‘भले बुध्दीचे सागर” नाना फडणवीस

nana phadnavis इतिहासातील एक श्रेष्ठ व्यक्तीमत्व. जो पर्यंत हिंदूस्थानचा इतिहास लिहिला जाईल तो पर्यंत याचे नाव इतिहासात लिहिले जाईल. अत्यंत बिकट परिस्थितीत मराठी राज्याची धूरा मोठया शिताफीने साभांळून मराठी राज्य वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. ब्रिटीश सत्तेला २५ वर्षे महाराष्ट्रात स्थान दिले नाही. नानांनी केलेली महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी राज्याच्या महसूलाचे व्यवस्थापन केले. तिच पध्दत आज पर्यंत चालू आहे. त्यांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा तसेच तत्कालीन शिक्षण पध्दतीत इतिहास, भूगोल व बहुतीक विज्ञान याचा समावेश केला. अनेक इग्रंजी सुधारणा महाराष्ट्रात चालू केल्या. नाना फडणवीसांची किर्ती जगभर पसरली त्यांच्या मृत्युनंतर ‘स्वराज्य व पेशवाईतील शहाणपण लयास गेले’ असे उदगार इंग्रजी गव्हर्नर जनरल त्यांनी व्यक्त केले आहे.

सौ. वैशाली मो. फडणीस