भास्कर रामचंद्र भागवत – फास्टर फेणेचे जनक

bhagwat हॅरी पॉटर येणाच्या आधीच्या पिढीने फास्टर फेणेचा थरार आणि शूर करामती अनुभवलेल्या होत्या. फास्टर फेणेचे जनक होते प्रसिध्द बालसाहित्यिक भास्कर रामचंद्र भागवत  हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार होते. यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंब-या, विज्ञानकथा लिहिल्या. यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिध्द होते . त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची बी.ए. पदवी घेतली. सुरुवातीपासूनच त्यांना इंग्रजी साहित्याच्या वाचनाची आणि विज्ञानाच्या अभ्यासाची आवड होती. बहुधा हीच आवड पुढील काळात विज्ञानकथा लिहिण्यास आणि जागतिक साहित्य मराठी बालवाचकांसाठी अनुवादित करण्यास त्यांच्या प्रेरणा ठरल्या असाव्यात.

भागवतांनी इ.स. १९३०च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६ मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते. या कालखंडात भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते आणि त्याबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला. थोडक्यात वाचनसंस्कृतीचा बालवङ्मय हा पाया असून पालक, शिक्षक, सरकार आणि प्रसिद्धी माध्यमे या सगळ्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे. त्याकाळात बालसाहित्य इतिहास, पौराणिक कथा, चरित्र याच स्वरुपात अडकले होते.

’खेळगडी’चे संपादक होते. बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या कालिकाचे भागवत संस्थापक होते. “वैतागवनातील वाफाटे” हे विनोदी लेखन आणि अनेक अनुवादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. चतुर, खेळकर, धडपडत राहणारा त्यांचा “फास्टर फेणे” हा आजही कुमार वाचकांच्या गळ्यातील ताईत आहे. मुलांसाठी अनेक साहसकथांचे अनुवाद त्यांनी केले. किशोरवयीन मुलांसाठी अदभुत रम्य आणि साहसपूर्ण कादंब-यांचा खजिनाच त्यांनी निर्माण केला. त्यावेळी चांदोबा मासिक अदभुत चमत्कारांच्या विश्वात न्यायचं, तर बालमित्र मासिक विज्ञान कथांची चटक लावायचे. “समुद्र राक्षस”, “चंद्रावर स्वारी” वगैरे Jules Verne च्या कादंब-यांची भाषांतरे बालमित्र मासिकात आहे.

बनेश फेणे ऊर्फ फास्टर फेणे हे भा.रा.भागवत यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. कादंब-यातील संदर्भांनुसार तो शाळकरी विद्यार्थी असून महाराष्ट्रातील पुण्यातल्या विद्याभवन शाळेत शिकत असतो. त्यांच्या धाडसी स्वभावामुळे बनेश समस्त कुमार जगताचा लाडका सुपरहिरो आजही आहे.  ‘फास्टर फेणे’ खेरीज भागवतांनी अनेक स्वतंत्र, व त्याहून अधिक भाषांतरित पुस्तके लिहून कुमारवाचकांचे विश्व समृद्ध केले.  त्याखेरीज ते ‘मराठी नाटय़कोश’ तयार करणारे नाटय़-अभ्यासक व समीक्षक होते.  इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

साहित्यिक कारकीर्द
भा. रा. भागवतांच्या साहित्यकृती खालिलप्रमाणे –
Faster Fene
१) शाबास, शेरलॉक होम्स!
२) फास्टर फेणे
३) खजिन्याचा शोध
४) तुटक्या कानाचे रहस्य
५) एक होते सरोवर
६) आनंदी आनंद गडे
७) मोठ्या रानातले छोटे घर
८) उमलती कळी
९) हाजीबाबाच्या गोष्टी
१०) भुताळी जहाज
११) जुनाट भावलीची भन्नाट कथा
१२) साखरसोंड्या
१३) पिझरोचे थैमान
१४) रॉबिन्सन आणि मंडळी
१५) थॅंक्यू मिस्टर शार्क
१६) भटांच्या वाड्यातील भुतावळ
१७) जंगलबुकातील दंगल