मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

विनोद

आयूष्याच्या सर्कस मधला मी एक जोकर
नाव माझे विनोद
हसवता हसवता सर्वांना रडलो मी खराखुरा
त्यांना वाटले करतोय मी विनोद.

विनोदचा होतोय विनोद
हे विनोदलाच कळाले नाही
कारण त्याचा स्वभाव
होता मूळातच विनोदी.

थोर कवींच्या मुखातुन ऐकुन आपले नांव
त्याला वाटला आपल्या नावाचा अभिमान
चूर चूर झाला त्याचा तो मान
त्यांनी ही केला होता त्याचा नावाचा विनोद.

विनोदने ऐकले खुपदा विनोद
इतरांना आले हसु विनोदचे
त्याने मात्र जाणवले
स्वत:ला विनोदात.

थोर उपकार आई बाबांचे
नाव ठेवले त्यांनी विनोद
मनाने जरी नसलो विनोदी
नावाने तरी आहे विनोद.

विनोद गांगणे

अपेक्षा

राहुनी मनी माझ्या तु
जीवन माझे सार्थक कर
माणुसकीच्या नात्याने
जराशी तर मदत कर.

मन अस्वस्थ नयन बेचैन
स्वप्नात येऊन माझ्या
झोपेची जरा अशी
तु थट्टा तरी कर.

जीवनात काही नाही बस्
येणे आणी जाणे
सोबत राहुन तु
माझ्या जगण्यास मला मदत कर.

मी तुझा तु माझी
होऊ शकलो नाही तर
ही कविता वाचुन तु
कवी होण्यास मला मदत कर.

विनोद गांगणे

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरू झालं हे माहित नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायच असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी
मागून मागून काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं,
इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं………

विनोद गांगणे

‘पंढरीनाथा झडकरी आता’

गीतकार पी. सावळाराम यांच्या ‘पंढरीनाथा झडकरी आता’ या गीताचे विडंबन

पंढरीनाथा घरी चला आता
मोलकरीण नाही आली
भांडी कालची घासू चला आता
मोलकरणीने केला खाडा
भांडयांचाही पडला राडा
त्या भांडयांवर हात फिरवूनी
चला घासू या ‘विम’ लावूनी
‘विम’ संपले लवकर आणा
बंदही होती, जा हो दुकाना
थांबा थोडे पैसे न्या ना
विसराळू मुलखाचे नाथा॥१॥
पाहावे जिकडे तिकडे लाईन
मुंबई आहे तरीही फाईन
परंतु मिळते कुठेही वाईन
हातभट्टीची वेगळी शाईन
अमृत इथूनी गायब होता
चहास म्हणती अमृत आता
चहा तो कसला सारा चोथा
चला जाऊया मिळूनी नाथा॥२॥

विकास भावे