लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। खरचं, प्रत्येक व्यक्तीला बालपण किती हवे हवेसे वाटते! बालपण म्हटले की, पूर्वीच्या काळी मौजमस्ती आणि छान छान आजीच्या गोष्टी असायच्या. परंतु आता विभक्त कुटुंब पध्दती, दूरदर्शन, केबल टीव्ही यामुळे आजीच्या गोष्टी, मौजमस्ती या सर्वानाच मुले दुरावली गेली. परंतु अशाही परिस्थितीत मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या ध्येयाने प्रेरित झालेले लेखक अशोक बा.दातार यांनी ‘अनमोल बालकथा’ लिहून या ध्येयाकडे वाटचाल करण्याकरीता पाऊल उचलेले आहे.
लेखक अशोक बा.दातार हे केवळ बालकथा लेखक नसून उत्कृष्ठ कवी आहेत. केंद्र सरकारी कार्यालयात कार्यरत असूनसुध्दा बालकांसाठी लेखनाच्या माध्यमातून अत्यंत उद्बोधक, मनोरंजनात्मक कथा त्यांनी बालचमूंसमोर ठेवल्या आहेत. कोणत्या गोष्टी चागंल्या, आणि कोणत्या गोष्टी वाईट हे त्यांच्या ‘अति तेथे माती’, ‘देवदत्त’ या कथांवरून दिसून येते. २१ व्या शतकात मुलांवर संस्कार करण्याचे ‘आजी-आजोबांचे’ महत्वाचे कार्य लेखक श्री. दातार यांनी आपल्या ‘अनमोल बालकथा’ च्या माध्यमातून केले आहे.
मुलांना सहजपणे आकलन होतील अशा सहज, सुंदर भाषा शैलीत संस्कारक्षम विचार मुलांवर बिंबविण्याची त्यांची कला प्रशंसनीय आहे. आदर्श,संस्कार,गर्व, इत्यादींसारखे मुलांच्या बुध्दीनुसार अवघड असे शब्दांचे अर्थ गोष्टीरूपाने त्यांनी अगदी सहजतेने मुलांना सोपे करून सांगितले आहेत.
त्यांच्या या ‘अनमोल बालकथा’ च्या पोतडीत ‘संस्कार कथा, बोधकथा, पुराणकथा, प्राण्यांच्या कथा, आदि कथांचा खजिना आहे आणि हा खजिना मुक्तपणे लुटण्याची संधी त्यांनी या ‘अनमोल बालकथा’ च्या निमित्ताने बालवाचकांना उपलब्ध करून दिली आहे.
‘गृहिणी सचीव:’ अस म्हणतात. सौ. अर्चना दातार या स्वत: उत्कृष्ठ कलावती आहेत. ह्दद्य आणि रंजक कथाकथन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शाळेच्या आणि कथाभारतीच्या कार्यक्रमातील त्यांचे योगदान अत्यंत मौलिक योगदान आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या पडद्यामागील कलावती आहेत.
पुस्तक – अनमोल बालकथा
लेखक – अशोक बा. दातार
संपर्क – पल्लवी कुलकर्णी
किंमत – रु. ४० रुपये
बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यांचे असंतुलन होत आहे. शरीराच्या आरोग्य रक्षणासाठी व संवर्धनासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, आहार,निद्रा, ब्रम्हचर्य, याबाबतचे तर मनाच्या आरोग्यासाठी सात्वीक आहार व सदाचार याबद्लचे मार्गदर्शन ‘आयुर्वेदीय आरोग्य साधना’ या पुस्तकात केले आहे. बालक स्वास्थ्य व स्त्री स्वास्थ्य याबाबतचे सविस्तर वर्णन तसेच आयुर्वेदातील पंचकर्म व रसायन चिकित्सा यांची माहिती सोप्या भाषेत वाचकांपुढे मांडली आहे.
निरामय व दिर्घायुष्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्या सर्व वाचकांना वैदय स. प्र. सरदेशमुख लिखीत ‘आयुर्वेदीय आरोग्य साधना’ हे पुस्तक निश्चित उपयोगी ठरेल. या पुस्तकाची किंमत रू. ५० आहे.
भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्टचे संचालक वैदय स. प्र. सरदेशमुख लिखित कॅन्सर- आयुर्वेद या पुस्तिकेत आयुर्वेदीय दृष्टीकोनातून कॅन्सरची कारणे, लक्षणे व चिकित्सा यांचा उहापोह केला आहे. कॅन्सर रोगात पाळावयाचे पथ्य अपथ्य व कॅन्सरग्रस्त रूग्णांचे मनोबल उंचावण्यासंबधीचे मार्गदर्शन या पुस्तिकेत केले आहे. आयुर्वेदीय दृष्टीकोनातून कॅन्सर प्रतिबंधक उपायांचे देखील सविस्तर वर्णन या पुस्तिकेत केले आहे. या पुस्तकाचे मुल्य २५ रू. आहे.
वरील दोन्ही पुस्तके भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्टच्या दादर येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी info@ayurved-wagholi.org या ई-मेलवर संपर्क साधावा.
पुस्तक – कॅन्सर आयुर्वेद
१७२ नायगाव क्रॉस रोड,
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,
शारदा सिनेमाच्या पूढे,
दादर (पूर्व) – ४०००१४,
फोन – २४१३०८६६