पेपा पिग आणि तिचा भाऊ जॉर्ज ह्या दोघांना तुम्ही पोगो आणि निक ज्युनिअर चॅनलवर पाहात असाल. पेपा पिग आणि तिचे कुटूंबिय हे पेपा पिगआहेत डुक्कर पण माणसांसारखे वागतात, कपडे घालतात, कार चालवतात आणि आपल्या सारख्या घरात राहातात. हां, आता नाही म्हणायला कधी कधी चिखलात लोळतात आणि आवाज पण डुक्करांसारखाच काढतात. पेपाच्या कुटूंबात तिचे आई-बाबा, भाऊ जॉर्ज, आजी-आजोबा आहेत. पेपाच आवडत खेळणं आहे तिचा टेडी आणि जॉर्जचा आहे डायनॉसॉर. पण जॉर्ज बहुतेक वेळा त्याला डायनेसॉर म्हणतो. पेपा प्रथम सादर केले लंडनच्या ऍशले बेकर डेविस याने. प्रथम अमेरिकेत दाखवला गेलेला हा कार्यक्रम नंतर सा-या जगभरात दाखवला गेला.
आतातर तो आपल्या इथे सुध्दा दिसतो. दहाव्या ब्रिटीश ऍकेडेमी चिल्ड्रन फिल्स मध्ये पेपा पिगला उत्क्रुष्ट बालगट ऍनिमेशन फिल्मचे पारितोषिक मिळाले. पेपा पिग हे फक्त लहानांचेच नाही तर तुमच्या बरोबर मोठ्यांनाही बघायला सांगा. आणि हो, पेपा बरोबर धमाल करायची असेल तर www.peppapig.com ला जरुर भेट द्या.
– भाग्यश्री केंगे
पिंगू ही स्विस ऍनिमेटेड फिल्म असून दशिण ध्रुवावर राहाणा-या पेंग्विन्सची आहे. हा मुख्यता कौटुंबिक कार्यक्रम असून पिंगू आणि पिंगू पेंग्विनत्याचा मित्र रॉबी सिल विषयी आहे. पिंगूच्या कुटूंबात आईवडिल आणि त्याची नुकतीच जन्मलेली बहीण पिंगा आहे. पिंगू ‘इग्लूत’ राहातो. त्याचे मुख्य खेळ हे बर्फावरचे असून रॉबी सोबत तो अधिक रमतो. पिंगूच्या गोष्टी डॅनी गिल्बर्ट ह्यांनी लिहील्या असून ऑटमर गुटमन ह्यांनी ‘क्लेमेशन’ प्ध्द्तीने सादर केल्या आहेत. पिंगूच्या कार्यक्रमाची वेळ फक्त पाच मिनिटे असूनही हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. पिंगूचे सर्वात मोठे यश म्हणजे पिंगू आणि इतर पात्रांच्या तोंडी कोणतीही विशिष्ट भाषा नाही. त्यांची ही खास ‘पिंग्विश’ भाषा संहिते शिवाय प्रथम कार्लो बोनोमी ह्यांनी सादर केली आहे. पिंगू बरोबर धमाल करायची असल्यास www.pingu.net ला जरुर भेट द्या.
लाल पिवळ्या गाडीत बसून, निळया टोपीला घुंगरू लावून टॉयलँड मध्ये रहाणारा नॉडी तुमचा अगदी लाडका आहे. नॉडीचा जन्म लंडन मध्ये झाला. नॉडी हे पात्र एनिद ब्ल्याटन ह्या लेखिकेचे आहे. एनिद ब्ल्याटन ह्या मुलांच्या ब्रिटीश लेखिका होत्या. ब्ल्याटनची इतर गाजलेली पुस्तके म्हणजे ‘ फेमस फाईव्ह’ आणि ‘ सेव्हन सिक्रेट्स’. नॉडीच्या गोष्टी प्रथम दिग्दर्शक कोरियन ह्यांनी लंडनच्या टिव्हीवर सादर केल्या. अल्पावधितच नॉडी लोकप्रिय झाला. नॉडीची गोष्टीची पुस्तकेही पंचवीसपेशा जास्त आहेत. एकटया फ़्रान्स मध्ये नॉडीच्या पुस्तकांचा खप सहा कोटींच्यावर होता. भारतातही नॉडीची लोकप्रियता अफाट आहे. आपल्या इथे नॉडी कार्टून नेटवर्क, डिस्ने चॅनलवर दाखवले जातात. टॉयलॉडमधले नॉडीचे सोबती आहेत बंपी कुत्रा, मि. प्लॉड, गोबलिन चोर, दिना डॉल, मार्था मंकी. नॉडीच्या ह्या दोस्तांबरोबर धमाल करायची असेल तर जरुर पहा नॉडीची वेबसाईट
ओसवाल्ड हा निळ्या रंगाचा ऑकटोपस. तुम्ही त्याला निकजुनिअर चॅनलवर पाहिले असेल. ओसवाल्डचा निर्माता आहे डॉन याकारिनो. डॉन याकारिनो हे मुलांचे लेखक असून त्यांचे लेखन अतिशय साधे आणि सोपे आहे. त्यांच्या पात्रांचे रंगही उजळ आणि आल्हादायक असतात. ओसवाल्ड आपल्या मित्रांसोबत जसे की हेनरी पेंग्विन, विनी कुत्रा, डेझी सनफ्लॉवर बरोबर मोठया अपार्टमेंट मध्ये राहात असतो. ओसवाल्ड छान पियानो वाजवतो आणि छान गाणीही म्हणतो. मनाने अतिशय चांगला आणि दुसर्यांना मदत करणारा ओसवाल्ड पाण्याजवळ असला की मात्र ‘लाईफ जॅकेट’ घालतो. ओसवाल्डला कॅथरिनाच्या ‘डायनर’ हॉटेलात जाऊन ‘स्विझलबेरी’ आईसक्रिम खायला खुप आवडते. ओसवाल्ड ऑकटोपसची वेबसाईट आहे –