किलबिल – (पक्षांची माहिती देणारे सदर)

शिक्रा

Shikraकबुतराच्या आकाराची छोटी घार म्हणजे शिक्रा पक्षी. वरील बाजूने राखट निळसर तर खालील बाजूस पांढरा आणि त्यावर तपकिरी पट्टे आणि शेपटीवर रुंद काळपट रेघांमुळे ओळखता येतो. मादीचा आकार हा नरा पेक्षा मोठा असतो आणि तिच्या वरील बाजूस तपकिरी रंग बघायला मिळतो. हे पक्षी जंगलामध्ये जोड्याने राहताना दिसून येतात तर ग्रामीण भागात किंवा शेताच्या जवळ दाट झुडपांमध्ये त्यांचा आश्रय बघायला मिळतो.

टोळ, नाकतोडे, बेडुक, उंदीर ह्यांची शिकार करून हे प्राणी आपला उदर निर्वाह करत असतात. शिक्रा हा पक्षी अत्यंत खुबीने शिकार करतो, आपल्या भक्ष्याला काही कळण्याच्या आतच ते पक्षी भक्ष्यावर झडप घालून त्याला उचलून नेतात आणि नखांनी ओरबाडून, फाडून खातात. सातभाई, लाहुरी, होला यांसारख्या पक्ष्यांचा पाठ्लाग करून शिकार करतात. कोंबड्यांची पिल्ले हे देखील शिक्रा पक्ष्याचे आवडते खाद्य आहे.

शिक्रा पक्षी कोतवाल पक्ष्या प्रमाणेच आवाज काढतो परंतु आवजाची पातळी मात्र जास्त असते. विणीच्या हंगामात एकमेकांशी प्रणय क्रीडा करताना हे पक्षी ‘ टिटुई ’ असा तीव्र स्वर काढतात. प्रणयक्रीडेत हे पक्षी हवेत नाना प्रकारचे खेळ करतात व एकमेकांचा पाठलाग करतात आणि पाण्यात सूर मारतात त्याप्रमाणे हे पक्षी हवेत सूर मारताना दिसतात. गावाजवळच्या राईमधील वृक्षांवर हे कावळ्या प्रमाणेच घरटी बांधतात. शिक्रा पक्षी एका वेळेस ३ किंवा ४ फिकट निळसर पांढ-या रंगाची अंडी घालतात. काही वेळा अंड्यांवर राखाडी रंगाचे फिकट लहानमोठे ठिपके असतात.

एचपीटी कॉलेजच्या आवारातल्या विशाल वृक्षांवर शेकडो मैना रातथा-याला येतात. तशाच त्या कोर्टामधल्या झांडावर गर्दी करून असतात. सूर्योदयापूर्वी सुमारे अर्धा तास आधी त्या आवाज करू लागतात. जरा वेळानं साठ-सत्तर साळुंक्यांचा जमाव आवाज करीत झाड सोडतो. काही अंतरावर त्यातल्या पाच-सातजणींचा कळप दूर होतो. पुढे जात-जात हा कळप छोटया टोळयात विभागला जातो. या टोळया मनुष्य वस्तीच्या जवळ दिवसभर वावरतात. फळे, किडे, उकिरडयावरचे खरकटे जे मिळेल त्यावर हया भूक भागवतात. त्यांचा वावर नेहमी मनुष्यवस्ती जवळ असतो. कोणी शेतकरी मळयात झोपडी बांधून राहू लागला की मैना हमखास पोचतात. प्रसंगी जनावरांच्या चालण्याने शेता-गवतातून उडणारे कीटक पकडतात. कधी गाई-गुरांच्या अंगावर बसून गोचिडा टिपतात. संध्याकाळ होत आली की दूरपर्यंत पांगलेल्या टोळया रातथा-याकडे येऊ लागतात. या प्रवासात छोटया-छोटया टोळया एकत्र येऊ लागतात. या प्रवासात छोटया छोटया टोळया एकत्र येऊन त्यांचा कळप तयार होत असे कळप रातथा-याच्या जागी येतात. त्यातला प्रत्येक सोईस्कर जागा मिळेपर्यंत कलकल करतात आणि मग सगळं झाड चिडीचूप होतो. तिथे पुन्हा दुस-या दिवशी सुर्योदयापूर्वी आवाज सुरू होतो.

साधारण कबूतराच्या आकाराचा हा पक्षी गडद ब्राऊन रंगाचा असतो. चकचकीत पिवळी चोच आणि पिवळे पाय उठून दिसतात. त्यांच्या पंखात असलेली पांढरी पिसे पंख मिटलेल्या अवस्थेत फारशी दिसत नसली तरी उडताना तिथले पांढरे पट्टे स्पष्ट दिसतात. एकेक पाऊल टाकत इकडे तिकडे बघत कुठे काय खायला मिळते आहे याकडे लक्ष देत तिची हालचाल होत असते आणि तशात कधीतरी एकच वस्तू दोघी चौघींच्या लक्षात आली की त्यावरून त्यांचे भांडण सुरू होतं.

