जस्मिन

जगात जस्मिनचे २०० प्रकार उपलब्ध आहेत. आपल्याकडे आपण त्याला मोगरा, जाई, जुई, चमेली, साईली, नेवाळी अश्या अनेक प्रकारात ओळखतो. ही सर्व फुले बहुतेक पांढ-या रंगात वेलीवर येतात. ह्यांचा मोसम वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात असतो. भारता इतकेच इतर देशातही जस्मिनचे महत्त्व अधिक आहे. इंडोनेशियाचे हे राष्ट्रीय फूल आहे तर फिलिपाईन्स मध्ये त्यांच्या देवतांना जस्मिनचेच हार घालण्यात येतात. थायलंड मध्ये जस्मिनला आईचे प्रतिक मानले जाते. नेटवर ह्या फुलांची माहिती जस्मिन ह्या प्रकारातच वाचायला मिळते.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Jasmine, www.webindia123.com/women/attire/jasmine.htm,
www.ecoindia.com/flora/flowers, www.ehow.com/how_2045272_plant-jasmine.html
www.theflowerexpert.com/content/giftflowers/flowersandfragrances/jasmine,
www.aphorticulture.com/Jasmine.htm, www.rareflora.com/fragrant.htm,
www.whiteflowerfarm.com/growing-caring-for-jasmine-plants-indoors.html

चाफा

वसंतात उमलणारी चाफ्याची फुले त्यांच्या हिरव्या लांबट पानांच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष वेधून घेतात. रविंद्र्नाथ टागोरांनाही ह्या फुलांनी भूरळ घातली आणि त्यांनी ‘द चंपा’ नावाने त्यांनी त्यावर सुंदर कथा गुंफली. अनेक उपजाती असणारी ही फुले मुळची मेक्सिको, मध्य अमेरिकेत आणि व्हेनेझुएला मध्ये सापडतात. मुख्यत: पांढ-या रंगात असणारी ही फुले भडक गुलाबी, थोडीशी पिवळसर रंगा मध्येही सापडतात. ह्या फुलांना रात्री अधिक गंध असतो. त्यामुळे विशिष्ट किटक आकर्षित होऊन त्यांचे परागीकरण होते. तशी ही झाडे फांद्या लावूनही येऊ शकतात. असे म्हणतात हिंदू धर्मात चाफ्याची फुले देवाला शक्यतो वाहिली जात नाहीत कारण त्यावर भूतांचे वासतव्य असते. तर बांगलादेशात ही फुले मृतदेहावर श्रध्दांजलीसाठी वाहण्यात येतात.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Plumeria,
www.flickr.com/photos/imkhan/231631412/,
http://www.treklens.com/gallery/Asia/Laos/photo35824.htm,
www.online-literature.com/tagore-rabindranath/crescent-moon,
members.aol.com/parijata/champa1.html,
www.floracopeia.com/gallery/Flowering-Trees,
www.whitelotusaromatics.com/newsletters/champa1.html

कैलासपती

मराठीत ‘कैलासपती’, तामिळ मध्ये ‘नागलिंगम’, तेलगूत ‘मल्लिकार्जून’ आणि इंग्रजीत ‘Cannonball Tree’ म्हणून ओळखले जाणारे हे झाड फारसे बघायला मिळत नाही. कैलासपतीचे फुल अतिशय वैशिष्टपूर्ण असते. फुलाच्या मध्यभागी शंकराच्या पिंडीचा आकार असून बाजूने अतिशय बारीक रेषा सामावल्या असतात. ह्याचा सुगंधही मोहक असतो. ३०-३५ से.मी उंच वाढणा-या ह्या झाडाला २०-२५ सेमी व्यासाचे मोठे फळ लागते. ह्या फळात अनंत बिया असतात. हे फळ पिकल्यावर कधीही झाडावरुन पडू शकते म्हणून वाहतूकीच्या जागी फारसे लावले जात नाही.
अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Couroupita_guianensis ,
www.flowersofindia.net/catalog/slides/Cannon%20Ball%20Tree.html ,
www.tradewindsfruit.com/cannonball_tree_pictures.htm, www.tradewindsfruit.com/cannonball_tree.htm, www.tropilab.com/couroupita.html,
mgonline.com/cannonball.html,www.indianetzone.com/4/cannon_ball_tree.htm, www.tradewindsfruit.com/cannonball_tree_pictures.htm,
www.tropilab.com/couroupita.html, www.indianaturewatch.net/displayimage.php?id=19965

