चकाकत ते सोनचं!

गेल्या काही दिवसांतले सोन्याच्या भावातील चढउतार आपण पाहत आलेले आहोत. सोन्यातील गुंतवणूक ही सगळ्यात फायदेशीर समजली जाते. जगभरात चाललेली सोन्याची प्रचंड उलाढाल,
ताज्या घडामोडी हव्या असतील तर http://www.gold.org ह्या साईटला भेट द्यायलाच हवी. सोन्याचे भाव, गुंतवणूकी साठी किफायतशीर योजनाही ब-याच साईटवर उपलब्ध आहेत –
www.thebulliondesk.com, www.genomesonline.org, www.kitco.com,
www.goldcopd.com, www.gold-eagle.com

चमचम चांदी !
सोन्याच्या बरोबरीनेच चांदीची खरेदी आवर्जून केली जाते. परदेशात सोन्यापेक्षा चांदी आणि हि-यांच्या दागिन्यांना अधिक मागणी आहे. चांदीच्या व्यवसायाशी निगडीत लोकांची अमेरिका स्थित ही http://www.silverinstitute.org संस्था आहे. येथे चांदीचे दागिने तसेच चांदीच्या इतर वस्तूच्या व्यवसायांनाही प्रोस्ताहन दिले जाते. चांदीचे भाव, दागिने, वस्तू ह्यांची अधिक माहिती घ्यायची असल्यास ह्या साईट्सना जरुर भेट द्या –
www.kitco.com/charts/livesilver.html, www.thebulliondesk.com,
www.thesilverband.com, www.silvertoons.com,
www.silver-investor.com, www.monex.com/prods/silver.html

हिरा है सदा के लिए !
हिरा खरेदी ही आता काही विशिष्ट वर्गाची खरेदी राहिलेली नाही. सामान्य लोकंही आता हि-याच्या सुटसुटीत दागिन्यांच्या खरेदीकडे वळता आहेत. हि-याच्या प्रतिथयश ‘ब्रॅंड्सनी’ स्वतःचे दागिने कमी किमतीला बाजारात आणले आहेत
http://www.debeers.com/us, http://www.tanishq.in, http://www.ddamas.co.in हि-याचे भाव, दागिने, मार्केट मधले स्थान ह्या बद्दल माहिती हवी असल्यास – http://www.adiamondisforever.com, www.diamonds.net, www.suratdiamond.com,
www.novori.com, www.helzberg.com

अनमोल मोती
सोन्या इतके नसले तरी मोत्याची खरेदी ही अस्सल रसिकांना मोहून टाकते. प्रत्येक देशाच्या संस्कृतीत मोत्याचे महत्तव, रंग आणि वापर वेगवेगळा आहे. खरे मोती महाग असले तरी ‘ कलचर्ड ‘ मोतीही वापरले जातात.मोत्यांची माहिती असणा-या असंख्य साईट्स आहेत –
www.pearls.com, www.mangatrai.com, www.amnh.org/exhibitions/pearls,
www.p-g-a.org/pearls.html, www.jagdambapearls.com, www.pearlsonly.com

मोत्यांची ही खरेदी गुंतवणूकीच्या दृष्टीने न पाहता हौस म्हणून केली तर जास्त आनंद मिळू शकेल.

– सौ. भाग्यश्री केंगे