साळुंकी

Salunki तुकारामाबुवांनी ‘साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी’ असं लिहून ठेवलेलं लहानपणी माझ्या वाचनात आलं होतं तेव्हा मी रविवार कारंजा जवळ रहात होतो. त्यामुळे तिथे सांळुक्या दिसायच्या नाहीत आणि आवाजही ऐकू यायचा नाही. खूप वर्षांनी गावाबाहेर रहायला आलो आणि भरपूर सांळुक्या दिसायला लागल्या. त्यांचे लहान थवे अंगणात उतरायला लागले. तेव्हा त्यांचा भांडकुदळ स्वभाव लक्षात आला. उघडयावर पडलेली एखादी वस्तु मिळवण्याकरता त्या कर्कश आवाज करीत एकमेंकीवर धावून जात. सार्वजनिक नळावर भांडणा-या बायका जशा कचाकचा भांडतात तसाच या साळुंक्यांचा आवेश असायचा. त्यावेळी कीक् कीक्, कॉक कॉक्, चुSर असे वेगवेगळे पण कर्कश आवाज त्या काढतात. तेव्हा तुकाराम महाराजांना त्यांची मंजुळ वाणी कशी आणि केव्हा ऐकु आली अशी शंका यायची. साळुंकी म्हणजे काही वेगळाच पक्षी तर त्यांना अभिप्रेत नव्हता ना? तसं नव्हतं भारतीय मैनेलाच साळुंकी म्हणतात हे निर्विवाद.

एचपीटी कॉलेजच्या आवारातल्या विशाल वृक्षांवर शेकडो मैना रातथा-याला येतात. तशाच त्या कोर्टामधल्या झांडावर गर्दी करून असतात. सूर्योदयापूर्वी सुमारे अर्धा तास आधी त्या आवाज करू लागतात. जरा वेळानं साठ-सत्तर साळुंक्यांचा जमाव आवाज करीत झाड सोडतो. काही अंतरावर त्यातल्या पाच-सातजणींचा कळप दूर होतो. पुढे जात-जात हा कळप छोटया टोळयात विभागला जातो. या टोळया मनुष्य वस्तीच्या जवळ दिवसभर वावरतात. फळे, किडे, उकिरडयावरचे खरकटे जे मिळेल त्यावर हया भूक भागवतात. त्यांचा वावर नेहमी मनुष्यवस्ती जवळ असतो. कोणी शेतकरी मळयात झोपडी बांधून राहू लागला की मैना हमखास पोचतात. प्रसंगी जनावरांच्या चालण्याने शेता-गवतातून उडणारे कीटक पकडतात. कधी गाई-गुरांच्या अंगावर बसून गोचिडा टिपतात. संध्याकाळ होत आली की दूरपर्यंत पांगलेल्या टोळया रातथा-याकडे येऊ लागतात. या प्रवासात छोटया-छोटया टोळया एकत्र येऊ लागतात. या प्रवासात छोटया छोटया टोळया एकत्र येऊन त्यांचा कळप तयार होत असे कळप रातथा-याच्या जागी येतात. त्यातला प्रत्येक सोईस्कर जागा मिळेपर्यंत कलकल करतात आणि मग सगळं झाड चिडीचूप होतो. तिथे पुन्हा दुस-या दिवशी सुर्योदयापूर्वी आवाज सुरू होतो.

साधारण कबूतराच्या आकाराचा हा पक्षी गडद ब्राऊन रंगाचा असतो. चकचकीत पिवळी चोच आणि पिवळे पाय उठून दिसतात. त्यांच्या पंखात असलेली पांढरी पिसे पंख मिटलेल्या अवस्थेत फारशी दिसत नसली तरी उडताना तिथले पांढरे पट्टे स्पष्ट दिसतात. एकेक पाऊल टाकत इकडे तिकडे बघत कुठे काय खायला मिळते आहे याकडे लक्ष देत तिची हालचाल होत असते आणि तशात कधीतरी एकच वस्तू दोघी चौघींच्या लक्षात आली की त्यावरून त्यांचे भांडण सुरू होतं.

साळुंकी – (India Myna) [Acridotheres tristis]
आकार बुलबुलपेक्षा मोठा कबुतराएवढा
वावर भारतात सर्वत्र मनुष्यवस्तीच्या जवळपास
विणीचा हंगाम एप्रिल ते ऑगस्ट
आवाज किSक, कॉSक, चुSर
खाद्य सर्व भक्ष्य, दाणे, किडे, खरकटे
घरट काडया, कागद, चिंध्यापासून बहुधा झाडाच्या खबदाडीत

– दिगंबर गाडगीळ