असा मी ‘असामी’

महाराष्ट्राचे सर्वात लाडके लेखक म्हणून पुलं देशपांड्यांचे नाव घेता येईल. लेखक, वक्ता, संगीतकार, नट… त्यांचे अष्टपैलूत्व वादादीत होते. त्यांच्या लिखाणा इतकीच लेखातली पात्र आजही लोकप्रिय आहेत. पुलंचे साहित्य, लेख, माहिती, फोटो, अगदी आवाज सुध्दा नेटवर ऐकायला मिळतो. त्यांना वाहिलेल्या अनेक वेबसाईट्स आहेत आणि प्रत्येकावर काहीनाकाही तरी नवी माहिती मिळतेच. नवीन पीढीने ह्या साईट पाहायलाच हव्यात –
www.puladeshpande.net, en.wikipedia.org/wiki/P._L._Deshpande, www.apalepl.tk, www.geocities.com/pldeshpande, www.punelifestyle.com/pula_deshpande.htm
www.punediary.com/html/Pula%20Deshpande.htm,
www.onesmartclick.com/marathi/marathi-katha-kathan.html, www.geetmanjusha.com/marathi/musician/77.html, www.indiainternational.com/pulabahurupi80/pula12.html

कोकण जीवनदर्शन घडविणारे ‘श्रीना’

श्री ना पेंडसे हे महाराष्ट्रात नावाजलेले लेखक होते तरी सुध्दा त्यांच्या साहित्याची दखल इंग्रजी साहित्याने घेतली आहे. साहित्य अकादमीचा पुसस्कार मिळालेल्या त्यांच्या ‘रथचक्र’ कांदबरीचा अनुवाद ‘चॅरीयट-व्हील’ नावाने UNESCO ने इंग्रजीत प्रकाशित केला होता. त्यांच्या नावावर अनेक कादंब-या आहे पण ‘गारंबीचा बापू’, ‘हद्दपार’, ‘तुंबाडाचे खोत’ त्यात विशेष गाजलेल्या आहेत. अखंडपणे साहित्यसेवा करणा-या गोनीदांचा मृत्यू मार्च, २००७ मध्ये झाला. दुर्दैवाने श्रीनाना वाहिलेली वेगळी वेबसाईट नाही. पण पुढील साईट्सवर त्यांच्या विषयी माहिती उपलब्ध आहे –
http://en.wikipedia.org/wiki/S_N_Pendse, www.rasik.com/marathi/best_books/sarvottam_Akademi_pustake.html, www.anothersubcontinent.com/forums/lofiversion/index.php?t6208.html

महाराष्ट्राचे लाडके ‘ आप्पा’

प्रख्यात लेखक गो.नि.दांडेकर अर्थात महाराष्ट्राचे लाडके’ आप्पा’ आपल्याला भेटतात www.goneeda.com वर. ह्या साईटवर गोनिदांचा जीवन प्रवास वाचायला मिळतो. त्यांची संपूर्ण साहित्यसपंदा सुची पुस्तकांच्या मुखपृष्ठासह वाचायला मिळते. गोनिदांना फिरणे, फोटोग्राफी, गडावर चढायला जाणे असे विविध छंद होते. त्याबद्दलचे लेख, छायाचित्रे आपल्याला पहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला साईटवर गोनिदांची काही भाषणे, मुलाखती ऎकायला मिळतात. तसेच गोनिदांच्या स्मरण जागरणासाठी दिला जाणारा मृण्मयी पुरस्काराची माहितीही साईटवर उपलब्ध आहे. साईटच्या निमित्ताने गोनिदा नवीन पिढीतही स्मरले जातिल ह्यात शंकाच नाही. गोनीदांविषयी पुढील लिंकवर अधिक माहिती मिळते –
http://en.wikipedia.org/wiki/G._N._Dandekar,
www.cse.iitb.ac.in/~vaibhavg/favourites.php

