जय जय रघूवीर समर्थ

लग्न मंडपात ‘सावधान’ हे शब्द ऐकताच, पलायन करणारे ‘नारायण’ समाजहिता करीता देशभर भटकले. समर्थ रामदास नावाने ओळखले जाऊ लागले. समर्थ रामदासांनी भक्ती व बलोपसानेला अधिक महत्त्व दिले. ते रोज सूर्यनमस्कार घालत असत त्याच बरोबर हनुमानाचेही ते निस्सिम भक्त होते. असे म्हणतात हनुमानामुळेच ‘नारायणाला’ प्रभु रामचंद्राचे दर्शन घडले आणि पुढे ते ‘रामदास’ म्हणून ओळखले जाऊ लागले. रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली त्यातले बरेचसे पुण्याजवळ चाफळ येथे आहेत. त्यांच्या विषयी अनेक साईट्स उपलब्ध आहेत. काही साईट्सवर ‘ मनाचे श्लोक’ व ‘ दासबोध’ ही वाचायला मिळतो.
जरुर पहा –

http://www.ramdas.org,
http://samartharamdas.com,
http://en.wikipedia.org/wiki/Samarth_Ramdas,
www.dlshq.org/saints/samartha_ramdas.htm,
www.answers.com/topic/ramdas
http://www.shivsamartha.org,
www.storytellingmonk.com/ref/holy_sights/people/samartha_ramdas.htm,
www.jalna.nic.in/html/attra.html,
www.bharatadesam.com/people/samartha_ramdas.php

बुध्दंशरणम गच्छामी

राजपूत्र सिध्दार्थाने वयाच्या २९व्या वर्षी पहिल्यांदाच मृत्यू, रोग, आजार, दुःख दारिद्रय पाहिले तेव्हा तो जीवनाच्या अर्थाच्या शोधात निघाला. बरीच भ्रमंती केल्यावर अखेरीस बोधगया तेथे पिंपळ वृक्षाच्या छायेत त्याला साक्षाक्तार झाला. तेव्हांपासून गौतम बुध्द म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विचारांचा, शिक्षेचा वेगळा असा बौध्द धर्म स्थापन झाला व त्यांचे अनुयायी जगभरात पसरलेले आहेत. बुध्दपोर्णिमा हा दिवस गौतम बुध्दांचा जन्म दिवस तर आहेच परंतु त्याचबरोबर त्यांना साक्षाक्तार झाल्याचाही दिवस आहे. त्यामुळे ह्या दिवसाचे महत्त्व अधिक आहे –
www.festivalsofindia.in/BudhPurnima,
www.srisathyasai.org.in/Pages/AshramInfo/Buddha_Poornima.htm,
www.festivalsinindia.net/buddha-jayanti/index.html,
www.bhavans.info/festival/buddhapoornima.asp ,
www.sathyasai.org/news/buddhapoornima2002.html,
www.worldeventsguide.com/event.ehtml?o=2080,
www.festivals.indobase.com/buddha-jayanti/index.html

स्वामी विवेकानंद

परदेशातल्या लोकांना ‘बंधू आणि भगिनींनो’ असे संभोधून आपलेसे करणा-या स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्याला झाला. लहानपणापासूनच नरेंद्र अभ्यासात हुशार, खेळाची व व्यायामाची आवड असणारा आणि योग ध्यानधारणा करणारा होता. त्याला कायम देवाच्या अस्तित्वाबद्दल साशंकता असायची म्हणून मित्रांच्या सल्ल्याने नरेंद्र ब्रम्हो समाजाच्या कार्यात सामिल झाला. कालांतराने १८१८ मध्ये नरेंद्रची भेट रामचंद्र परमहंसाशी झाली. नरेंद्रने तोच प्रश्न परमहंसानाही केला. नित्यनेमाने नरेंद्र परमहंसांकडे जायला लागला व पाच वर्षाच्या कालावधीत अवखळ मुलाचे रुपांतर समंजस पुरुषात झाले. त्यांनी सा-या भारतात तसेच भारताबाहेरही हिंदुत्वाचे आचार आणि विचार पोहोचवले व स्वामी विवेकानंद म्हणून ओळखळे जाऊ लागले. त्यांच्या बद्दल अधिक माहिती साठी –
www.vivekananda.org/,
www.vivekananda.org/index2.asp,
www.freeindia.org/biographies/vivekanand/,
en.wikipedia.org/wiki/Swami_Vivekananda,
www.ramakrishna.org/sv.htm,
www.ramakrishnavivekananda.info/ ,
www.hindunet.org/vivekananda/,
www.vkendra.org/ ,
www.mp.nic.in/highereducation/raisen/vivekanand.htm,
www.vyasa.org,
www.sriramakrishna.org/vvksay.htm

