच भाषांत अनुवाद भाषांमध्ये मिळून सुमारे एक हजार लेख वाचण्यास उपलब्ध आहेत. गेली सातशे वर्षे चालत आलेल्या या मराठी संस्कृती व साहित्याशी थेट निगडीत असलेल्या सर्वात मोठया वारकरी परंपरेस व मराठी भक्तीकवीतेस चांगली प्रतिष्ठा लाभत आहे, असे मत चित्रे यांनी व्यक्त केले.

‘क्लासिक्स ऑफ वर्ल्ड लिटरेचर’ साठी चित्रे यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या या बारा अभंगांची परवानगी ‘ओरिएंट लाँगमन’ यांना नुकतीच दिली आहे. सोपानदेव, ‘सेज तुका’ झाला आहे. तुकोबा हे नित्झे व कन्फ्यूशियस यांसारख्या जर्मन व चिनी तत्त्ववेत्यांच्या तोडीचे विचारवंत होते, हे सर्वमान्य होऊ लागले आहे. जगाला अभिमानाने सांगावे असे हे आपले सांस्कृतिक धन आहे, असे चित्रे यांनी सांगितले.

‘ऍन ऍन्थ्रॉलॉजी ऑफ वारकरी पोएट्री’ या आगामी पुस्तकात निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, एकनाथ, तुकोबा आणि त्यांच्या शिष्या बहिणाबाई यांच्या निवडक अभंगांचा समावेश आहे.

‘संत तुकारामांनी चोखोबांची स्तुती केलेला अभंग सापडला’

‘शंभरा लोकात सद्गुणी ऐका
तुका म्हणे चोखा पंढरीचा’
संत तुकाराम महाराजांनी संत चोखा मेळा यांची स्तुती केलेला अभंग प्रथमच सापडला आहे. मौखिक परंपरेने जपलेला, पण आता विस्मृतीत गेलेला हा अभंग एका बाडात गवसला आहे.
तुकाराम महाराजांचे चोखोबांचा उल्लेख असलेले अभंग ज्ञात आहेत.
‘पवित्र ते कुळ पावन तो देश,
जेथे हरिचे दास जन्म घेती’

किंवा

‘उंचनिच काही नेणे हा भगवंत’ या अभंगात तुकोबांनी अन्य संतांबरोबर चोखा मेळा यांचा उल्लेख केला आहे. जुन्नरी जाड कागदाच्या बावन्न पानांच्या या बाडात तुकोबांचे २०४ अभंग आहेत. ‘सुंदर ते ध्यान’ या नमनाच्या अभंगाने बाडाची सुरवात होते, तर ‘हेचि दान देगा देवा’ या तुकाराम महाराजांनी मागितलेल्या पसायदानाने शेवट होतो. या बाडात १४३ क्रमांकावर चोखोबांची स्तुती आहे. ती स्तुती अशी:

‘रायाचे सीपई हाजाराचे बारा
लाखाचा मोहोरा प्राणी येक
सवा रूपयाची येती पाच मोती
हाजाराची येती जोडी येक
रूपयाच्या कवडया मध्ये भरे गोणी
मोहोर बांधुनि पदरी न्यावी
शंभरा लोकात सद्गुणी ऐका
तुका म्हणे चोखा पंढरीचा’

‘गीतापंचरत्न’ या हस्तलिखितात भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृती व गजेंद्रमोक्ष हे पाच धार्मिक ग्रंथ आहेत. या हस्तलिखितात सव्वीस मोठी व तीसहून अधिक छोटी चित्रे अंतर्भूत आहेत. प्रत्येक अध्यायात कृष्ण अर्जुनाला उपदेश करत असल्याची वेगवेगळया भावमुद्रांमधील चित्रे आहेत. ही चित्रे मध्य प्रदेशातील आदिवासी शैलीत आहेत. वस्त्रआभूषणे व अलंकार कमी, तसेच डोळयांच्या कडा चेहऱ्याबाहेर आहेत. जुन्नरी पिवळसर कागदावर प्रत्येक पानावर नक्षीकाम करून व सोनेरी वर्ख देऊन हे हस्तलिखित सजवण्यास आले आहेत.

याखेरीज वैदिक सूक्तांचे शके १७४० मधील (१८४ वर्षांपूवींचे) हस्तलिखित व देवी सप्तशी स्तोत्र हे संवत १९४१ मधील (११९ वर्षांपूवींचे) हस्तलिखितही मिळाले आहे. त्यावर गुटिका भाष्य आहे. हे स्तोत्र देवी परंपरेतील पूजेत होते. त्याला हस्तदंती आवरण आहे.