मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

ठिकरी

बालपणी मनसोक्त खेळले खेळ ठिकरीचा
अनुभवाने लक्षात आले हेच सुत्र एकच साचा
पडेल त्या दानाने मिळेल त्या घरात जायचे
आपलेच घर समजून जरा स्थिर व्हायचे
तोच लाथाडल्याने सारे विस्कटून
नवीन घर शोधायचे
त्यात ही पुढे गेल्याचे सुख थोडे मानायचे
दुसऱ्याच्या दानावर कळसुत्री बनून नाचायचे
रक्ताळलेल्या जखमांवर चंदन लेप लावायचे
गत आठवणी भरतात उरी एक धसका
बरेच काही शिकवतो अनुभव फसवा
तोच सुरु होते नवीन खेळी पुढची
वेळीच व्हायचे सावध तयारी नवीन घराची
सरशीच्या दानाने एकदाच घर बांधायचे
स्थिरतेच्या आनंदात आता आयुष्य कंठवायचे.

सौ. स्मिता कुलकर्णी

मी स्वत:

काही शृंगारीक शब्दांचा
आधार घेत आहे,
मी माझ्या वेडेपणाची
जाणीव करून देतो आहे.
तुझ्याशिवाय जगणे
शक्य होत नाही,
तुझ्याकडे पाहिल्याशिवाय
आता काही राहावत नाही.
माझ्या या वेडेपणाची
भिती मला वाटते,
तु मला विसरशील का ?
असे मला वाटते.

संदिप देशमुख

आठवण

एका शांत संध्याकाळी
आली एक परिचित आठवण
किती सुंदर होते ते दिवस
किती मौल्यवान…
दिवस कसे भुर्रकन जात होते
रात्री तळमळत काढत होते
एकत्र कधी भेटत होतो.
गोड स्वप्नं पाहत होतो
आठवतं? आपण एकदा
वाळूत घर बांधलं होतं
तुझ्या माझ्या प्रेमानं
आपण त्याला सांधलं होतं
एकमेकांसाठी जणू
आपण जग विसरलो होतो
एकमेकांना एकमेकांच्या
डोळयात आपण पाहत होतो
गेले ते दिवस
पाहता पाहता उडून
सुर्य जसा जातो
सागरात बुडून
एकटी मी अजुनही
वाट पाहते सागरतीरी
येशील का रे मला
भेटायला एकदा तरी….?

मधुवंती गोडसे

आठवून बघ

आठवून बघ
आठवून बघ एकदा
मागे तू हसली होती,
तुझ्या त्या हसण्याने
मला सगळी गोष्ट कळली होती !
त्या हसण्याचा गोडवा
माझ्या जिवनात अमृत घेऊन आला,
पण तुझ्या दूरपणाचा दूरावा
माझ्या जिवनाला विषमय करून गेला

महेश कायरकर