‘भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा’

bharleleswar गेल्या पाच दशकांतील पुणे सवाई गंधर्व महोत्सवाच्या सुरेल आठवणी. विविध घराण्यांतील गायक – गायिका – वादक यांच्या काही निवडक सुरेल प्रकाशचित्रांबरोबरच त्यांनी सादर केलेल्या राग-बंदिशी-पदांच्या तपशिलासह सवाई गंधर्व महोत्सवाच्या २००२ च्या सुवर्ण महोत्सवी सोहळयात या ग्रंथाचं पं. भीमसेन जोशी यांच्या शुभहस्ते प्रकाशन.

प्रत्येक वर्षाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी पं. भीमसेनजी समारोप म्हणून गात आले आहेत. त्यांनी गायलेल्या कधी ‘तोडी’चा तर कधी ‘कोमल ऋषभ आसावरी’चा अपूर्व षड्च आम्ही कानांत साठवून ठेवला आहे. वसंतराव देशपांडे यांनीपण ‘कौशी कानडा’, ‘शिवमत भैरव’, ‘सालगवराळी’, ‘नटभैरव’, ‘जोगकंस’ भरभरून ऐकविले व शेवटी ते ‘शतजन्म शोधिताना’ व ‘तेजोनिधी लोहगोल’ म्हणायला प्रारंभ करीत तेव्हा खरंच त्या तेजोनिधी लोहगोलाची आभा सर्व मंडपावर पडलेली असे. गंगूबाईंचा ‘तोडी’, ‘अहिर भैरव’, पं. फिरोज दस्तुरांचा ‘जौनपुरी’ व अखेरीस ‘गोपाला करूणा नहीं आवे’ हे ऐकायला आम्ही नेहमीच सोत्कंठ असायचो. कुमारजी, अभिषेकी, अख्तरी बेगम, किशोरी अमोणकर, पं. जसराज, उस्ताद रशिदखान, पं. संगमेश्वर गुरव, उदय भवाळकर, बेगम परवीन सुलताना, शोभा गुर्टू, मालिनी राजुरकर, सुहासिनी कोरटकर, विजय कोपरकर इत्यादीचे गायन, तसेच पं. रविशंकर व पं. विलायत हुसेन खाँ यांची सतार, पं. हरीप्रसादांची बासरी, पं. शिवकुमारांचं संतूर, उस्ताद अमजद अलींची सरोद, श्रीमती. एम्. राजम व त्यांच्या सुकन्या डॉ. संगीता यांचं, तसंच पं. डी. के. दातार यांचं व्हायोलिन, बिस्मिला खाँसाहेबांची सनई या सर्वांबरोबरच माणिक वर्मांची धुपासारखी दरवळणारी नाटयगीतं कानांत साठविली आहेत. अशी आणखी किती नावं घ्यावीत ?

सवाई गंधर्व महोत्सवाच्या अशा असंख्य सुरेल आठवणींनी मनात दाटी केली आहे. त्या सर्व संगीत रसिकांपुढे ठेवताना कविवर्य श्री. मंगेश पाडगांवकर यांनी त्यांच्या गीतपंक्तीत व्यक्त केल्याप्रमाणे ‘भारलेल्या जन्म हा’ अशी आमची अवस्था झाली आहे व नेमकं तेच शीर्षक या ग्रंथास दिलं आहे. यापेक्षा मनोगतात आणखी ते काय सांगणार ? हा आनंद द्विगुणित करण्यात आम्ही कितपत यशस्वी झालो हे संगीत रसिकांनीच ठरवायचं आहे.

भास्कर शेरे
‘हंसध्वनी’, कमोदनगर
आग्रा राजपथ
नाशिक – ४२२००९
दूरध्वनी ३२३६१०

सुधाकर धायगुडे

१२९९ गुरूप्रसाद चेंबर्स
चिमण्या गणपतीजवळ
सदाशिव पेठ पुणे – ४११०३०
दूरध्वनी ४४९२७६४

प्रकाशक
अभय सदावर्ते
मंदार अपार्टमेंट, जनरल वैद्य नगर,
नाशिक पुणे रस्ता,
नाशिक – ४२२०११
दूरध्वनी – ०२५३-५९९७७७

निवडक अभिप्राय
सवाई गंधर्व महोत्सवाच्या आगामी सुवर्ण महोत्सवी सोहळयाच्या निमित्ताने गेल्या पाच दशकांतील विविध घराण्यांच्या गायक – गायिका – वादक यांनी या महोत्सवांत सादर केलेल्या रागांच्या तपशिलासह सुरेल आठवणींबरोबरच तात्या खानोलकरांच्या गायक – गायिका – वादक आणि नर्तकांच्या निवडक प्रकाशचित्रांतून मांडलेला ‘भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा’ ग्रंथ प्रकाशित करताना मला आनंद होत आहे. भास्कर शेरे व सुधाकर धायगुडे या रसिकद्वयांनी गेली पाच दशकं सातत्याने या महोत्सवांस उपस्थित राहून, ऐकून, अनुभवून, त्यांचे टिपण ठेवून, त्यावरून लिहिलेल्या या मौलिक ग्रंथास माझ्या हर्दिक शुभेच्छा.
पं. भीमसेन जोशी

ग्रंथाचे शीर्षक कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या ‘शुक्रतारा मंदवारा’ या भावगीतातील एक ओळ. या भावगीतास माझेच संगीत असल्याने त्याबद्दल मी स्वत:च काय बोलणार ? या ग्रंथास उत्तम शीर्षक देऊन माझे स्नेही लेखक भास्कर शेरे व सुधाकर धायगुडे खूप काही सांगून गेले आहेत. या ग्रंथातील सवाई गंधर्व महोत्सवांच्या पाच दशकांतील सुरेल आठवणी अतिशय मौलिक आहेत.
श्रीनिवास खळे

मेरी हार्दिक शुभ कामनाएं ।
पं. शिवकुमार शर्मा

‘भारलेल्या या स्वरांनी….’ हा ग्रंथ पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते सवाई गंधर्व महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रकाशित होत आहे. प्रस्तुत ग्रंथात एकत्रित केलेली माहिती व आठवणी पुढील पिढयांना रंजक तर होतीलच, पण मार्गदर्शकही होतील यात मला शंका वाटत नाही. लेखकद्वयींनी नितांत निष्ठेने व श्रमाने हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. त्यांच्या या मौलिक कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
कै. राम फाटक.

पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवावर आधारित हा मौलिक ग्रंथ प्राकाशित होत आहे. त्यास हार्दिक शुभेच्छा.
पं. त्रि. द. जानोरीकर

पुस्तक‘भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा’