गुदगुल्या – राजेश अग्निहोत्री
आधुनिक विनोद आपल्या दैनंदिन व एकसूरी आयुष्यात हास्याची कारंजी उडवा. मराठीवर्ल्डच्या वाचकांनी हास्यकॉर्नर सदरासाठी पाठवलेले साहित्य खालील प्रमाणे.या विभागात आम्हाला वाचकांचा सहभाग हवा आहे, तरी आपल्या आयुष्यात घडलेले काही गमतीदार किस्से, विनोद आम्हाला पाठवावे
टिप : हास्यकॉर्नर मधील मजकूरास मराठीवर्ल्ड सहमत असेलच असे नाही.
वन,टू , थ्री .. चं नाव घेते मला करा फ्री . |
इवल्या इवल्या हरिणाचे इवले इवले पाय …….. राव आले नाही घरला कुठे पिऊन पडले की काय. |
चांदीच्या ताटात शिळया भाकरीचे तुकडे घास भरवते मरतुकडया थोबाड कर इकडे. |
चांदीच्या भांडयांना असावा नाशिकचा घाट ……. चं नाव घेते …. च्या डोहाळेजेवणाचा थाट. |
शिसवी पलंग त्यावर मखमली गादी अन् किनखापी उशी मी गेले …. रावांपाशी तर राव म्हणतात ‘ आज एकादशी ‘. |
घरापुढे अंगण, अंगणापुढे ओसरी ओसरीपुढे माजघर माजघरात फडताळ फडताळात चांदीचा भगुला भगुल्यात ठेवला खवा … राव आले घरला आता तुम्ही जावा. |
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर …….. चं नाव घेते ….. ची लव्हर. |
चंदेरी चोळीला सोनेरी बटन ……. रावांना आवडते तंदुरी चिकन. |
गणपतीच्या देवळात शंकराची आरती …… राव गेले वरती मी राहिले खालती. |
स्टुलावर स्टुल बत्तीस स्टुल ….. राव एकदम ब्युटिफूल. |
गव्हावर गहू नऊ गहू लग्न नाही झालं तर नाव कोणाचे घेऊ ? |
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू …… राव दिसतात साधे पण आतून मात्र चालू. |
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल ….. राव एवढे हँडसम पण डोक्यावर टक्कल. |
आयलीवर पायली पायलीवर भुंगा ….. चं नाव घेतो टांग टिंग टिंगा. |
गणपतरावांबरोबर चित्रपट पाहिला त्याचं नाव सायको वामनरावांचं नाव घेते चिमनरावांची बायको. |
वेडीवाकडी बाभळी तिला वेडा-वाकडा पाला तुकाराम मेला आणि मी सखाराम केला. |
….. चा नि माझा संसार होईल सुकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुकर. |
गुलाबाचे फूल पाकळी पाकळी उमलले ……. राव गेले खिंडारात त्यांना डुकराने ढकलले. |
सायकली होत्या सात मधली सायकल कुचकी …… राव गेले कामाला अन् मला लागली उचकी. |
बाजारातून आणला लसूण ….. राव पडले तुपात त्यांना मी घेतले चाटून पुसून. |
पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी धनी सोडल्या तिघीजणी आणि झालो……. चा धनी. |
अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका मला नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका. |
शिडीवर शिडी बत्तीस शिडी …….ओढतो बिडी आणि मी लावते काडी. |
नाच नाच नाच राधे उडवूया रंग …… जाऊ तिकडे सगळे आहेत जेवणात दंग. |
हत्तीवर अंबारी अंबारीवर झूल ……. म्हणजे माझं गुलाबाचं फूल. |
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस ………. चं नाव घ्यायला मला नाही आळस. |
इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून ……. चं नाव घेते ……. ची सून. |
सॉफ्टवेअर, हार्डवेअर शिवाय काप्युटर पूर्ण होत नाही ………… शिवाय मला कश्शात इंटरेस्ट वाटत नाही. |
गाडीत गाडी डेक्कन क्वीन …….. आहे माझी ब्युटीक्वीन |
हल्लीच्या जमान्यात सर्वांना समानता आवडे …….. ने घासली भांडी तर …….. धुवेल कपडे. |
हल्लीच्या जमान्यात केली कामाची समसमान वाटणी मी केली इडली तर ……….. वाटेल चटणी |