शॉन द शीप

shaun the sheep cartoon शॉन द शीप हे निक चॅनलवर असणारे कार्टून इतर कार्टून्सपेक्षा जरा हटके आहे. शॉन द शीप ही कथा आहे शॉन ह्या मेंढयाची. शॉन हा इंग्लंड मधल्या फार्म हाऊसवर राहाणारी मेंढी. शॉन त्याच्या कळपापेक्षा अत्यंत वेगळा वागत असतो. त्याच्या ह्या साहसी आणि थोडयाश्या आगाऊ स्वभावामुळे त्याचा कळप कायम अडचणीत येत असतो. ह्या कळपाला राखणदार असतो बिस्टर कुत्रा. शॉन कधी शेतातल्या कोबीचा फुटबॉल करतो तर कधी माणसाचा कोट घालून पिझ्झा आणायला जातो. ह्या सर्व प्रकारात येणा-या संकटात त्याचे रक्षण करतात कळपातील इतर सदस्य आणि बिस्टर कुत्रा. शॉन हे पात्र प्रथम दिसले १९९५ सालच्या ऑस्कर पुस्कार प्राप्त फिल्म ‘अ क्लोज शेव्ह’ मध्ये. त्यानंतर अडमॅन ऍनिमेशन्सनी शॉन द शीप ह्या नावाने सिरियल आणली. आतातर ती चक्क ७२ देशात दाखवली जाते. शॉन द शीपची साईट आहे – http://www.shaunthesheep.com

लिटील रेड ट्रॅक्टर

Little Red Tractor लिटील रेड ट्रॅक्टर हे ऍनिमेटेड कार्टून साधारण २-३ वर्षांच्या मुलांकरिता आहे. छोटया गोष्टी, अप्रतिम रंगसंगती आणि गोष्टींमधली साधी राहाणी मोठया मुलांनाही खिळवून ठेवते.

लिटील रेड ट्रॅक्टर कार्टून बी.बी.सीने निर्माण केले आहे. लिटील रेड ट्रॅक्टरच्या गोष्टी कोलीन रीडर आणि पिटर टाई ह्यांनी १९९० मध्ये लिहील्या. जुन्या पण व्यवस्थित काम करणा-या लिटील रेड ट्रॅक्टर ह्या मुख्य पात्रा भोवती गोष्टी फिरतात. लिटील रेड ट्रॅक्टरचा मालक आणि दोस्त आहे स्टॅन. स्टॅन आहे त्या परिस्थीशी जुळवून घेणारा, दुस-यांना कायम मदत करणारा आहे. स्टॅनचा शेजारी आहे जोन्स. त्याच्या कडे असणारया मोठ्या निळ्या ट्रॅक्टरची ( बिग ब्लू ) त्याला घमेंड आहे. जोन्स अतिशय स्वार्थी आणि स्टॅनला कायम कमी लेखणारा आहे. स्टॅनच्या शेतात आणि गावात घडणा-या छोटया छोटया गोष्टी लिटील रेड ट्रॅक्टरच्या सोबतीने पाहायला मजा येते.

– भाग्यश्री केंगे

पोकेमान

pokemon cartoon तुमच्या सगळ्यांचा आवडता पोकेमान ह्या वर्षी ११ वर्षांचा झाला आहे. पोकेमान हा खरं तर ‘ निंटेंडो’ नावाच्या कंपनीचा व्हिडीओ गेम पोकेमानआहे. परंतु अल्पकाळात लोकप्रिय झाल्यामुळे पोकेमानची टिव्ही सिरियल, पुस्तके, खेळणी, कपडे सर्वत्र पोकेमानचेच ‘ब्रॅंडींग’ झाले. पोकेमानचे निर्माते आहेत जपानचे कार्टूनिस्ट सातोशी ताजिरी. पोकेमानची कार्ड मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. पिकाचूच्या मदतीने शत्रूंचा संहार करणारा पोकेमानचे अनुकरण समस्त बच्चे कंपनी करत असते. पोकेमानची वेबसाईट www.pokeman.com अप्रतिम डिसाईन केली आहे. साईटवर अनेक गेम्स आणि व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. तुमच्या संगणकावर चिकटवण्यासाठी ‘वॉलपेपरसही’ आहेत. तर मग टिव्हीच्या बरोबरीने बेवसाईट आणि पुस्तकांमध्येही पोकेमानला भेटायला विसरु नका.

परमॅन आ गया..

Perman Cartoon हंगामा चॅनलचे एक लोकप्रिय कार्टून म्हणजे परमॅन. मूळ जपानचे असलेले हे कार्टून तेथे ‘पारमॅन’ किंवा ‘पा-मॅन’ नावानेही ओळखळे जाते. परमॅनचे जनक आहेत ही ‘फुजीको’ आणि ‘फुजीयो’ ही कलाकार जोडी. मासिकात प्रसिध्द होणारया परमॅनच्या गोष्टी नंतर जपान टिव्हीवर १९६७ मध्ये प्रथम दाखवल्या गेल्या. तेव्हा हे कार्टून अर्थातच ‘ब्लॅक ऍड व्हाइट’ होते. जपान बरोबरच परमॅन अमेरिका आणि युरोप मधल्या देशात लोकप्रिय झाले.

परमॅन हा पाचजणांचा चमू आहे. त्यात दोन मुलं, एक मुलगी आणि एक माकड आहे. ह्या पाचजणांची निवड ‘सुपरपरमॅनने’ शहराच्या मदतीसाठी आणि रक्षणासाठी केली आहे. त्यांच्यातला लिडर आहे ‘मित्सू’, त्या नंतर आहे माकड ‘बुबी’, मित्सूची मैत्रिण ‘पाको’, आणि जाडया मित्र ‘पायान’. ह्या प्रत्येकाकडे स्पेशल ‘परमॅन किट’ असते. हे किट म्हणजे त्यात एक हेलमेट आहे ज्यामुळे त्यांना सुपरपॉवर मिळते. विशिष्ट आंगारखा घातल्या मुळे त्यांना उडता येते. त्यांच्या जवळ स्वत:चे रोबोट पण असतात ज्या द्वारे ते एकमेकांशी संपर्क ठेवून असतात.

परमॅनच लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे परमॅन कायमच रोजच्या जीवनातले अडथळे, प्रॉब्लेम्स सोडवत आले आहेत. त्याच बरोबर ह्या मालिकां मधून ‘जॅपनीज लाईफस्टाइल’ विषयी सुध्दा बरेच कळते.

परमॅन स्पॅनीश मध्ये ‘एल होमरे पार’, ब्राझीलमध्ये ‘ सुपर डायनॅमो’, इटली मध्ये ‘ हीरो बॅंबिनो’ नावाने तिथल्या मुलांना हसवतो आहे. त्यांचे मनोरंजन करतो आहे. म्हणूनच परमॅनच्या गाण्याही म्हटले आहे ” सुपरमॅनसे ‘सू’ हटालो, परमॅन बन गया “. सुपरमॅन इतकाच हीरो असणारा परमॅन !

– भाग्यश्री केंगे

← कार्टून मुख्यपान