आजच्या यंत्रानी माणसाला पाठी सोडण्याच्या युगात एक घटक असाही आहे जिथे यंत्राचा आवाका माणसापुढे तोकडा पडतो. हे आहे मानवी मन व त्याची झेप नि लवचिकता यांच्या मुळाशी आहे स्फूर्ति-प्रेरणा-motivation.
प्रोत्साहित नि उत्साहित माणूस व त्यांच्या वागण्यातील फरक इतका ठळक असतो की तो जाणवायला आपल्याला त्या विषयातील तज्ञ असण्याची गरज नाही. motivation या विषयावर मुबलक साहित्य, सिध्दांत उपलब्ध असल्याने यावर काही नाविन्याने लिहायचा हेतू नाही.
वेगवेगळया संदर्भात प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळी अस्त्रे (Tools) असतात. काही सकारात्मक (Position) काही नकारात्मक (Negative or punitive) काही प्रलोभनं तर काही दंडस्वरूप ज्यांचा परिणाम स्वरूप आवश्यक वर्तणुकीला प्रोत्साहित केलं जात. या सा-या (Tools)ची गोळाबेरीज दोन भागात वेगळयाप्रकारे विभागणी करता येईल. (Soft & Hard) Hard tools ही दृश्य स्वरूपात असतात. ज्यात पैसा, पुरस्कार, इतर लौकिक फायदे अशा गोष्टी येतात. तर Soft मध्ये अशा बाबी असतात ज्या दृश्य स्वरूपात असतीलच असे नाही, पण मानसिक किंवा भावनिक पातळीवर आपल्याला स्पर्श करतात. जसं की मानसन्मान, आत्मविश्वास, शाबासकीची थाप अर्थात पर्याय विविध असले तरी कुणा एकाला प्रोत्साहित करायला जे घटक जास्त उपयुक्त असतील ते कुणा दुस-यासाठी तेवढेच उपयुक्त ठरतील असं नाही. हे सारे त्या त्या माणसाच्या मानसिक जडणघडणीवर, त्या त्या वेळच्या परिस्थितीवर, त्या माणसाच्या आयुष्यातील प्राथमिकतेवर अवलंबून असतं. म्हणून कुणाला प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांचे यश आपल्याला त्या माणसाची ‘जडणघडण’ किती समजली आहे यावर अवलंबून असतं. हे प्रोत्साहित करण्याचे सारे सिध्दांत किंवा घटक बाहय गोष्टींवर केंद्रित आहेत-त्याचा भर माणसांच्या परिस्थितीत (Circumstances) गुणात्मक फरक घडवून आणण्यात असतो. Motivational tools असल्याने त्यांचा प्रभाव त्या माणसाच्या (अंतर्गत) मानसिकतेवर जरूर होतो पण तरीही ही tools त्यांचा स्त्रोत बाहयस्वरूपीच असतो External).
याउलट कधी कधी आपल्याला अशीही माणसें दिसतात जी कुठल्याही परिस्थितीत- अगदी प्रतिकूल परिस्थितीतही स्व-प्रभारित Charged/Self motivated) अवस्थेत काम करतांना दिसतात. ही मंडळी प्रोत्साहित असतात. पण त्यांचा motivation चा स्त्रोत हा त्यांचा अंतर्गत असतो-बाहय गोष्टी/घडामोडीवर तो तेवढा अंवलंबून नसतो.
बाहयस्वरूपी असो का अंतर्गत-motivation चे दोनही स्त्रोत महत्त्वाचे आहेत. दोघांचाही वापर अटळ आहे. (कधी कधी संयुक्तपणे) तरीही यामध्ये अटळ ‘डावं-उजवं’ करायचं झालं तर माझ्या मते अंतर्गत स्त्रोत हा जास्त सशक्त व दूरगामी परिणाम साधणारा (Stategic) आहे याला कारणं आहेत :
– बाहयस्त्रोताचं लागू होणं किंवा त्याचं यश हे आपण त्या माणसाची-त्या परिस्थितीतील मानसिकता व प्राथमिकता आपल्याला किती समजली आहे यावर अवलंबून असतं, म्हणून त्यावर एक प्रकारचं अनिश्चिततेचं सावट असतं.
– याउलट अंतर्गत स्त्रोतांचा आपण कधीही वापर करू शकत असल्याने सैध्दांतिकदृष्टया (Therotically) त्यांच्या वापरात एक प्रकारची लवचिकता (Flexibilty) असते. पुन्हा आपल्या स्वत:ला आपल्या स्वत: इतका दुसरा कुणी जवळचा जाणकार नसल्याने आपल्या अंतर्गत स्त्रोताच्या वापरामध्ये अंदाज/आडाखे कमी असून माहिती व निश्चितता जास्त असते.
– अंतर्गत स्त्रोतांच्या वापरामध्ये आपले सारे ‘Triggers’ शक्ति आपण ‘Internalise’ करतो. म्हणजेच एका अर्थाने आपण परावलंबी न होता स्वयंपूर्ण बनतो. माझ्यामते ती एक सक्षम व परिपूर्णतेकडे जाणारी प्रक्रिया आहे.
अंतर्गत स्त्रोत हे केवळ सक्षम व दूरगामीच नाहीत तर बाहय स्त्रोतापासून अंतर्गत स्त्रोतापर्यंतचा प्रवास ही एक अर्थपूर्ण उत्क्रांति आहे. Moslow च्या motivation च्या सिध्दांतामध्ये या अवस्थेला ‘self actualisation’ म्हणतात, तर आपल्या हिंदू अध्यात्मातील निर्वाण जरी नाही तरी त्याच दिशेने हा प्रवास आहे.
अर्थात बोलायला सोपं असलं तरीही हा अंतर्गत स्त्रोतापर्यंतचा प्रवास सहजही नाही किवां आपसूकही नाही-त्यासाठी जिद्द, दिशा, परिश्रम व उत्क्रांति सुलभ मनाची नितांत गरज आहे. पण जर तुम्ही या प्रयत्नांविषयी ठाम असाल तर हा प्रवास निश्चितच सार्थ आहे-अखेर हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा व मनाचा योग्य ताबा घेण्याचा प्रश्न आहे!
यतीन सामंत