सुरंगी

हार आणि गज-यासाठी वापरली जाणारी सुरंगीची फुले फारशी बघायला मिळत नाहीत. थोडीशी पिवळसर चॉकलेटी रंगात असणारी ही फुले. फुलांच्या कळ्या लालसर असून गोल आकारात असतात. पाकळ्याही मोठया आणि गोलाकार रंगात असतात. ह्या फुलांचा सुगंध इतका उग्र असतो की अगदी अर्धा किलोमिटर लांबूनही ह्याचा फुलांचा सुगंध आपल्याला मोहवून टाकतो. नेटवर ह्या फुलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही तसेच फोटोही कमी पहायला मिळतात.
तरी ह्या साईट्स जरुर बघाव्यात –
http://www.flowersofindia.net/catalog/fragrant.html, www.kamat.com/database/pictures/13167.htm, www.kamat.com/picturehouse/browse/221.htm, www.flowersofindia.net/catalog/slides/Surangi.html,
www.flowersofindia.net/catalog/tree-frame8.html,
books.google.co.in/books?isbn=8172016646…, www.gardentia.net/guttif_004.htm,
http://sliceoftheday.wordpress.com/tag/malpighiales/,
envis.maharashtra.gov.in/envis_data/pdf/trees.pdf

केतकी

‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’ गाण्यातला केतकी किंवा केवडयाचा उल्लेख त्या फुलाचे महत्त्व अधोरेखित करतो. केवडयाच्या फुलाचा पौराणिक काळातही उल्लेख आहे. पुराणानुसार शंकराला केवडयाची फुले वाहत नाहीत. केवडया सुगंध मात्र अतिशय मनमोहक असल्यामुळे अत्तरात आणि सुगंधी तेलात त्याचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी केवडयाच्या पाण्याचा उपयोग खाण्यातही करतात. नेटवर फारशी माहिती उपलब्ध नसली तरी खालिल साईट्स वाचनीय आहेत –
http://www.flowersofindia.net/mythology.html, www.indianhospitality.com/food/food.htm,
www.ffdcindia.org/clusterberhampur.htm, www.essentialoil.in/kewra_perfume_oil.html,
www.tarladalal.com/GlossaryDisc.asp?id=100&Typ=Cook,
www.essentialoilindia.com/Kewra-Essential-Oil-Hydro-Distilled.html,
www.shivaexportsindia.com/essentialoils/Kewra-Oil.htm

गुंजा

गुंजा ह्या पुराणकाळा पासून भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. असे म्हणतात की राधाने दिलेल्या माळा श्रीकृष्ण आपल्या गळ्यात सतत धारण करत असे. गुलाबी फुलांच्या ह्या भडक लाल-काळ्या रंगातल्या बिया दागिन्यांसाठी वापरल्या जातात. ह्या बिया तुरट असून विषारी असतात. योग्य रितीने सेवन केल्यास त्यातल्या औषधी गुणांचा लाभ होऊ शकतो. डोक्यातल्या उवा मारण्यासाठीच्या औषधातही गुंजांचा वापर केला जातो. चैतन्य संप्रदायाचे भक्त गुंजाच्या माळा परिधान करतात.
नेटवर फारशी माहिती उपलब्ध नसली तरी खालिल साईट्स वाचनीय आहेत –
http://www.flowersofindia.net/mythology.html, www.salagram.net/sstp-Gunja-malas.html, www.indiadivine.org/audarya/iskcon-internal/364866-birds-plants-
vaishnava-literature-koel-gunja.html, www.vrindavan.de/ornaments.htm,
www.harekrsna.de/madhurastakam-e.htm, www.anniesremedy.com/chart2.php

– सौ. भाग्यश्री केंगे