आधुनिक वाल्मिकी

गजानन दिगंबर माडगुळकर ह्यांना अवघा महाराष्ट्र गदिमा नावाने ओळखतो. गदिमा हे कथा लेखक, कांदबरीकार, पटकथा, कविता, गाणी आणि संवाद लेखक म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच मराठी साहित्यात नावाजले गेले. त्यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते. त्यांची कथा, पटकथा, गीते असलेला हिंदी चित्रपट ‘दो ऑंखे बारह हाथ’ला आतंराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. गदिमांनी लिहीलेली ५६ गीतरामायणाची गाणी मोलाचे योगदान आहे. आजही त्यांच्या ह्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून संबोधले जाते. http://www.gadima.com ही त्यांना वाहिलेली साईट माहितीपूर्ण आहेच. त्यांच्या विषयी आपल्याला खालिल साईटवरही वाचता येते –
http://en.wikipedia.org/wiki/G._D._Madgulkar, wikimapia.org/1948587/,
timesofindia.indiatimes.com/articleshow/931917.cms,www.spock.com/q/MA/9 ,
pune360.com/News/2007/11/21/gadima-award-for-historian-purandare

महाराष्ट्राचे ‘तात्या’

गदिमांसारखा थोरला भाऊ असून सुध्दा स्वतःची वेगळी ओळख व्यकंटेश माडगूळकरांनी निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या लाडक्या तात्यांनी ‘माणदेशची माणसं’, ‘बनगरवाडी’, ‘वावटळ’ अश्या कादंब-यांनी आणि इतर अनेक कथा, निबंधांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले. वाचना बरोबरच त्यांची स्वतः काढलेली चित्रे पाहणे ही सुध्दा ही कलाप्रेमींना मेजवानीच आहे. तात्यांना लहानपणी शाळेत शिकण्यापेक्षा सवंगड्यांबरोबर झाडावर चढणे, मासे पकडणे, पक्षी निरिक्षण करणे तसेच निर्सगात रमण्याचा नाद होता. त्यांच्या लिखाणातून हे सारे वाचकांसमोर आले आहे. त्यांना साहित्य अकादमी बरोबरच अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. www.tatya.org ही त्यांना वाहिलेली साईट अप्रतिम आणि माहितीपूर्ण आहेच त्याच बरोबर इतर साईटसवरही त्यांच्या विषयी माहिती वाचता येते –
en.wikipedia.org/wiki/Venkatesh_Madgulkar, www.imdb.com/name/nm2151370/,
http://simple.wikipedia.org/wiki/Vyankatesh_Madgulkar,
www.alibris.com/search/books/author/Vyankatesh%20Madgulkar ,
www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19991102/ige02038.html ,
movies.nytimes.com/person/202493/Vyankatesh-Madgulkar ,
books.google.co.in/books?isbn=8126010916…,
www.vidyaonline.org/arvindgupta/mbooklist.doc

चार दिवस प्रेमाचे

चार दिवस प्रेमाचे, घर तिघांच, जावई माझा भला, निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या-गलबत्या… ही यादी लांबणारीच आहे. ह्या सर्व नाटकांमागे असलेला समान धागा आहे रत्नाकर मतकरी ! अर्ध्या दशकाहून अधिक काळ नाट्य लेखन, दिग्दर्शन, पटकथा, वेशभूषा, बालनाटय चळवळ, चित्रकार आणि लेखक म्हणून सर्वांना सुपरिचीत असणारे मतकरी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांच्या ह्या प्रवासात साथ आहे त्यांच्या कलाकार कुटूंबाची त्यांची पत्नी प्रतिभा, मुलगी सुप्रिया ह्यांची. रत्नाकर मतकरींची स्वतःची साईट तर आहेच परंतु इतरही काही साईट्सवर त्यांची माहिती आहे –
http://www.ratnakarmatkari.com/index.asp, en.wikipedia.org/wiki/Ratnakar_Matkari,
www.dilipprabhavalkar.com/v1/theatre.htm,www.answers.com/topic/ratnakar-matkari, www.mumbaitheatreguide.com/dramas/marathi/jadooterinazar.asp, www.mumbaitheatreguide.com/dramas/marathi

– सौ. भाग्यश्री केंगे