संत तुकाराम

तुकोबाचे हात लिहिताती जे जे | ते ते सहजे पांडुरंग ||
सतराव्या शतकातले संत कवी तुकारामांचे विचार आजही महत्त्वाचे वाटतात. http://www.tukaram.com वेबसाईटवर आपल्याला वाचायला मिळतात.ही वेबसाईट अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुकाराम गाथा संपूर्ण डाऊनलोड करुन आपल्याला संग्रही ठेवता येते. तुकारामांविषयीचे लेख, भजन, पालखी सोहळा, बालगोपाळांसाठीचे लेख छायाचित्रांसह उपलब्ध आहे. विष्णू महाजनी ह्यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या तुकारामांच्या कविताही येथे वाचायला मिळतात.

भक्त पुंडलिक

असे म्हणतात पुंडलिका सारखा भक्त सा-या जगतात नाही. कथा अशी आहे की पुंडलिकाचा विवाह झाल्यावर पुंडलिक त्यांच्या मात्यापित्यांशी अत्यंत वाईट वागायचा. एकदा यात्रेला जातांना आपल्या ह्या वाईट कृत्यांचा त्याला साक्षात्कार होतो. तेव्हांपासून आपल्या मातापित्यांची तो अत्यंत मनोभावे सेवा करु लागला. एकदा मातापित्यांना जेवायला वाढत असतांना प्रत्यक्ष भगवान विष्णू त्याचे दार ठोठवतात. परंतु पुंडलिक हातातले काम टाकून न देता देवाला उभे राहायला एक विट देतो. विष्णू पुंडलिकावर प्रसन्न होतो. तेव्हा पासून विष्णू भगवान विठोबाच्या रुपाने भक्तांसाठी विटेवर उभे आहेत. भक्त पुंडलिका विषयी जाणून घेण्यासाठी –
http://www.gsbkerala.com/panduranga.htm,
en.wikipedia.org/wiki/Vitthal,
www.hindubooks.org/temples/maharastra/pandharpur/page4.htm ,
www.sanathanadharma.com/bhakti ,
www.answers.com/topic/vithoba ,
www.bhagawannityananda.org/bn1.html ,
www.tukaram.com/pages/Glossary2.asp ,
www.nayna.in/blog,
www.shirishshete.com/documentary/warkaris.htm

गुरु गोबिंद (गोविंद) सिंग

गुरु गोबिंद (गोविंद) सिंग हे शिख पंथाचे दहावे आणि शेवटचे गुरु. त्यांनी ‘खालसा’ पंथ स्थापन करुन ‘श्रध्दा ‘ आणि ‘त्यागाची ‘ शिकवणूक सर्वांना दिली. औरंजेबाच्या अत्याचारात त्यांचे आई-वडील व चार मुलगे मारले गेले. गुरु गोबिंद (गोविंद) सिंगानी पाच ‘क’ची शिकवणूक समस्त शिखांना दिली ती म्हणजे ‘केस’, ‘कंघा’, ‘काछा’, ‘कडा’, ‘क्रिपान’. गुरु गोबिंद (गोविंद) सिंगाची शिकवण आज नेटवरुन सा-या जगात पोहोचली आहे. जरुर पहा –
www.gurugobindsinghji.net,
www.khalsanet.org,
www.baisakhifestival.com,
www.sikh-history.com/sikhhist/gurus/nanak10.html

– सौ. भाग्यश्री केंगे