एक नवी जाणीव हे ‘लिव्हिंग ऍंड वर्किंग विथ स्किझोफ्रेनिया’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचं मराठी रूपांतर आहे. मनोविकार समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, सर्व संस्कृतीत आणि जगात सर्वत्र आढळतात.
स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे, या हेतूने ‘सा’ ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे. तसेच ‘एकलव्य’ हा रुग्णांचा आणि पालकांचा एक गटदेखील एकत्र येऊन स्वत:चे प्रश्न स्वत:च सोडवण्यासाठी काम करतो आहे.
घरातील एखादी व्यक्ती स्किझोफ्रेनियाने आजारी होते तेव्हा नक्की काय झालंय, हे घरच्यांना कळत नाही. ते भांबावून जातात, काय करावं कुणाकडे जावं हे त्यांना माहीत नसतं. त्यांना योग्य मार्गदर्शन करणा-या माहितीची आवश्यकता असते. स्किझाफ्रेनिया म्हणजे काय, तो होण्यामागे कोणती कारणे आहेत, तणावामुळे हा आजार होतो का, रुग्णाला ह्या आजाराविषयी सांगावं का, आजार पूर्ण बरा होतो का व त्यानंतर उलटण्याची शक्यता असते का, रुग्णानं घरी राहणं चांगलं की हॉस्पीटलमध्ये राहणं बरं, रूग्णावर किती लक्ष ठेवावं, गरजेपेक्षा जास्त भावनिक गुंतवणूक चांगली की वाईट, रुग्णाने मदत नाकारली किंवा औषध घेण्याचं नाकारलं तर काय करावं, औषधामुळे हा आजार पूर्ण बरा होतो का, अशा त-हेचे एक ना दोन हजारो प्रश्न रुग्णाच्या कुटुंबीयांच्या मनात असतात. सदर पुस्तकात या व इतर प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. या आजाराच्या निमित्ताने कुटुंबीयांच्या मनात स्वाभाविकपणे उद्भवणाऱ्या अनेक शंकांचं निरसन हे पुस्तक वाचल्यामुळे होऊ शकेल, याची खात्री वाटते. रुग्ण, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र या क्षेत्रातील कार्यकर्ते व अभ्यासक आणि स्किझोफ्रेनियाच्या प्रश्नांविषयीची उपयुक्त माहिती मिळू शकेल. याविषयी तिळमात्र शंका नाही. या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि प्रवाही आहे. हे पुस्तक लिहितांना लेखिका पुस्तकाच्या विषयाशी एकरूप झाल्याचे पदोपदी जाणवते. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावं व संग्रही ठेवावं.
पुस्तक परिचय – स्किझोफ्रेनिया – एक नवी जाणीव
रुपांतर – कल्याणी गाडगीळ
किंमत – रु. १०० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
२७ फेब्रुवारी २००० रोजी ‘मराठीवर्ल्ड.कॉम’ला सुरवात झाली. तेव्हापासून विविध विभाग, नवनवीन माहिती ही आम्ही सातत्याने रसिक वाचकांना देत आलो आहोत. ‘सावळया रे,…’ या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या अनघा दिघे यांच्या कवितासंग्रहाची ई-आवृत्ती गोपाळकाल्याच्या (७ सप्टेंबर २००४ ) मंगल समयी, प्रसिध्द केला.वाचकराजांच्या पसंतीस हा प्रयत्न तसेच ‘सावळया रे,…’मधील कविताही उतरतील असा विश्वास आम्हाला वाटतो.
‘सावळया रे,…’ हा राधा, कृष्ण आणि मीरा यांच्यातील नात्यांचा मागोवा आहे. तरल, भावस्पर्शी असे हे दीर्घकाव्य वियोगातील प्रेमाचे तसेच सफळ प्रेमाचे अनेक पदर उलगडत नेते.
‘मीरेचं व्रत मुकं
कान्ह्याशी बोलतं
नि:शब्दाचं वेड तिचं
कान्ह्यालाच कळतं’
इथपासून सुरवात करून
‘कान्ह्याचं स्वप्नं
अश्रुंतून ओघळतं
कान्ह्याचं सत्य
मीरेला वेडावतं…’
हुंदक्यासारख्या या दोन निसटत्या अभिव्यक्तिंच्या दरम्यान घडलेली ही ‘अनोखी कहाणी’- सर्वांनीच वाचावी…, संग्रही ठेवावी अशी…
पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा हे पुस्तक ऍक्रोबॅट पी.डी.एफ्. स्वरूपामध्ये सादर केले आहे. हे पुस्तक उघडण्यासाठी ऍक्रोबॅट रीडर या सॉफ्टवेअरची जरूरी आहे. तुमच्या संगणकामध्ये ऍक्रोबॅट रीडर नसल्यास सदर सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.