माठाची पालेभाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य : २ जुडया माठाची पालेभाजी, ३ कांदे, १ चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, फोडणीसाठी १ डाव गोडेतेल, हिंग-मोहरी-हळद १ चमचा प्रत्येकी.

कृती : माठाची भाजी निवडून, धुवून बारीक चिरावी. कांदेही चौकोनी चिरून घ्यावेत. हिंग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी करावी. त्यावर चिरलेला कांदा टाकावा. जरा परतून झाकण ठेवावे. कांदा शिजला की त्यावर माठाची भाजी घालून ढवळावे व मंदाग्नीवर भाजी शिजू द्यावी. शिजल्यानंतर त्यात तिखट मीठ घालावे. ही भाजी शिजल्यावर थोडी होते म्हणून कधीही अगोदर तिखट मीठ घालू नये. भाजी चांगली शिजली, की मग त्यात कोथिंबीर व खोबरे घालून उतरवावी.

टीप : काद्यांऐवजी बटाटयाच्या पातळ फोडी घालूनही ही भाजी चांगली होते. माठाच्या भाजीप्रमाणेच चवळी, राजगीरा वगैरे पालेभाज्या करता येतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF